SUPERFAST NEWS | महत्त्वाच्या घडामोडींचा Express आढावा

महत्त्वाच्या घडामोडी झटपट... एका क्लिकवर

Goan Varta Live | प्रतिनिधी

भाजपमधील अल्पसंख्याक आमदारांची संख्या 1 वरून १५ झाली

भाजपमधील अल्पसंख्याक आमदारांची संख्या एकवरून १५ झाली आहे. पक्षाने त्यासाठी १५ वर्षे मेहनत घेतली. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपमधून अल्पसंख्याक समाजातून निवडून येणार्‍या आमदारांची संख्या चांगली असल्यास अल्पसंख्याक मुख्यमंत्रीही होऊ शकतो, असं जोशुआ डिसोझा म्हणाले.

पोलिस निरीक्षकांच्या बदली

सुरज सामंत आगशी पोलीस स्थानकाचे निरीक्षक, विजय राणे सरदेसाई शापोरा किनारी पोलीस स्थानकाचे निरीक्षक तसेच विरेंद्र वेळुस्कर यांची एसपीसीआर पणजी येथे बदली

गुरुवारची कोविड आकडेवारी

आरोग्य विभागाने जारी केलेल्या कोविड बुलेटिननुसार गुरुवारी राज्यात 4 जणांचा कोविडमुळे मृत्यू झाला आहे. गुरुवारी ९२ नव्या कोविड रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या आता ९५० झाली आहे.

‘खोला मिर्ची’वर खास कव्हर

पोस्ट खाते काढणार काणकोणच्या ‘खोला मिर्ची’वर खास कव्हर. पोस्ट खात्याच्या गोवा विभागातर्फे शुक्रवार २७ ऑगस्ट रोजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांच्या हस्ते होणार प्रकाशन.

मी कोण आहे आणि ते कोण आहेत हे मतदारांना ठाऊक

इथे प्रत्येकाला किनाऱ्यावर बसून मासे हवेत. त्यांना कोणत्या प्रकारचे मासे मिळतात हे मलाही पाहायचे आहे. मी कोण आहे आणि ते कोण आहेत हे मतदारांना ठाऊक आहे, असं बाबूश मोन्सेरात म्हणाले. उदय मडकईकर आणि टोनी रॉड्रिग्ज यांच्या काँग्रेसमध्ये सामील होण्याचा निर्णयावर मोन्सेरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

वास्को – कुळे ‘डेमू’ रेल्वेसेवा सुरु

आजपासून वास्को – कुळे ८ डब्यांची डिझेल इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट (डेमू) रेल्वेसेवा सुरु. हुबळी विभागातील ही पहिलीची डेमू रेल्वेसेवा आहे.

माजी महापौर उदय मडकईकर काँग्रेसच्या वाटेवर

पणजीचे माजी महापौर उदय मडकईकर व टोनी रॉड्रिग्स काँग्रेस निरीक्षक पी. चिदंबरम यांच्या भेटीला. उदय पणजीतून, तर टोनी ताळगावातून काँग्रेसच्या उमेदवारीवर लढण्यास इच्छूक.

युतीबाबत तूर्त निर्णय नाहीः चिदंबरम

युतीबाबत तूर्त निर्णय नाही. काँग्रेसकडून ४० ही जागा लढवण्याची तयारी सुरू. स्वच्छ चारित्र्य, काँग्रेस विचारसरणी असलेल्यांना उमेदवारी. २०२२ मध्ये गोव्यात सरकार काँग्रेसचेच. जनतेचा काँग्रेसला पूर्ण पाठिंबा , असल्याचा विश्वास पी. चिदंबरम यांनी व्यक्त केला.

…तर राजकारणातून संन्यास घेईन: उदय सामंत

नारायण राणेंच्या जनआशीर्वाद यात्रेसाठी जमावंबदी लागू करण्यात आलेली नाही अस सानागताना राणेंच्या अटकेसाठी मी दबाव टाकल्याचं सिद्ध झालं तर राजकारणातून संन्यास घेईल असं उदय सामंत म्हणाले

नारायण राणेंच्या स्वागताचे बॅनर फाडणाऱ्या युवकांना राणे स्टाईल समज

खारेपाटण इथं नारायण राणे यांच्या स्वागताचे बॅनर युवकांनी फाडले. भाजपच्या पदाधिकार्यांनी त्या दोन युवकांचा शोध घेतराणे स्टाईलने समज देत  चांगलाच प्रसाद दिलाय.

