SUPERFAST NEWS | महत्त्वाच्या घडामोडींचा Express आढावा

महत्त्वाच्या घडामोडी झटपट... एका क्लिकवर

Goan Varta Live | प्रतिनिधी

‘गोव्यातील थापेबाजीचा अंत व्हावा’

भारतीय जनता पक्षाच्या सध्याच्या सरकारविरुद्ध लोकांत प्रचंड संताप, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत ‘सरकार तुमच्या दारी’ या उपक्रमात करतायत थापेबाजी, या थापेबाजीवर एखाद्याला प्रबंध लिहून डॉक्टरेट मिळवता येईल, सामना अग्रलेखातून शिवसेनेची गोव्यातील भाजप सरकारवर घणाघाती टीका

गोव्यातील थापेबाजीचा अंत व्हावा असे कुणालाच का वाटू नये?

गोव्यात निवडणुका आल्या की नवे पक्ष, नव्या आघाड्या निर्माण होतात, स्वतःचे दोनेक आमदार निवडून आणतात व जे सरकार येईल त्यांच्यात सामील होऊन स्वतःचे उखळ पांढरे करून घेतात, यात गोव्याचे नुकसानच, गोव्यातील उद्याच्या निवडणुकांत तरी हे चित्र बदलावे, गोव्याचे राजकीय डबके करणारे आजचे राजकारणी पोर्तुगीज सत्तेचेच वारसदार, गोव्यातील थापेबाजीचा अंत व्हावा असे कुणालाच का वाटू नये? म्हणत शिवसेनेने केला सवाल

गोव्यात सध्या धावत्या पर्यटनाची एक नवी फॅशन

गोव्यात सध्या धावत्या पर्यटनाची एक नवी फॅशन, काही लोक गोव्यात खास करमणूक नाही असं सांगून परतात, निवडणूक मोसमात गोव्यात या आणि मनोरंजनाचा आनंद घ्या, शिवसेनेने साधला गोव्याच्या राजकारणावर निषाणा

फालेरोंचा मोठा विनोद

गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे आमदार लुईझिन फालेरो यांनी काँग्रेसचा त्याग केला आणि आमदारकीचाही राजीनामा दिला, मी नावेलीमधील आपल्या समर्थकांशी चर्चा करून निर्णय घेतला असल्याचे केले वक्तव्य, फालेरोंनी केलेले हे वक्तव्य हा मोठाच विनोद, मतदारांना गृहीत धरून नेता परस्पर निर्णय घेतो आणि जनतेची फरफट सुरू होते, गोव्यात गेली काही वर्षे जनतेची अशीच फरफट सुरू, म्हणत गोव्याच्या राजकारण्यांवर शिवसेने साधला निषाणा

गोव्यात भाजपचा आकडा फुगला, हे नैतिकतेचे राजकारण नाही

भारतीय जनता पक्ष सत्तेवर आहे तो स्वतःच्या ताकदीवर नाही, मागच्या विधानसभा निवडणूक निकालानंतर भाजप होता अल्पमतात, काँग्रेस पक्षाने सर्वाधिक 17 आमदार जिंकूनही सत्ता स्थापनेच्या दाव्यास केला उशीर, भाजपने फोडाफोड करून बहुमत घेतले विकत, गोव्यात 17 आमदारांवरून काँग्रेस पक्ष चारवर आला, भाजपचा आकडा फुगला, हे काही नैतिकतेचे राजकारण नाही म्हणत गोव्यातील भाजप सरकारव केली तिखट टीका

भाजप ही गोव्यातली खरी ‘बीफ’ पार्टी

भाजप ही गोव्यातली खरी ‘बीफ’ पार्टी असून हिंदुत्व हा फक्त मुखवटा, देशात गोवंशहत्या बंदी कायदा लागू आहे, पण गोव्यात हवे तितके ‘बीफ’ म्हणजे गोमांस मिळते, हे ढोंग नाही तर काय? म्हणत शिवसेनेने गोव्याचील भाजप सरकारवर उपस्थित केला सवाल

गोव्यात ममतादीदींचे पोस्टर झळकले

‘गोंयची नवी सकाळ,’ गोव्यात ममतादीदींचे पोस्टर झळकले; माजी मुख्यमंत्रीही लुईझीन फालेरो तृणमूलच्या गळाला

लुईझिन फालेरोंचा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत माजी मुख्यमंत्री लुईझिन फालेरो, लवू मामलेदार यांच्यासह दहा जणांनी केला तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश.

