SUPERFAST NEWS | महत्त्वाच्या घडामोडींचा Express आढावा

महत्त्वाच्या घडामोडी झटपट... एका क्लिकवर

धनश्री मणेरीकर | प्रतिनिधी

नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई मंजूर करण्यास सुरुवात

नैसर्गिक आपत्ती, पुरामुळे नुकसान झालेल्यांना सरकारकडून नुकसान भरपाई मंजूर‌ करण्यास सुरुवात. डिचोली तालुक्यात ३०१ जणांना १ कोटी ९ लाख रुपये मंजूर.

संशयितास अटक

दुचाकी चोरीप्रकरणी गुजरात येथील रहिवासी संशयित राजीव अंजुरकर याला कोलवा पोलिसांकडून अटक.

बुधवारची कोविड आकडेवारी

बुधवारी राज्याच्या आरोग्य विभागाने जारी केलेल्या कोविड बुलेटिननुसार बुधवारी राज्यात कोविडचे आणखी २ बळी गेलेत. गेल्या 24 तासात ८६ नवे रुग्ण सापडलेत. त्यामुळे राज्याची सक्रीय रुग्णसंख्या ८५६ वर पोचलीये.

भाजपचे गोवा निवडणूक प्रभारी नियुक्त

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपचे गोवा निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्त

गोव्यात पुन्हा भाजपचेच सरकारः फडणवीस

डॉ. प्रमोद सावंत आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने केलेल्या कार्यामुळे गोव्यात पुन्हा भाजपचेच सरकार येईल. मनोहर पर्रीकर यांनी दाखवलेल्या मार्गाने आम्ही जाऊ आणि पुन्हा सत्ता स्थापन करू, असा विश्वास भाजपचे गोवा निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

पुढील काही दिवस पावसाचे

आजपासून पुढील पाच दिवस पावसाचेच. हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी.

ऑनलाईन पद्धतीने लोकांना लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

गोव्यात बसून विदेशी लोकांना ऑनलाईन पद्धतीने लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. मोरजी येथील हॉटेलमध्ये चालणाऱ्या बनावट कॉल सेंटरवर छापा. क्राईम ब्रांच व सायबर क्राईमची संयुक्त कारवाई. मुख्य संशयित दिग्विजय पुरोहितसह १३ जणांना अटक, २७ संगणक, लॅपटॉप, मोबाईल व इतर साहित्य जप्त.

‘चिपी’च उद्घाटन 9 ऑक्टोबरला ; नारायण राणेंची घोषणा

चिपी विमानतळाच्या  उद्घाटना मुहूर्त सापडला आहे. हा विमानतळ 9 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. याबाबत केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री  नारायण राणे यांनी तशी घोषणा केली आहे.

गणेशोत्सवाच्या काळात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहनांना बंदी

गणेशोत्सवाच्या काळात मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्ग 16 टन किंवा 16 टनापेक्षा जास्त वजन क्षमता असलेल्या अवजड वाहने, ट्रक, मल्टी ॲक्सल, ट्रेलर वाहनांची वाहतूक उद्यापासून 10 सप्टेंबर रात्री 8 वाजेपर्यंत पूर्णतः बंद राहणार आहे.

सिंधुदुर्गात केवळ 45  कोरोनाबाधितांची नोंद

सिंधुदुर्गात कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत आज मोठी घट झालीय. आज कोरोनाचे केवळ 45  नवे  रुग्ण मिळाले.

रत्नागिरी जिल्ह्यातील अतिवृष्टीचा धोका टळला

मुसळधार कोसळणाऱ्या रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले होते. तूर्तास रत्नागिरी जिल्ह्याचा अतिवृष्टीचा धोका टळला आहे.

सिंधुदुर्गात कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त अधिक

सिंधुदुर्गात कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्तची संख्या अधिक आहे. आज 62 जनांनी कोरोनावर मात केलीय.

सिंधुदुर्गात कोरोनामुळे देवगडातील एकाचा मृत्यू

सिंधुदुर्गात कोरोनामुळे मृतांची संख्या  1 हजार 375वर पोहचलीय. मागील 24 तासात कोरोनामुळे देवगड येथील एकाचा मृत्यू झालाय.

राज्य सामायिक प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

शैक्षणिक वर्ष 2021-22 करिता राज्य सामायिक प्रवेश परीक्षा 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर 2021 या कालावधीत होणार असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी जाहीर केले.

मुंबई महापालिकेत आता केंब्रिज बोर्डाच्याही शाळा: आदित्य ठाकरे

मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये केंब्रिज बोर्ड सुरू करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.राज्याचे पर्यावरण आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी याबाबत माहिती दिली.

‘अँटिलिया’ प्रकरणाची दिशाभूल करण्यासाठी परमबीर सिहांनी सायबर एक्सपर्टला दिली लाच

माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी अँटिलिया कांड प्रकरणाची दिशाभूल करण्यासाठी जैश उल हिन्द नावाच्या दहशतवादी संघटनेशी संबंधिक अहवालात छेडछाड केली असल्याचा दावा एक्सपर्टनं केला आहे. यासाठी  परमबीर सिंह यांनी सायबर एक्सपर्टला पाच लाखांची लाच दिली असल्याचंही त्यानं सांगितलं आहे.

बेळगावात मराठी माणसाचा नाही, संजय राऊत यांच्या अहंकाराचा पराभव

देवेंद्र फडणवीस यांनी  खासदार संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिले आहे. बेळगावात मराठी माणसाचा नव्हे, तर खासदार संजय राऊत यांच्या अहंकाराचा पराभव झाला आहे, असे टीकास्त्र फडणवीस यांनी सोडले आहे.

