SUPERFAST NEWS | महत्त्वाच्या घडामोडींचा Express आढावा

महत्त्वाच्या घडामोडी झटपट... एका क्लिकवर

Goan Varta Live | प्रतिनिधी

न्यायाधीश डॉ. गुस्तांव फिलीप कुटो यांचं निधन

मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले गोमंतकीय न्यायाधीश डॉ. गुस्तांव फिलीप कुटो यांचं अल्पआजाराने निधन झालं. वयाच्या 93 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

सोनसाखळ्या चोरणारी टोळी गजाआड

गोव्यातील वेगवेगळ्या भागांत मोटरसायकलवरुन सोनसाखळ्या चोरणारी टोळी शेवटी जेरबंद. मायणा- कुडतरी आणि कुंकळ्ळी पोलिसांची संयुक्त कारवाई.

शनिवारी 122 नव्या कोरोनाबाधितांची नोंद

शनिवारी आरोग्य खात्याने जारी केलेल्या कोविड बुलेटिननुसार राज्यात गेल्या 24 तासात 122 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे आता राज्याची सक्रिय कोविड आकडेवारी 915 नोंद झाली आहे. यातील 12 जणांनी हॉस्पिटलमध्ये भरती होण्याचा निर्णय घेतला असून 110 जणांनी होम आयसोलेशन स्विकारलंय.

शनिवारी 2 कोविडबाधितांचा मृत्यू

आरोग्य खात्याने जारी केलेल्या कोविड बुलेटिननुसार शनिवारी राज्यात कोरोनामुळे दोघांना मरण आलंय. शनिवारच्या कोविड मृतांच्या आकडेवारीनंतर राज्यातील मृतांचा आकडा 3 हजार 184 एवढा झाला आहे.

राज्याचा रिकव्हरी रेट हळुहळू वाढतोय

राज्याचा रिकव्हरी रेट हा हळुहळू वाढतोय. शनिवारी जारी केलेल्या कोविड बुलेटिननुसार राज्याचा रिकव्हरी रेट 97.63 टक्के नोंद झालाय.

शनिवारी 13 जणांना मिळाला डिश्चार्ज

शनिवारी जारी केलेल्या कोविड बुलेटिननुसार राज्यात 111 जण कोविडमधून बरे झाले आहेत. तर 13 जण पूर्ण बरे झाल्याने त्यांना हॉस्पिटलमधून डिश्चार्ज देण्यात आलाय.

काबुल विमानतळावरुन 150 भारतीयांचे तालिबान्यांकडून अपहरण

काबुल विमानतळावरुन 150 भारतीयांचे तालिबान्यांकडून अपहरण करण्यात आले आहे. कॉर्डिनेटरसह भारतीय नागरिक बेपत्ता झाल्याचे पुढे आले आहे.

.. तर कदाचित आपल्याला लॉकडाऊन लावावा लागेल: मुख्यमंत्री

राज्यात कोविड रुग्णांसाठी 700 मेट्रिक टनांपर्यंत ऑक्सिजन जेव्हा लागेल तेव्हा कदाचित आपल्याला राज्यात लॉकडाऊन लावावा लागेल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

पुण्यातील आर्मी स्टेडियमचे नाव आता ‘नीरज चोप्रा स्टेडियम’

ऑलिम्पिक स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता खेळाडू नीरज चोप्राच्या कारकीर्दीत आता आणखी एक मानाचा तुरा रोवण्यात आला आहे. भारतीय लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाकडून पुण्यातील आर्मी स्टेडियमला नीरज चोप्राच नाव दिलं जाणार आहे.

परमबीर सिंह यांच्या खंडणीप्रकरणी पहिली अटक

3 कोटी खंडणी प्रकरणी आरोपी संजय पुनामीयाला अटक करण्यात आली आहे. ठाणे नगर पोलीस ठाण्यात खंडणी प्रकरणी दाखल गुन्ह्यात ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह 28 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अजित पवारांनी स्वत: कार्यक्रमस्थळी केली स्वच्छता

बारामतीच्या दौऱ्यावर असताना अजित पवारांना कार्यक्रमस्थळी कचरा आढळून आला.यावेळी त्यांनी स्वतः कचरा  उचलत बाजूला केला. अजित पवारांची हि कृती चर्चेचा विषय ठरलीय.

