SUPERFAST NEWS | महत्त्वाच्या घडामोडींचा Express आढावा

महत्त्वाच्या घडामोडी झटपट... एका क्लिकवर

Goan Varta Live | प्रतिनिधी

सोमवारची कोविड आकडेवारी

राज्याच्या आरोग्य खात्याने जारी केलेल्या कोविड बुलेटिननुसार गेल्या २४ तासांत राज्यात कोविडचे २ बळी गेले आहेत. तसंच सोमवारी कोविडचे ६७ नवे रुग्ण सापडले आहेत.

यंदाची चतुर्थी कोविड नियमावलीसह

गणेश चतुर्थीसाठी पणजी महापालिकेची मार्गदर्शक तत्वे

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची राज्यांना नवी मार्गदर्शक तत्वे

कोविड पॉझिटिव्ह झाल्यानंतर ३० दिवसांच्या कालावधीत मृत्यू आल्यास किंवा कोविडमुळे इस्पितळ/रुग्णाश्रयात दाखल केल्यानंतर ३० दिवसांपेक्षा जास्त काळ दाखल राहून एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यास तो कोविड मृत्यू धरला जाईल. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची राज्यांना नवी मार्गदर्शक तत्वे.

7 सप्टेंबर रोजी राज्यात मुसळधार

आज व उद्या ७ सप्टेंबरला राज्यात अनेक भागांत मुसळधार पाऊस असेल. त्यानंतर ८, ९ आणि १० सप्टेंबरला पाऊस सक्रियच राहील. बंगालची खाडी, दक्षिण ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनारी भागांत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे पुढील चार दिवस पाऊस सक्रिय असेल.

ईफ्फी 2021 ची प्रतिनिधी नोंदणी सुरू

राज्यात होणार्‍या ५२ व्या ईफ्फी 2021 आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी http://dff.gov.in वर प्रतिनिधी नोंदणी सुरू.

अविश्वास ठराव बारगळला

भिरोंडा सरपंच तेरेझा आंद्राद यांच्यावर दाखल करणात आलेला अविश्वास ठराव ३ विरुद्ध २ मतांनी बारगळला. दोन पंचांची अनुपस्थिती.

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना टोल माफ

यंदाही गणेशोत्सवासाठी गावाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांना कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी मुंबई, गोवा, पुणे एक्सप्रेस टोल माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नाईट कर्फ्यु लावला जाणार नाही :  विजय वडेट्टीवार

गणेशोत्सव काळात काही नवे नियम लागू केले जाऊ शकतील, मात्र ते दोन तीन दिवसात निर्णय घेतले जातील.. नाईट कर्फ्यु लावला जाणार नाही, तशी चर्चा ही आजच्या बैठकीत झालेली नसल्याची माहिती मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.  

अनिल देशमुखांविरोधात ईडीची लूकआऊट नोटीस जारी; याचिकाकर्त्यांचा दावा

अनिल देशमुख  यांच्याविरोधात ईडीनं लूकआऊट नोटीस जारी केल्याचा दावा याचिकाकर्त्या जयश्री पाटील यांनी केला आहे. अनिल देशमुखांना लवकरच अटक होऊ शकते, असा दावाही जयश्री पाटील करत आहेत.

देशाचे पंतप्रधान हेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक आहेत: नाना पटोले

देशाचे पंतप्रधान हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक आहेत. त्यामुळेच देश विकला जात असतानाही RSS काहीच बोलत नाही, असा घणाघात  काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी केलाय.

नितेश राणेंचं जावेद अख्तर यांना चर्चेसाठी खुले आव्हान;  पत्र लिहून बिनशर्त माफी मागण्याची मागणी

ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी rss ची तुलना तालिबनय्न्बरोबर केल्यान भाजपा आक्रमक झालीय.आमदार नितेश राणे यांनी जावेद अख्तर यांना पत्र लिहून हिंदूंची बिनशर्त माफी मागण्याची मागणी केली आहे. एवढेच नाही तर चर्चेसाठी खुले आव्हानही दिलं आहे.

बेळगाव महापालिका निवडणुकीत भाजपाची सत्ता

कर्नाटकासह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून राहिलेल्या बेळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं आहे.

रत्नागिरीत आंजर्ले समुद्रामध्ये बोट बुडाली

रत्नागिरी जिल्ह्यात दापोली तालुक्यात आंजर्ले समुद्रामध्ये एक बोट बुडाली असल्याची माहिती समोर येत आहे. रत्नागिरीमध्ये सध्या जोरदार पाऊस सुरु असल्याने  समुद्रही खवळला असताना बोट बुडाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

तपासणीचा ससेमिरा चुकवण्यासाठी चाकरमान्यांचा आड मार्गाचा अवलंब

तपासणीचा ससेमिरा चुकवण्यासाठी रेल्वे प्रवासी अन्य आड मार्गांचा अवलंब करत आहेत. मळगाव पाठोपाठ  कणकवली रेल्वे स्टेशनवर हे चित्र पाहायला मिळालं.

सिंधुदुर्गात केवळ 17 कोरोनाबाधितांची नोंद

सिंधुदुर्गात कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत आज मोठी घट झालीय. आज कोरोनाचे केवळ 17 नवे  रुग्ण मिळाले.

