SUPERFAST NEWS | महत्त्वाच्या घडामोडींचा Express आढावा

महत्त्वाच्या घडामोडी झटपट... एका क्लिकवर

Goan Varta Live | प्रतिनिधी

अजून एक अपघात

बेतोडा जंक्शनजवळ सोमवारी रात्री झालेल्या अपघातात सेल्विन सांतान फर्नांडिस या २८ वर्षीय स्थानिक युवकाचा मृत्यू.

‘गुलाब’ चक्रीवादळाचा धोका टळण्याची शक्यता

‘गुलाब’ चक्रीवादळाची तीव्रता कमी होत असल्यामुळे धोका टळण्याची शक्यता आहे. पण गोव्यात काही ठिकाणी जोरदार पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. दरम्यान, ‘गुलाब’चा प्रभाव कमी होत असला तरी ‘शाहीन’ नावाचे नवे चक्रीवादळ येण्याची शक्यता आहे.

नवज्योतसिंग सिद्धू यांनी दिला पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा

नवज्योतसिंग सिद्धू यांनी दिला पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा. कारण गुलदस्त्यात. मुख्यमंत्रिपद न मिळाल्याने निराश होऊन राजीनामा दिल्याची चर्चा.

आवेर्तान फुर्तादो यांचा काँग्रेस प्रवेश

माजी मंत्री तथा नावेलीचे माजी आमदार आवेर्तान फुर्तादो यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश. विधानसभा निवडणूक नावेलीतून लढवण्याची शक्यता.

‘गोंयांत बदल जाय, केजरीवाल जाय’

आम आदमी पक्षाने (आप) आज ‘गोंयांत बदल जाय, केजरीवाल जाय’ या नवीन प्रचार मोहिमेची सुरुवात. ‘आप’च्या पणजी कार्यालयात पक्षाचे गोवा उपाध्यक्ष वाल्मिकी नाईक, ‘आप’ राष्ट्रीय युवा उपाध्यक्ष सेसिल रॉड्रिग्स आणि ‘आप’ नेते डॉ. विभास प्रभुदेसाई यांनी या मोहिमेची घोषणा

लुईझिन फालेरो यांचा कोलकाता दौरा

लुईझिन फालेरो, लवू मामलेदार,एड.यतीश नाईक, विजय पै, मारियो पिंटो,आनंद नाईक,एन.शिवदास पश्चिम बंगालमध्ये दाखल. उद्या ममता बॅनर्जींच्या उपस्थितीत होणार पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम

मायकल लोबोंचा दिल्ली रवाना

गोव्याच्या राजकीय क्षेत्रात नाट्यमय घडामोडी, मंत्री मायकल लोबोंचा तातडीने दिल्ली दौरा, कुणाला भेटणार याविषयी विविध तर्कवितर्क

मंगळवारी कोविड बळींची संख्या वाढली

राज्याच्या आरोग्य विभागाने जारी केलेल्या कोविड बुलेटिननुसार राज्यात मंगळवारी कोविडचे आणखी ५ बळी गेलेत. मंगळवारी राज्यात ९० नवे रुग्ण सापडलेत. त्यामुळे राज्यातील सक्रिय रुग्ण संख्या ८३३ वर पोहोचलीये.

आग्नेल फर्नांडिस राहुल गांधींच्या भेटीला

माजी आमदार तथा प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस आग्नेल फर्नांडिस यांनी दिल्लीत घेतली ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांची भेट.

