SUPERFAST NEWS | महत्त्वाच्या घडामोडींचा Express आढावा

महत्त्वाच्या घडामोडी झटपट... एका क्लिकवर

Goan Varta Live | प्रतिनिधी

३१ मार्च २०२२ पर्यंत गोव्यात वीज दरवाढ नाही-मुख्यमंत्री

३१ मार्च २०२२ पर्यंत गोव्यात वीज दरवाढ होणार नाही. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या मंत्रिमंडळाने दरवाढ सबसीडीमध्ये बदलण्याचा घेतला निर्णय. त्यासाठी सरकार वीज खात्याला १२० कोटी रुपये देणार. ग्राहकांना दरवाढीचा फटका नसेल.

डब्ल्यूआरडी खात्याचे रेस्ट हाऊस आता फक्त सरकारी अधिकाऱ्यांनाच वापरता येणार

डब्ल्युआरडी खात्याची रेस्ट हाऊस आता फक्त सरकारी अधिकाऱ्यांनाच वापरता येणार. बिगर सरकारी लोकांना हे रेस्ट हाऊस वापरण्यास आता मिळणार नाहीत. डब्ल्यूआरडी खात्याचे मुख्य अभियंता प्रमोद बदामींनी तसं सर्कुलर जारी केलंय.

बुधवारी पार पडली कॅबिनेटची बैठक; मुख्यमंत्र्यांनी घेतले महत्त्वाचे निर्णय

वीजेवरील टॅरीफ वाढ सरकार भरणार. लोकांवर त्याचा भार देणार नाही. यामुळे सरकारच्या तिजोरीला १२० कोटींचा फटका. मोपा एक्सप्रेस वेसाठी सरकारने विविध खात्यांची १४ हजार ६६१ स्क्वेर मीटर जमीन विमानतळाला देण्यास मंजुरी. पैकुळचा पुल जीएसआयडीसी बांधणार. प्रशासकीय मान्यता दिली. दीड दोन महिन्यांत टेंडर प्रक्रिया होऊन कामाला सुरुवात होणार. साडे बारा कोटींचा एस्टीमेट. पोलीस खात्याला देणार २ बुलेटप्रुफ कार

पी.चिदंबरम गोव्यात दाखल

पी.चिदंबरम गोव्यात दाखल. दाबोळी विमानतळावर पत्रकारांना प्रतिक्रिया देणं टाळली. उद्या आमदार, ज्येष्ठ नेते, प्रदेश काँग्रेसच्या विविध समित्यांशी घेणार बैठका

आयटकचे पणजीत आंदोलन

कामगारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत आयटकचे पणजीत आंदोलन. प्रलंबित प्रश्न तत्काळ सोडवण्याची सरकारकडे मागणी.

बुधवारची कोविड आकडेवारी

आरोग्य खात्याने जारी केलेल्या कोविड बुलेटिननुसार राज्यात बुधवारी राज्यात कोविडमुळे एकाचा मृत्यू झालाय. बुधवारी एकूण 77 नव्या कोविडबाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील सक्रिय रुग्णसंख्या 933 झालीये.

नारायण राणेंना 17 सप्टेंबर पर्यंत हायकोर्टाचा दिलासा

नारायण राणेंना १७ सप्टेंबर पर्यंत हायकोर्टाने दिलासा दिला आहे. पुढील सुनावणीपर्यंत राज्य सरकार कोणतीही कारवाई करणार नाही. अशी ग्वाही राज्य सरकारने उच्च न्यायालयात दिली.

नारायण राणेंच्या अटकेची आखणी सोमवारीच, तीही वर्षा बंगल्यावरुन

नारायण राणे यांच्या अटकेची आखणी सोमवारी वर्षा बंगल्यावरच करण्यात आली होती. त्यानुसार कुणी काय भूमिका घ्यायची याची अंमलबजावणी मंगळवारी सकाळपासून करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

नारायण राणेंच्या अटकेसाठी अनिल परबांचा फोन, पोलिसांवर दबाव?

राणे यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई केली जात असल्याचा आरोप भाजपने केलाय. त्यातच राणे यांच्यावर कारवाई करण्यासाठी पोलिसांवर दबाव टाकण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. मंत्री अनिल परब हे पोलिसांच्या सतत संपर्कात असल्याचा आरोप करण्यात येतोय.  