नियोजनाची कोंडी; गाड्यांच्या लागल्या रांगा

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी शहरात वाहतूक कोंडी झालाय्ने नियोजन बोजवारा उडालाय.  मोती तलावकाठी बेशीस्त पार्किंगमुळे एसटी अडकल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

पर्यटनास मनाई; मात्र आंबोली फुलले

पर्यटनास मनाई असताना देखील महाराष्ट्रासह गुजरात, गोवा, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा राज्यांतील पर्यटक आंबोलीत दाखल झाले असून पर्यटनाचा आनंद लुटताना दिसत आहेत.

सिंधुदुर्गात कोरोनामुळे कुडाळातील एकाचा मृत्यू

सिंधुदुर्गात कोरोनामुळे मृतांची संख्या  1 हजार 373 वर पोहचलीय. मागील 24 तासात कोरोनामुळेकणकवली नाटळ येथील एकाचा मृत्यू झालाय.

महाराष्ट्रात 6 – 9  सप्टेंबर दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे 6 ते 9 सप्टेंबर दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार  पावसाची शक्यता आहे.

…तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल; मुख्यमंत्री

‘महाराष्ट्रासह संपूर्ण देश करोनाच्या तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर आहे. हा धोका सगळ्यांनी गांभीर्यानं घेतला नाही, तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल,’ असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

उद्धव ठाकरेंची सूचना राष्ट्रवादी पाळणार, गर्दीच्या कार्यक्रमांना बंदी

गर्दी होईल असा एकही राजकीय कार्यक्रम घेण्यास राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने मनाई करण्यात आली आहे. पक्षाच्या माध्यमातून तसे कार्यक्रम होणार नाहीत ही पक्षाची भूमिका आहे,” अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे.

करुणा शर्मा यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

बीडमधील अंबाजोगाई सत्र न्यायालयाने जातीवाचक  शिवीगाळ आणि गाडीत पिस्तूल आढळल्याप्रकरणी करुणा शर्मा यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याचबरोबर त्यांच्या वाहनचालकास एक दिवसाची पोलीस कोठडी देखील सुनावली गेली आहे.

वाघ आहे मी लक्षात ठेवा; कोल्ह्या कुत्र्यांना घाबरणारी नाही

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी केलेल्या टीकेला भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी उत्तर दिलं आहे.वाघ आहे मी लक्षात ठेवा; कोल्ह्या कुत्र्यांना घाबरणारी नाही अशा शब्दांत उत्तर दिलं आहे.

रासायनिक कीटकनाशकांकडेच शेतकऱ्यांचा कल

शेतात रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमीत कमी व्हावा म्हणून केंद्र शासन प्रयत्नशील असले तरी महाराष्ट्रत मागील तीन वर्षांत त्यांच्या वापरात सरासरी १० ते १३ टक्के वाढ झाल्याचे आढळते.

पुण्यात १४ वर्षीय मुलीवर आठ जणांकडून सामूहिक बलात्कार

पुण्यात एक अत्यंत संतापजनक अशी घटना घढली आहे, एका १४ वर्षीय मुलीवर आठ जणांनी बलात्कार केल्याची घटना घडली असून, पीडित मुलीवर उपचार सुरू असल्याचे वानवडी पोलिसांकडून सांगण्यात आले.

NEET परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

१२ सप्टेंबर रोजी होणाऱ्या राष्ट्रीय प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

1 ऑक्टोबरपासून 12 तास करावं लागणार काम?

मोदी सरकार 1 ऑक्टोबरपासून New Wage Code लागू करण्याच्या तयारीत आहे. नवीन कामगार कायद्यांमध्ये 12 तासांचं ऑफिस टायमिंग करण्याची तरतुद आहे.

पंजशीरवर ताबा मिळवल्यानंतर तालिबानचा धमकी वजा इशारा

अफगाणिस्तानमधील संपूर्ण युद्धविराम लागल्याची घोषणा तालिबानने जारी केलेल्या पत्रकात केली. जर कोणी समस्या निर्माण करण्याचा प्रयत्न करेल त्याला पंजशीरप्रमाणे हाताळले जाईल”, असा इशारा तालिबान्यांनी दिला आहे.

तालिबान सरकार स्थापन करणार; ‘या’ सहा देशांना दिले निमंत्रण

तालिबानने आता सरकार स्थापन करण्याच्या हालचालींना वेग दिला आहे. सरकार स्थापना सोहळ्यासाठी सहा देशांना आमंत्रणे पाठवण्यात येणार असल्याचे म्हटले जात असून यामध्ये पाकिस्तान, रशिया, इराण, कतार आणि तुर्की या देशांना आमंत्रण असणार आहे.

पाकिस्तानी हवाई दलाच्या ड्रोन्समधून पंजशीरवर बॉम्बहल्ला

अफगाणिस्तानातील प्रतिकार दलांचा शेवटचा बालेकिल्ला असलेल्या पंजशीर प्रांतावर पाकिस्तानी हवाई दलाच्या ड्रोनने बॉम्बहल्ला केला, असे वृत्त रविवारी देण्यात आले.

तालिबान्यांनी महिला पोलिसाला कुटुंबीयांसमोरच घातल्या गोळ्या

अफगाणिस्तानच्या गोर प्रांतात तालिबानच्या दहशतवाद्यांनी एका महिला पोलिसाला तिच्या कुटुंबीयांसमोरच गोळ्या घालून ठार केलं. एका स्थानिक पत्रकाराने ट्विट करून या घटनेची माहिती दिली.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!