सिंधुदुर्गात कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत  सलग नवव्या दिवशी मोठी घट

सिंधुदुर्गात कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत सलग नवव्या दिवशी मोठ्ठी घट झालीय. आज कोरोनाचे  केवळ  44  नवे रुग्ण मिळाले.

आंबेलीत ४ लाखांचे ३०६ पीव्हीसी पाईप चोरीला

दोडामार्ग तालुक्यातील आंबेली येथे तब्बल ४ लाखांचे पी.व्ही.सी. पाईप अनोळखी इसमाने चोरून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत कोल्हापूर येथील कंत्राटदार प्रथमेश प्रसाद कुलकर्णी यांनी दोडामार्ग पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.

सिंधुदुर्गातून शनिवारी कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या जास्त

सिंधुदुर्गातून शनिवारी  कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या जास्त आहे. आज तब्बल 182 कोरोनावर मात केलीय.

सिंधुदुर्गात कोरोनामुळे शनिवारी दोघांचा मृत्यू

सिंधुदुर्गात कोरोनामुळे मृतांची संख्या   1 हजार 320वर पोहचलीय. तर शनिवारी कोरोनामुळे दोघांचा मृत्यू झालाय.

छापा न टाकण्यासाठी खंडणीचे टार्गेट; परमबीर सिंह यांच्यावर आणखी एक गुन्हा

गोरेगाव पोलिस ठाण्यात मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे.   छापा न टाकण्यासाठी दर महिना खंडणीचे टार्गेट दिल्याचंही तक्रारीत म्हटलं आहे.

राज ठाकरेंनी ट्वीट केले प्रबोधनकार ठाकरेंचे विचार; राजकीय चर्चांना ऊत

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर महाराष्ट्रात जातीय द्वेष वाढला, अशी टीका राज ठाकरे यांनी केली होती. त्यानंतर प्रबोधनकार ठाकरे यांच्या माझी जीवनगाधा या पुस्तकातील विचार त्यांनी ट्वीट केले आहेत.त्यामुळे राजकीय चर्चांना उत आलाय.

सुशांतसिंह राजपूतच्या फेसबुक प्रोफाइलचा फोटो बदलला

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या निधनाला आता एक वर्षापेक्षा जास्त काळ लोटला आहे. पण आता त्याच्या निधनानंतर एवढ्या दिवसांनंतर त्याच्या फेसबुक अकाउंटचा प्रोफाइल फोटो बदलला गेल्यानं चाहते हैराण झाले आहेत

बिटकॉइन ५० हजार डॉलर्सच्या उंबरठ्यावर

सर्वात लोकप्रिय असलेल्या बिटकॉइनने पुन्हा एकदा ५०००० डॉलर्सच्या दिशने कूच केली आहे. इथेरियमचा भाव ३२०० डाॅलर्सवर गेला आहे.

रक्षाबंधनाच्या दिवशी अवकाशात दिसणार ‘ब्ल्यू मून’

रक्षाबंधनाच्या दिवशी अवकाशात ‘ब्ल्यू मून’ दिसणार असून खगोलप्रेमींसाठी पर्वणी मानली जात आहे.

11 दिवसांनी मृतांच्या आकड्यात घट

11 दिवसांनी मृतांचा आकड्यात घट झाल्याचं पाहायला मिळालं. कोरोनामुळे आतापर्यंत 4.33 लाख रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

तालिबानला भारतातून मिळालं समर्थन; पोलिसांनी १४ जणांना ठोकल्या बेड्या

तालिबानच्या समर्थनार्थ यूपी, दिल्ली, आसामसह काही राज्यांतून सोशल मिडीयावर पोस्ट केल्या आहेत. दरम्यान, आसाम पोलिसांना १४ तालिबान समर्थकांना अटक केली आहे.