तुम्ही कोणीही माझं काहीही करू शकत नाही, तुम्हा सर्वांना मी पुरुन उरलोय : नारायण राणे

तुम्ही कोणीही माझं काहीही करू शकत नाही. तुमच्या कोणत्याही प्रतिक्रियेला मी घाबरत नाही. तुम्हा सर्वांना मी आतापर्यंत पुरुन उरलो आहे.अशा शब्दात नारायण राणेंनी  विरोधकांना इशारा दिलाय.

सिंधुदुर्गमधील अनिल परब यांच्या हरकूळमधल्या घरावर हल्ला

परिवहन मंत्री अनिल परब यांच्या कणकवलीच्या हरकुळ इथे बंद असलेल्या घरावरही मध्यरात्री सोडा बॉटल फेकण्यात आल्याचा प्रकार उजेडात आलाय. परब यांच्या घरासमोरिल प्रांगणात आणि दरवाजासमोर काचेचा खच पडला होता.

शिवसेनेच्या गुंडांपासून राज्याला सुरक्षित ठेवण्यासाठी राष्ट्रपती राजवट लागू करा

आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेच्या गुंडांपासून राज्याला सुरक्षित ठेवण्यासाठी राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी केली आहे. उद्धव ठाकरेंनी राणेंच्या घरासमोर आंदोलन करणाऱ्या युवासैनिकांची भेट घेतलेला फोटो नितेश राणे यांनी ट्विट केला आहे.

माझ्या जीवाला काही झालं तर शासन जबाबदार : प्रसाद लाड

भाजपा नेते प्रसाद लाड यांनी जीवाला धोका असल्याचं पत्र मुख्यमंत्र्यांना लिहील आहे. त्याचबरोबर काही बरं वाईट झालं तर सर्वस्वी सरकार जबाबदार असेल असं सांगितलं आहे.

‘राणेंचं वाक्य चुकलं नाही, ‘थोबाडीत मारली असती’ हा कॉमन संवाद’ : चंद्रकांत पाटील

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं वाक्य चुकलं नाहीय.  थोबाडीत मारली असती हा कॉमन संवाद आहे, असं म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राणे यांच्या वक्तव्याचं समर्थन केलं आहे.

छगन भुजबळ यांची 100 कोटींची बेहिशोबी मालमत्ता जप्त; किरीट सोमय्या यांचा दावा

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची 100 कोटी रूपयांची  बेनामी मालमत्ता आयकर विभागाने जप्त केली असा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे

अज्ञाताने फेकल्या विनायक राऊत यांच्या घरावर बाटल्या

खासदार विनायक राउत याच्या तळगाव मालवण येथील बंगल्यावर अज्ञात व्यक्तीनी सोड्याच्या बाटल्या तसेच दगडफेक केली. ही घटना मंगळवारी रात्री उशिरा करण्यात आली असून चार ते पाच व्यक्ती दुचाकीने आल्या होत्या.

सिंधुदुर्गात येणाऱ्या चाकरमान्यांना 2 डोस घेतलेल्यांना RTPCR मधून सूट

गणेशोत्‍सवासाठी सिंधुदुर्ग येणार्यांना लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या आरटीपीसीआर चाचणीची आवश्‍यकता नसल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिलीय.

सिंधुदुर्गात 7 सप्टेंबरपर्यंत मनाई आदेश

सिंधुदुर्गात 24 ऑगस्ट सायंकाळी 6 वाजल्यापासून ते  7 सप्टेंबर 4 वाजेपर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आलाय.  जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी याबाबत माहिती दिलीय.

सेनेविरोधात भाजपची घोषणाबाजी ; सामनाचीही केली होळी

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेच्या निषेधार्थ मालवणात भाजपने आंदोलन केले. तसेच  शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या  सामनात वारंवार भाजप आणि  राणेंच्या विरोधात मजकूर छापल्याने भाजपा पदाधिकाऱ्यांनी सामना पेपरची होळी केली.

सिंधुदुर्गात कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत सलग 13 व्या दिवशी मोठी घट

सिंधुदुर्गात कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत सलग 13 व्या दिवशी मंगळवारी मोठी घट झालीय. आज कोरोनाचे  केवळ  64 नवे रुग्ण मिळाले.