‘तो’ व्हिडिओ स्टाफसोबतच्या वार्षिक सहलीचा

‘तो’ व्हिडिओ स्टाफसोबतच्या वार्षिक सहलीचा, वायरल व्हिडिओवर दिगंबर कामतांनी दिलं स्पष्टीकरण, दोन दिवसांपूर्वी व्हिडिओ सोशल मीडियावर झाला होता तुफान वायरल, व्हिडिओमध्ये कामत उभे होते काजुच्या झाडावर, ‘मीच विजयी होणार’ अशी दिली होती पोज

बुधवारची कोविड आकडेवारी

राज्याच्या आरोग्य विभागाने जारी केलेल्या कोविड बुलेटिननुसार राज्यात बुधवारी कोविडचे आणखी ४ बळी गेलेत, तर नव्या ८३ रुग्णांची नोंद झालीये. बुधवारचे नवे कोविड रुग्ण सापडल्यानंतर राज्यातील सक्रिय रुग्ण संख्या ८३० वर पोहोचलीये.

नागवा येथे क्राईम ब्रांचची कारवाई

नागवा येथे क्राईम ब्रांचने वेशाव्यवसाय विरोधी कारवाईखाली प्रवीण जैन व प्रशांत मोहित या दोन दलालांना अटक केली. तसेच तीन युवतींची सुटका केली.

अंतिम निर्णय कृतिदल घेईल

९ वी ते १२ वी पर्यंतचे प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्यासंदर्भात अंतिम निर्णय कृतिदल घेईल. त्यानंतर शिक्षण खाते त्याची अंमलबजावणी करेल. नाटकांना ५० टक्के प्रेक्षक क्षमतेस‌ मुभा. धार्मिक स्थळांवर निर्बंध नसतील. भाविकांनी कोविड नियमावलीचे पालन करणे आवश्यक : मुख्यमंत्री

आयपीएल सट्ट्याचा गोवा पोलिसांच्या क्राईम ब्रांचकडून पर्दाफाश

कळंगुट येथे एका गेस्ट हाऊसमध्ये चालणाऱ्या आयपीएल सट्ट्याचा गोवा पोलिसांच्या क्राईम ब्रांचकडून पर्दाफाश. रोख रकमेसह २ लाखांचा मुद्देमाल जप्त. प्रताप सिंग, राजीव सिंग, मोहन लाल व अजय यादव (सर्व राजस्थान) या संशयितांना अटक. मंगळवारी रात्रीची कारवाई.

दणक्यानंतर भानावर…!

नेरुल समुद्रकिनारी समुद्राच्या पाण्यात दुचाकी चालवणाऱ्या पंजाबी पर्यटकांना पर्वरी पोलिसांनी दंड ठोठावले. गोवा पर्यटनासाठी उत्तम ठिकाण आहे. समुद्राच्या पाण्यात दुचाकी नेण्याचा प्रकार आपल्याकडून अनभिज्ञपणे घडला, असा खुलासा देणारा संदेश या पर्यटकांनी दिला आहे.

मुख्य सचिव परिमल राय ई-मेल एड्रेस हॅक प्रकरणः संशयिताला आणले गोव्यात

मुख्य सचिव परिमल राय यांचा ई-मेल एड्रेस हॅक करून पैसे उकळण्याचा प्रयत्न करणार्‍या सायबर रॅकेटचा सूत्रधार शिवकुमार गॅगवार व गुलाम गौस या संशयितांना गोवा पोलिसांच्या क्राईम ब्रांचने बरेलीतून (उत्तर प्रदेश) गोव्यात आणले.