राष्ट्रवादी हा पक्ष म्हणजे गाजराची पुंगी, कधीही विसर्जित होऊ शकतो

‘गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली, अशी एक म्हण आहे. राष्ट्रवादी हा पक्ष जास्त दिवस टिकणारा नाही. कधीही विसर्जित होऊ शकतो,’ अशी बोचरी टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

बारामतीच्या दशरथ जाधव यांनी  64व्या वर्षी  पटकावला आयर्न मॅनचा किताब

बारामतीतील दशरथ जाधव यांनी वयाच्या 64व्या वर्षी आर्यन मॅन स्पर्धा पूर्ण केलीये. जर्मनी येथे झालेल्या आर्यन मॅन स्पर्धेत बारामतीतील दशरथ जाधव यांनी बाजी मारली आहे.

भारताने लसीकरणाचा 70 कोटीचा टप्पा ओलांडला

देशात आतापर्यंत कोरोना लसीचे 70 कोटी 67 लाख 36 हजार 715 डोस देण्यात आले आहेत. तर राज्यात सहा कोटी 40 लाख 78 हजार 584 इतके डोस देण्यात आले आहेत.

निपाह व्हायरसमुळे 200 हून अधिक जणं आयसोलेशनमध्ये

कोझिकोड परिसरातच सुमारे 11 लोकांमध्ये निपाह विषाणूची लक्षणं आढळली आहेत. मृत्यू झालेल्या मुलाच्या संपर्कात आलेल्या सुमारे 251 लोकांना आयसोलेट करण्यात आलंय.

मुलींना मिळणार NDA मध्ये प्रवेश

NDA आणि नौदल अकादमीमध्ये महिला कॅडेट्सच्या प्रवेशाचा आणि त्यांच्या कायमस्वरूपी कमिशनचा देखील मार्ग मोकळा झाला.  दरम्यान, सरकारने या दोन्ही संस्थांमध्ये महिला कॅडेट्सना प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे.

इम्युनोसप्रेसंटघेणाऱ्यांना लस घेतल्यानंतरही लावावं लागेल मास्क

सीडीसीच्या अलीकडील सूचनांनुसार, जे लोक इम्यूनोसप्रेसेन्ट्स घेतात त्यांनी सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्क घालणं आवश्यक आहे.

मुकेश अंबानी 100 अब्ज डॉलर्स क्लबच्या शर्यतीत

ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, 64 वर्षीय मुकेश अंबानी 92.6 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह जगातील 12 व्या क्रमांकाचे श्रीमंत आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीज चे अध्यक्ष शेअर्स वाढीमुळे 100 अब्ज डॉलर क्लबमध्ये सामील होण्याच्या शर्यतीत आले आहेत.

लहान मुलांसाठी पहिली लस ऑक्टोबरमध्ये येणार

लहान मुलांसाठी पहिली लस ऑक्टोबरमध्ये येणार असल्याची माहिती आहे. झायडस कॅडिला कंपनीची झायको-डी ही लस 12 ते 18 वयोगटातील मुलांसाठी ही लस उपलब्ध करून दिली जाणार आहे.

हिंसा हीच पाकिस्तानची संस्कृती, संयुक्त राष्ट्रासमोर भारताचं पाकिस्तानला प्रत्यूत्तर

अफगाणिस्तानातील बदलत्या राजकीय परिस्थिती दरम्यान भारतानं संयुक्त राष्ट्रात पाकिस्तानावर निशाणा साधलाय. पाकिस्तान आपल्या भूमीवर आणि सीमेपलिकडेही ‘हिंसेच्या संस्कृती’ला प्रोत्साहन देत आहे, अशी थेट टीका भारतानं पाकिस्तानवर केलीय.

सुशिक्षित मुलींमध्ये लग्नाआधी मूल होण्याचं प्रमाण वाढतंय?

सुशिक्षित महिलांना आता लग्नापूर्वी मूल हवं असल्याची इच्छा दिसून येते.  प्रोसीडिंग्स ऑफ द नॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्समध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार हि बाब आढळून आलीय.

कोविशिल्डसारखी लस निपाहविरूद्ध लढणार; संशोधकांचा दावा

निपाह व्हायरसविरोधात कोविशिल्ड सारखी लस यशस्वी असल्याचं समजलं आहे. निपाह विषाणूविरूद्ध माकडांच्या चाचण्यांमध्ये ही लस यशस्वी ठरली आहे.  संशोधकांच्या एका आंतरराष्ट्रीय संघाने हा दावा केला आहे.

तुरुंगात लागलेल्या आगीत 40 जणांचा होरपळून मृत्यू

इंडोनेशियाच्या बॅन्टेन प्रांतातील तुरुंगात बुधवारी पहाटेच्या सुमारास भीषण आग भडकली. या आगीत किमान 40 लोकांचा होरपळून बळी गेला आहे. तर 12 जण जखमी झाले आहेत, अशी माहिती सरकारी प्रवक्त्याने दिली आहे.

९/११ बाबत नवा दावा, हल्ल्याशी संबंधित आजारांमुळे अधिक लोकांचा मृत्यू

अल कायदाने अमेरिकेच्या जागतिक व्यापार केंद्रावर केलेल्या हल्ल्याशी संबंधित एक अहवाल समोर आला आहे. या अहवालानुसार, ९/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील मृत्यूपेक्षा अधिक मृत्यू या हल्ल्याशी संबंधित आजारामुळे झाला असल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे.

टीम इंडिया जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत अव्वल

इंग्लंडवर मिळवलेल्या विजयानंतर टीम इंडिया जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अव्वलस्थानी पोहोचली आहे. पाकिस्तान दुसऱ्या तर वेस्ट इंडिज तिसऱ्या स्थानावर आहे. भारताने 26 गुणांची कमाई करत ही कामगिरी केली आहे. 

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!