मालवणात आंदोलन प्रकरणी गुन्हे दाखल

जिल्हाधिकारी यांच्या मनाई आदेशाचा भंग करून जमाव करत सामना वृत्तपत्राच्या प्रति जाळल्या प्रकरणी भाजप पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यावर मालवण पोलीस ठाणे बुधवारी रात्री गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

भीषण अपघातात शिक्षक जागीच ठार

नांदगाव वरून देवगड च्या दिशेने येत असताना तळेबाजार येथील भवानी मंगल कार्यालय नजीक शिक्षक गोविंद सहदेव सारंग यांचा गाडीवरील ताबा सुटला. या भीषण अपघातात गोविंद सारंग जागीच ठार झाले.

सिंधुदुर्गात कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत सलग 14 व्या दिवशी मोठी घट

सिंधुदुर्गात कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत सलग 14 व्या दिवशी गुरुवारी मोठी घट झालीय. आज कोरोनाचे  केवळ 46 नवे रुग्ण मिळाले.

सिंधुदुर्गातून गुरुवारी  61कोरोनामुक्त

सिंधुदुर्गातून कोरोनामुक्तच प्रमाणही आता वाढत आहे. गुरुवारी  61 जनांनी कोरोनावर मात केलीय.

सिंधुदुर्गात कोरोनामुळे आतापर्यंत 1 हजार 343 जणांचा मृत्यू

सिंधुदुर्गात कोरोनामुळे मृतांची संख्या 1 हजार 343  वर पोहचलीय. मागील 24 तासात गुरुवारी तिघांचा मृत्य झालाय.

राज्यात डेल्टा प्लसचा 24 जिल्ह्यांमध्ये प्रादुर्भाव; रुग्णांची संख्या 103 वर

राज्यातील 24 जिल्ह्य़ांमध्ये डेल्टा पल्स कोरोनाच्या व्हेरिएंटच्या रुग्णांची संख्या 103 वर पोहचलीय. यात 50 टक्के रुग्ण हे विदर्भ आणि कोकण विभागातले आहेत. संख्या वर पोहोचली आहे.

नशेचे इंजेक्शन देऊन तरुणीवर बलात्कार; आठ महिन्यांपासून डांबून ठेवले होते

नशेचे इंजेक्शन देऊन अल्पवयीन तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना पुण्यातून समोर आली आहे. गेल्या आठ महिन्यांपासून तरुणीला खोलीमध्ये डांबून ठेवून अत्याचार सुरू होता.

महाराष्ट्रात दीड वर्षात तब्बल 1लाखांहून अधिक मृत्यूंची नोंद

२०२० मध्ये वर्षभरात आधीच्या वर्षीच्या तुलनेत कोरोनाचे तब्बल १ लाख ९३९ अधिक मृत्यू झालेत. गेल्या दीड वर्षांत कोरोनामुळे भारतात सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात झालेत आणि पारदर्शक आकडेवारीमुळे ही संख्या समोर आल्याचा दावा सरकारकडून केला जातो.

काही जुने व्हायरस परत आलेत; त्यांचा बंदोबस्त करायचाय’

नवे व्हायरस येत आहेतच, पण काही जुने व्हायरसही परत आले आहेत. त्या व्हायरसचा आणि या व्हायरसचा बंदोबस्त करायचा आहे,’ असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. त्यांच्या बोलण्याचा रोख नेमका कोणाकडे होता, यावर आता तर्कवितर्क सुरू झाले आहेत

‘त्या’ व्हिडीओप्रकरणी संजय राऊतांकडून अनिल परब यांची पाठराखण

सरकारला पोलिसांना आदेश देण्याचा अधिकार नाही का? अनिल परब जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. अशा शाबडत अनिल परब यांची संजय राऊत यांनी पाठराखण केलीय.

नितेश राणेंनी बेछूट आरोप सिद्ध करावेत अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरं जावं

राणे कुटुंबीयांनी केलेले बेछूट आरोप सिद्ध करावेत अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरं जावं असा इशारा वरुण सरदेसाई यांनी म्हटलं आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनी केलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.

करोना काळात महाराष्ट्रात ६० कंपन्यांनी केली दीड लाख कोटींची गुंतवणूक

कोरोना काळात महाराष्ट्रामध्ये ६० कंपन्यांनी गुंतवणूक केली असून एकूण दीड लाख कोटी रुपयांची गुंतवणूक या कालावधीमध्ये राज्यात झाली असल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली

प्रदूषणाचा होतोय पावसावर परिणाम ; पाऊस कमी होण्याची भीती

वाढलेल्या वायू प्रदूषणाचा भारतीय उपखंडातील मान्सूनवरही परिणाम होतोय. येत्या काही काळामध्ये भारतामध्ये वायू प्रदूषणाचा परिणाम म्हणून सरासरीपेक्षा १० ते १५ टक्के पाऊस कमी होण्याची भीती यामुळे वर्तवण्यात येत आहे.