सिंधुदुर्गातून बुधवारी 37 कोरोनामुक्त

सिंधुदुर्गातून कोरोनामुक्तच प्रमाणही आता वाढत आहे. बुधवारी 37  जाणंनी  कोरोनावर मात केलीय.

सिंधुदुर्गात कोरोनामुळे आतापर्यंत 1 हजार 338 जणांचा मृत्यू

सिंधुदुर्गात कोरोनामुळे मृतांची संख्या 1 हजार 338 वर पोहचलीय. मागील 24 तासातबुधवारी तिघांचा मृत्य झालाय.

संयमी शरद पवारांसोबत राहूनही शिवसेनेचे संकुचित राजकारण

संयमी शरद पवार यांच्यासोबत राहूनही शिवसेनेचे हे संकुचित राजकारण असल्याची बोचरी टीका आमदार आशिष शेलार यांनी केली.

नवीन सुपर व्हेरिएंट ‘कोविड 22’ हा डेल्टापेक्षाही अधिक धोकादायक

तज्ज्ञांनी कोरोनाच्या ‘कोविड 22’ या नवीन सुपर व्हेरिएंटबद्दल चिंता व्यक्त केली असून त्याची तीव्रता ही डेल्टा व्हेरिएंटपेक्षाही अधिक असल्याचं सांगितलंय.

दीड कोटींचा गांजा पकडला; २६ जणांना अटक

ओडिशामधून तब्बल दीड कोटी रुपयांचा गांजा पकडण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी मंगळवारी गजपती जिल्ह्यातून सात महिलांसह २६ जणांना अटक केली आहे.

मोस्ट वाँटेड असणाऱ्या दहशतवाद्याचा खात्मा

श्रीनगरमध्ये एका कारवाईदरम्यान जम्मू -काश्मीरच्या  पोलिसांनी  टीआरएफ चा कमांडर अब्बास शेख आणि त्याचा एक साथीदाराला फिल्मी स्टाईलने ठार केलय.  अब्बास शेख हा गेल्या २६ वर्षांपासून दहशतवादी कारवाया करत होता तसेच अनेक तरुणांना दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी करुन घेत होता.

काबुलहून भारतात आलेल्या 16 जणांना कोरोनाची लागण

अफगानिस्तानमधून मंगळवारी 78 नागरिकांना भारतात आणण्यात आलंय. यामध्ये 78 जणांपैकी 16 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.

पंजशीरवर आक्रमण; तालिबानचा म्होरक्या वेढ्यात अडकला

पंजशीर खोऱ्यावरील आक्रमणाची धुरा सांभाळणारा तालिबानचा म्होरक्या सध्या वेढ्यात अडकला आहे, असा दावा नॅशनल रेझिस्टन्स फोर्सच्या वतीने करण्यात आला आहे.

अफगाण नागरिकांना देशाबाहेर जाऊ देणार नाही, तालिबानने दिला इशारा

तालिबानी राजवटीच्या भीतीने हजारो अफगाण नागरिकांनी देश सोडण्यास सुरुवात केली आहे. तालिबानने अफगाण नागरिकांना आता देश सोडून जाण्यास मनाई केली आहे.

तालिबानकडून सामूहिक हत्याकांड; UNHRC प्रमुखांनी व्यक्त केली चिंता

तालिबानकडून शरणागती पत्करलेले सैनिक, सामान्य नागरिकांना फासावर लटकवून सामूहिक हत्याकांडे केली जात असून, महिलांवर निर्बंध लादले जात आहेत,’ असा इशारा संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार प्रमुख मिशेल बॅचेलेट यांनी मंगळवारी दिला.

करोनासोबत जगणं भारतीयांच्या अंगवळणी पडतंय : WHO

देशात करोनाची रुग्णांच्या संख्येचे प्रमाण कमी होत असताना डब्ल्यूएचओ मुख्य शास्त्रज्ञ डॉ सौम्या स्वामीनाथन यांच्या वक्तव्याने पुन्हा चिंता वाढवली आहे.  करोनासोबत जगणं भारतीयांच्या अंगवळणी पडत असल्याचे ते म्हणाले 

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!