न्यायालयाने सचिन वाझेची याचिका फेटाळली

सचिन वाझेने आपल्या सर्जरीनंतर घरातच नजर कैदेत ठेवण्याची केली होती मागणी, न्यायालयाने याचिका फेटाळली, सचिन वाझेला आता तळोजा जेलमधील हॅास्पिटलमध्ये शिफ्ट केले जाणार

एसबीआयमध्ये नोकरीची संधी

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी, एकूण ६०६ पदांसाठी होणार भरती; अधिसूचना जारी, नोकरी इच्छुक १८ ऑक्टोबर पर्यंत अधिकृत वेबसाइट ऑनलाईन अर्ज करू शकतात

इम्फाळ विमानतळावर मोठ्या तस्कराला अटक 

सीआयएफएफ आणि कस्टम्स अधिकाऱ्यांची इम्फाळ विमानतळावर मोठी कारवाई, मोठ्या तस्कराला केली अटक, हा तस्कर 900 ग्रॅमपेक्षा जास्त वजनाच्या सोन्याची तस्करी करत होता, सोन्याची किंमत सुमारे 42 लाखांहून अधिक, चक्क पोटाच्या गुदाशयात लपवलं होतं सोनं 

35 वर्षीय जावेद रुस्तमपूरला ड्रग्जप्रकरणी अटक

एमबीए असलेला 35 वर्षीय जावेद रुस्तमपूरला ड्रग्जप्रकरणी अटक; बंगळुरु येथे कारवाई; चक्क घरातच उगवला गांजा; हायड्रोफोबिक मॉडेल पाहून पोलिसही आश्चर्यचकित

कॅप्टन अमरिंदर सिंग भाजपात प्रवेश करणार?

पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेण्यासाठी दिल्लीच्या निवासस्थानी दाखल, गेल्या काही दिवसात पंजाबमधील राजकीय वातावरण ढवळून निघाल्यानंतर अमरिंदर सिंग अमित शाह यांच्या भेटीला गेल्याने राजकीय चर्चांना उधाण, कॅप्टन अमरिंदर सिंग भाजपात प्रवेश करणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा

मोदी सरकारची मोठी घोषणा

मोदी सरकारची मोठी घोषणा, सरकारी शाळेत दुपारचं जेवण मोफत, कोट्यवधी मुलांना फायदा होणार

चीनची पुन्हा घुसखोरी

चीनची पुन्हा घुसखोरी, उत्तराखंडच्या बाराहोटी सेक्टरमध्ये 100 चिनी सैनिक शिरले आणि परतले, भारताच्या सैन्य संस्था अलर्टवर

पुन्हा परीक्षा घ्या…!

नीट यूजी परीक्षेतील गैरप्रकारामुळं संतप्त विद्यार्थी सुप्रीम कोर्टात, परीक्षा पुन्हा घेण्याची केली मागणी, 12 सप्टेंबरला आयोजित करण्यात आलेल्या नीट यूजी परीक्षेतील गैरप्रकार समोर आल्यानंतर विद्यार्थी भडकले

फिरकीपटू कुलदीप यादवची शस्त्रक्रिया पूर्ण

 फिरकीपटू कुलदीप यादवची शस्त्रक्रिया पूर्ण, ट्विट करत दिली माहिती, लवकरात लवकर मैदानावर परतून जे करायला आवडतं ते मी करणार म्हणत झाला व्यक्त, पोस्टमध्ये शेअर केला स्वत:चा रुग्णालयातील फोटो

फुमियो किशिदा जपानचे नवे पंतप्रधान

फुमियो किशिदा जपानचे नवे पंतप्रधान म्हणून नियुक्त, आधी होते परराष्ट्र मंत्री, लिबरल डेमोक्रेटिक पार्टी (एलडीपी) चे प्रमुख, पंतप्रधान योशीहिदे सुगा यांची जागा घेतली 

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!