6 महिन्यानंतर लसीचा प्रभाव ह्होतो कमी ; नव्या रिसर्चमध्ये खुलासा

केवळ 6 महिन्यांनंतर कोरोना लसीचा प्रभाव हळूहळू कमी होऊ लागतो, असा खुलासा नव्या रिसर्च  मधून समोर आलाय. कोविड लसीच्या दोन डोसनंतर, बूस्टर डोस देखील घ्यावा. ब्रिटनमध्ये हे संशोधन फायजर/ बायोनटेक आणि ऑक्सफोर्ड/एस्ट्राजेनेका या लसींवर केलं गेलं.

लहान मुलांना ऑक्टोबरपासून दिली जाणार करोनाची Zycov-D लस

येत्या ऑक्टोबरपासून लहान मुलांना करोनावरील Zycov-D ही लस दिली जाईल, असं NTAGI चे प्रमुख एन. के. अरोरा यांनी सांगिलं. तीन डोस असलेली ही लस आहे.

काळजी घ्या, सरकार विक्रीत व्यस्त ; राहुल गांधींचं खोचक ट्वीट

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर ताशेरे ओढले आहेत. कृपया आपली काळजी घ्या कारण भारत सरकार विक्रीत व्यस्त आहे, असा टोला राहुल गांधी यांनी मोदी सरकारला लगावला आहे.

ऑक्टोबरमध्ये देशात कोरोनाची तिसरी लाट येणार आहे का?

कोरोनाची तिसरी लाट ऑक्टोबर महिन्यापर्यंत येऊ शकते, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या अहवालात रॉयटर्स या वृत्तसंस्थेने 40 तज्ज्ञांशी बोलून केलेल्या सर्व्हेचा हवाला देण्यात आला आहे.

आता ब्लॅक फंगसचंही निदान शक्य; देशातलं पहिलं टेस्टिंग किट तयार

पश्चिम बंगालमधल्या शास्त्रज्ञांच्या एका गटाने ब्लॅक फंगसच्या निदानासाठीचं टेस्टिंग किट तयार केलं आहे. या आजाराचं निदान करणारं हे पहिलं भारतीय किट ठरणार आहे.

भारतात शरण घेण्यासाठी अफगाण नागरिकांना ई-व्हिसा अनिवार्य

ज्या अफगाणिस्तान नागरिकांचा पासपोर्ट हरवला आहे किंवा अगोदरपासूनच जारी करण्यात आलेले व्हिसा रद्द करण्यात येत असल्याचं गृह मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलंय. अफगाण नागरिकांना भारतात दाखल होण्यासाठी आता ‘ई व्हिसा’ अनिवार्य करण्यात आलाय.

तुमच्या घाणेरड्या अजेंड्यासाठी मला वापरू नका : नीरज चोपडा

पाकिस्तान खेळाडूबाबतच्या वक्तव्यावर नीरज चोपडाने एक व्हीडिओ ट्वीट करत स्पष्टीकरण दिलंय. हा नाहक वाद उभा केला जातोय. काही लोक त्यांच्या घाणेरड्या अजेंड्यासाठी माझ्या वक्तव्यांची मोडतोड करत असल्याचे तो म्हणाला

काबूलमध्ये तालिबानकडून पत्रकाराला बेदम मारहाण

तालिबानने एका पत्रकाराला बेदम मारहाण करण्यात आली आहे. या पत्रकारासोबत असलेल्या कॅमेरामनलाही बेदम मारहाण करण्यात आली. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे म्हटले जात आहे.

अमेरिकन गुप्तहेरांच्या करोना उगमाच्या अहवालाने चीन संतप्त

करोना विषाणूचा उगम चीनमध्ये झाला का यावर अमेरिकी गुप्तहेरांनी तयार केलेल्या अहवालावरून चीन संतप्त झाला आहे. चीनवर दोष ढकलण्यासाठी या मुद्द्याचे राजकीयीकरण केले जात असल्याचा आरोप चीनने केला आहे.

मादागास्कर देशातल्या लोकांवर किडे खाण्याची वेळ

गेल्या 40 वर्षांतील सर्वात भयंकर दुष्काळामुळं मादागास्कर देशाच्या दक्षिण भागातील शेतकऱ्यांची शेती पूर्णपणे उध्वस्त झाली आहे. त्यामुळं शेतीवर अवलंबून असलेल्या समुदायांना जगण्यासाठी किडे खाण्याचा मार्ग अवलंबावा लागला आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!