गोव्यातील समुद्रकिनारी पंजाबी पर्यटकांची मौजमस्ती

गोव्यातील एका समुद्र किनार्‍यावर पंजाबी पर्यटक थेट दुचाकी पाण्यात नेऊन मौजमजा करीत आहेत. त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

6 मजुरांची हेलिकॉप्टरमधून सुटका

तेरणा नदीच्या पुरात अडकलेल्या 6 मजुरांची हेलिकॉप्टरमधून सुटका, संध्याकाळच्या सुमारास बाहेर काढण्यात यश, अतिवृष्टीमुळे तेरणा धरण पूर्ण भरलं

गोदावरी नदीला वर्षातला तिसरा पूर

गोदावरी नदीला वर्षातला तिसरा पूर; नाशिकमध्ये दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी, प्रशासनाने नागरिकांना दिला दक्षतेचा इशारा

कोल्हापुरात दोन गँगमध्ये तुंबळ हाणामारी

कोल्हापुरात दोन गँगमध्ये तुंबळ हाणामारी, तीन गाड्यांची तोडफोड, आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथकं रवाना

भररस्त्यात मर्सिडीज पेटली

भररस्त्यात मर्सिडीज पेटली, गोंदियातील आगीत कार जळून खाक, गोंदिया जिल्ह्यातील देवरी येथून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाजवळील घटना 

कॉटनचे कपडे महागणार

झटका! कॉटनचे कपडे महागणार, कापसाचे दर पोहोचले 10 वर्षातील उच्चांकी पातळीवर, अपेक्षेपेक्षा कमी उत्पादन झाल्याने यंदा कापसाचे दर वाढू शकतात

कोरोना ऐवजी दिली रॅबिजची लस

कोरोना लस ऐवजी दिली रेबीजची लस; कळव्यातील आतकोनेश्वर नगर भागातील घटना, डॉक्टर आणि नर्सवर निलंबनाची कारवाई

3 मतदारसंघांच्या पोटनिवडणुका निवडणूक आयोगाने केल्या जाहीर

निवडणूक आयोगानं आज ३ लोकसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुका केल्या जाहीर, मध्य प्रदेशातील खांडवा मतदारसंघ, हिमाचल प्रदेशातील मंडी आणि दादरा नगर हवेली मतदारसंघांची पोटनिवडणूक येत्या ३० ऑक्टोबर रोजी होणार, आयोगानं १४ राज्यांमधल्या ३० विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकाही जाहीर केल्या, आसाममधल्या ५, पश्चिम बंगाल मधल्या ४, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि मेघालयातील प्रत्येकी ३, राजस्थान, बिहार आणि कर्नाटकातील प्रत्येकी २ मतदारसंघांचा समावेश

महागाईचा पुन्हा झटका

इंधनाचा भडका थांबेना… डिझेल सलग चौथ्या दिवशी तर पेट्रोलच्या दरांमध्ये २२ दिवसांनंतर झाली वाढ. मंगळवारी २८ सप्टेंबर २०२१ रोजी २२ दिवसांनंतर पेट्रोलचे तर सलग चौथ्या दिवशी डिझेच्या दरांमध्ये वाढ झालीय. सरकारी तेल कंपन्यांनी डिझेलचे दर २५ पैशांनी वाढवले आहेत. तर पेट्रोलचे प्रतिलीटर मागे २० पैशांनी वाढवण्यात आलेत. मुंबईमध्ये पेट्रोलचे दर प्रतिलिटरमागे २१ पैशांनी वाढलेत. मागील पाच दिवसांमध्ये डिझेलचे दर ९५ पैशांनी वाढलेत. 

कोलकाता नाईट रायडर्सचा विजय

दिल्लीचा विजयी रथ थांबवण्यात कोलकात्याला यश, 3 गडी राखून मिळवला दमदार विजय, केकेआरच्या माऱ्यासमोर दिल्ली गारद

माजी कर्णधार इंझमाम उल-हकला हृदयविकाराचा झटका

पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि मॅचविनर बॅट्समन इंझमाम उल हकला हृदयविकाराचा झटका, 3 दिवसांपासून सुरू होता त्रास,  सोमवारी आला हृदयविकाराचा सौम्य झटका, त्यानंतर इंझमाम यांना रुग्णालयात केलं दाखल, त्यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली, प्रकृती सध्या स्थिर असून रुग्णालयात उपचार सुरू

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!