SUPERFAST NEWS | महत्त्वाच्या घडामोडींचा Express आढावा

महत्त्वाच्या घडामोडी झटपट... एका क्लिकवर

Goan Varta Live | प्रतिनिधी

कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांकडून महत्त्वाच्या घोषणा

११,२५० टॅक्सीमालकांना मोफत मीटर.

२००० पेक्षा अधिक कोविड बळींच्या कुटुंबियांना सोमवारपर्यंत अर्थसहाय्य.

पारंपरिक व्यावसायिकांना आजपासून आर्थिक मदत. योजनेच्या नियमांत बदल.

सूचनांचा विचार करूनच भूमी अधिकारिणीबाबत निर्णय.

सचिन वाझेंनी कथित प्रेयसीला बिझनेस वुमन बनवण्यासाठी लाखो रुपये मोजले

सचिन वाझे यांच्या संदर्भात मोठा खुलासा एनआयएच्या आरोपपत्रात झालेला आहे.  कथित प्रेयसीला बिझनेस वुमन बनवण्यासाठी सचिन वाझे यांनी लाखो रुपये मोजल्याचं कळतंय.

परमबीर सिंहांच्या सांगण्यावरून सायबर एक्सपर्टला सिक्रेट सर्व्हिस फंडातून दिले 5 लाख

परमबीर सिंह यांच्या अत्यंत जवळच्या अधिकाऱ्यानं सांगितलंय की, सिंह यांच्या सांगण्यावरुन त्यानं 5 लाख रुपए सिक्रेट सर्व्हिस फंडातून काढून सायबर एक्सपर्टला दिले होते.

अँटिलिया – मनसूख हिरेन प्रकरणात सचिन वाझेने वसुली केलेल्या पैशांचा वापर: NIA

अँटिलिया तसेच आणि मनसूख हिरेन प्रकरणाला अंतिम स्वरुप देण्यासाठी बडतर्फ पोलीस निरीक्षक सचिन वाझेने वसुल केलेल्या पैशांचा वापर करण्यात आल्याचं एनआयएने आपल्या चार्जशीटमध्ये नोंद केली आहे

प्रताप सरनाईक प्रकरण: मुंबई हायकोर्टात ‘ईडी’ला धक्का

एनएसईल आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं आमदार प्रताप सरनाईक यांचे निकटवर्तीय योगेश देशमुख यांचा जामीन रद्द करण्याची ईडीची विनंती फेटाळून लावली आहे.

खळबळ निर्माण करण्याचा प्रयत्न, माहिती लीक केली जातीये

अनिल देशमुखांनी ईडीविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली असून समन्स रद्द करण्याची मागणी केली आहे. तपासयंत्रणा केवळ खळबळ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असून महत्वाची कागदपत्रं लीक केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केलाय.  

गंगा जमुना वस्तीत छुपं तळघर अन् भुयारी मार्ग, अल्पवयीन मुलींना डांबून ठेवलं जातं

नागपूरच्या गंगा जमुना वस्तीतल्या 188 कुंटणखाण्यात छुपं तळघर आणि भुयारी मार्ग असून अनेक अल्पवयीन मुलींना डांबून ठेवलं जातं. परराज्यातून फसवून आणलेल्या 13 ते 14 वर्षांच्या मुलींना हार्मोनचं इंजेक्शन देऊन शारीरिकदृष्ट्या देह व्यापारासाठी तयार केलं  जात असल्याचा गंभीर आरोप भाजपनं केलाय

लसीचा दुसरा डोस देण्यात देशात महाराष्ट्र पहिला

देशात सर्वाधिक 1 कोटी 79 लाख नागरिकांना लसीचा दुसरा डोस देऊन महाराष्ट्राने विक्रम केलाय. लसीकरण कार्यक्रमातील हे आजपर्यंतचे सर्वाधिक लसीकरण झालंय.

महामार्गावर प्रचंड गर्दी;  वाहनांच्या मोठ्या रांगा

मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड खड्डे असल्याने खारपाडाजवळ वाहनांचा वेग मंदावला आहे. त्यामुळे चाकरमान्यांच्या वाहनांची गर्दी होत असून वाहतूक कोंडी झाली आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाण्यासाठी 15 ते 20 तास लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मोदींच्या ड्रीम प्रोजेक्टसाठी भूखंड देण्यास शिवसेना राजी

मुंबई-अहमदाबाद दरम्यान उभारण्यात येणाऱ्या बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी ठाणे महापालिकेच्या मालकीचा ३ हजार ८४९ चौ. मीटरचा भूखंड देण्यास सर्वसाधारण सभेकडून चर्चेविना मंजुरी देण्यात आली. गेल्या वर्षभरापासून रोखून धरलेला हा प्रकल्प शिवसेनेने प्रतिष्ठेचा करत प्रकल्पाचा मार्ग रोखून धरला होता.

बीड जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे 6 जणांचा मृत्यू, तर पशुधनाचीही हानी

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून बीड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. आपत्तीत 6 जण दगावले असून 29 पशुधनाची हानी झाली आहे.

लसीचा एकही डोस न घेतलेल्यांना मृत्यूचा धोका अधिक

मुंबईमध्ये सहा महिन्यांमध्ये गेल्या एकंही लस न घेतलेल्या 576 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.  दोन तृतीयांश लोकांना आयसीयूमध्ये भरती करण्याची वेळ आली.

शिवेंद्रसिंहराजे आणि उदयनराजे समर्थक भिडले; शस्त्रांचा वापर झाल्याने जिल्ह्यात खळबळ

साताऱ्यात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि खासदार उदयनराजे भोसलेंच्या कार्यकर्त्यातील वैर संपूर्ण राज्याला माहित आहे. मात्र शहरात पहिल्यांदाच त्यांच्या समर्थकांमध्ये झालेल्या सशस्त्र मारामारीमुळे शहरात खळबळ माजली.

भाजप खासदार सूनेला मारहाण करत असल्याचा सकाळी आरोप, संध्याकाळी लग्न

भाजप खासदार रामदास तडस सूनेला मारहाण करत असल्याच्या आरोपानंतर ट्विस्ट पाहायला मिळाला आहे. सकाळी मारहाणीचा गंभीर आरोप आणि संध्याकाळी त्यांच्या मुलाशीच तिने लग्न केल्याचा प्रकार घडलाय.

महामार्गावर विखुरलेले आढळले हजारो कंडोम

कर्नाटकातील तुमकूर याठिकाणी एक विचित्र प्रकरण समोर आलं आहे. इथल्या राष्ट्रीय महामार्गावर हजारो कंडोम रस्त्यावर विखुरलेले आढळले आहेत.

देशातील कोरोना रुग्णसंख्या वाढली

देशातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली असून दरदिवशी वाढणाऱ्या एकूण रुग्णसंख्येच्या 70 टक्क्याहून अधिक रुग्णसंख्या ही एकट्या केरळमधून येत आहे.

अखिलेश यादव – मायावतींच्या मुर्खपणामुळे नरेंद्र मोदी दोनवेळा पंतप्रधान झाले

समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव आणि बसपाच्या मायावती या दोघांच्या चुकीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन वेळा पंतप्रधान झाले, असं वक्तव्य खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केलं.

५ लाख ‘थँक्यू मोदीजी’ कार्ड, १४ कोटी रेशन पिशव्या अन् २१ दिवसांचं सेलिब्रेशन

भाजप येत्या १७ सप्टेंबरपासून पुढील तीन आठवडे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केलं आहे. यात२१ दिवसीय कार्यक्रमामध्ये १४ कोटी रेशनच्या पिशव्या, ५ कोटी थँक यू मोदीजी पोस्ट कार्ड, नदी स्वच्छता मोहिमेअंतर्गत ७१ जागांवर केलं जाणार काम

दोन बोटी एकमेकांना धडकल्या;  50 हून अधिक प्रवासी बेपत्ता

ब्रम्हपुत्रा नदीमध्ये दोन बोटींची एकमेकांना धडक बसली असून या अपघातानंतर 50 हून अधिकजण बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे. जोरहाट जिल्ह्यातून वाहणाऱ्या ब्रम्हपुत्रेच्या पात्रात एका मोठ्या बोटीनं स्टिमर प्रकारच्या बोटीला धडक दिली.

शार्दुल ठाकूरची कसोटी क्रमवारीत मोठी झेप

इंटरनेशनल क्रिकेट कौन्सिलकडून जारी करण्यात आलेल्या कसोटी रँकिंगमध्ये भारताच्या रोहित शर्मा आणि  शार्दुल ठाकूरला चांगलाच फायदा झाला आहे. या खेळीच्या बळावर त्यानं कसोटी फलंदाजांच्या यादीत 79 व्या स्थानावर झेप घेतली आहे.

आगामी टी-20 वर्ल्ड कपसाठी महेंद्र सिंह धोनीकडे मोठी जबाबदारी

बीसीसीआयने 2021 टी 20 विश्वचषकासाठी माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर महत्वाची जबाबदारी सोपावली आहे. एमएस धोनीला भारतीय संघाचा मार्गदर्शक म्हणून नियुक्ती केला आहे.

देशात पहिल्यांदाच खासगी कंपनी सैन्यासाठी उभारणार एअरक्राफ्ट

‘मेक इन इंडिया’ धोरणांतर्गत खासगी कंपनी ‘टाटा’ आणि ‘एअरबस’ मिळून भारतात सैन्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानासही आवश्यक असणारी विमानं तयार करणार आहेत.

पाकिस्तानात महिला शिक्षकांना जीन्स, घट्ट कपडे घालण्यास मनाई

पाकिस्तानमध्ये आता थेट महिला  शिक्षकांच्या पोशाखावरच निर्बंध टाकलेत. FDE ने  पाकिस्तानमधील महिला शिक्षकांनी जीन्स आणि घट्ट कपडे घालू नये अशी अधिसूचना जारी केली आहे.

अफगाणिस्तानमध्ये निदर्शनांवर बंदी; घ्यावी लागणार तालिबान सरकारची परवानगी

अफगाणिस्तानमध्ये निषेध करण्यापूर्वी तालिबान सरकारची परवानगी घ्यावी लागेल. अफगाणिस्तानचे नवे गृहमंत्री दहशतवादी सिराजुद्दीन हक्कानी यांनी हा हुकूम जारी केला आहे.

जगातील सर्वात शक्तिशाली अवकाश दुर्बिण लाँच करण्याची तारीख ठरली

सर्वात शक्तिशाली अवकाश दुर्बिण ‘जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप’च्या प्रेक्षपणाची, अवकाशात पाठवण्याची तारीख अखेर नासाने जाहीर केली आहे. येत्या १८ डिसेंबरला सुमारे ६.५ टन वजनाची हि दुर्बिण आहे.

पृथ्वीवर धडकणाऱ्या सौर वादळामुळे इंटरनेट बंद पडणार?

येत्या काळात पूर्वानुमान करता न येऊ शकणाऱ्या सौर वादळामुळे पृथ्वीवरील इंटरनेटची सेवा ही काही दिवसांपासून ते काही महिन्यांपर्यंत बंद पडण्याची शक्यता आहे. कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या असिस्टंट प्रोफेसर संगिता ज्योती यांनी हा अहवाल तयार केला आहे. 

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!