अवंतीपोरा भागात ‘जैश’चे तीन दहशतवादी ठार, शोध मोहीम सुरू

अवंतीपोरा भागात आत्मसमर्पणाची संधी देऊनही सुरक्षादलावर गोळीबार करणाऱ्या तीन दहशतवाद्यांना सुरक्षादलाच्या जवानांनी ठार केलंय. हे तिघे ‘जैश ए मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचं समजतंय.

भाजपाला टीका सहन होत नाही, त्यांना तो राष्ट्रद्रोह वाटतो

भाजपा टीका सहन करू शकत नाही आणि ते त्याला राष्ट्रद्रोह मानतात. लोकशाहीत टीका करणे स्वागतार्ह आहे परंतु हे लोकटीका सहन करू शकत नाहीत, अशा शाबडत  राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी शुक्रवारी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर टीका केली.

मुलांना ऑगस्टमध्ये टोचली जाणार कोरोना लस

12 ते 18 वयोगटातील झायडस कॅडिलाची लस ऑगस्टच्या अखेरीस आपत्कालीन वापरासाठी मंजूर झाली आहे. त्याचबरोबर भारत बायोटेकच्या लसीची चाचणी 2 ते 18 वर्षे वयोगटासाठी सुरू आहे. या वयोगटासाठी ही जगातील एकमेव लस आहे. ही लस या वर्षी सप्टेंबर पर्यंत येण्याची शक्यता आहे.

जगातल्या सर्वात मोठ्या 500 कंपन्यांमध्ये 12 भारतीय कंपन्यांचा समावेश

ह्युरन रिसर्च इन्स्टिट्यूटने जाहीर केलेल्या याद्दीत जगातल्या सर्वात श्रीमंत 500 कंपन्यांमध्ये आता 12 भारतीय कंपन्यांचा समावेश झाला आहे. या यादीत रिलायन्स सर्वात वरच्या स्थानी असून त्यानंतर टीसीएस आणि एचडीएफसी बॅंकेचा समावेश आहे.

तालिबान्यांमुळे हिंग महागण्याची शक्यता

तालिबानने व्यापार बंदी केल्यानंतर रोजच्या आहारात वापरला जाणारा हिंग महागणार आहे. व्यापार ठप्प झाल्यानं अफगाणमधून होणारा हिंगाचा पुरवठा थांबलाय. त्यामुळेच बाजारात हिंगाचे दर वाढण्याची शक्यता आहे.

हॅलिकॉप्टर अपघातानंतर भारतीय लष्कराचा जवान १८ दिवसांपासून बेपत्ता

१८ दिवसांपूर्वी आर्मी एव्हिएशन स्क्वॉड्रनच्या हेलिकॉप्टरला झालेल्या अपघातात दोन पायलट बेपत्ता झाले होते. त्यापैंकी एकाचा मृतदेह चार दिवसांपूर्वी हाती लागलाय तर दुसरा अद्यापही बेपत्ता आहे

पाकिस्तानमधील आत्मघाती हल्ल्यात दोन मुले ठार

पाकिस्तानमध्ये शुक्रवारी रात्री ग्वादर बंदराजवळील भागात आत्मघाती हल्ला झाला. हा चिनी नागरिकांना लक्ष्य करण्यासाठी झाला होता. दोन मुलांचा मृत्यू झाला असून चिनी नागरिक जखमी आहेत.

४० तालिबानी ठार, तीन जिल्ह्यांवर अफगाण सैन्याचा पुन्हा ताबा

काही ठिकाणी अफगाण सैन्याकडून तालिबानचा प्रतिकार केला जात आहे. स्थानिक तालिबानविरोधी गट आणि अफगाण सैन्याने तालिबानच्या ताब्यातून तीन जिल्ह्यांना मुक्त केले आहे.

सचिनपेक्षा सेहवागला घाबरायचो : मुथय्या मुरलीधरन

श्रीलंका क्रिकेट संघाचा माजी ऑफस्पिनर मुथय्या मुरलीधरनने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. मुरलीधरन म्हणाला, माझ्या कारकीर्दीत मी सचिन तेंडुलकरला गोलंदाजी करण्यास कधीही घाबरत नव्हतो, परंतु वीरेंद्र सेहवागला जास्त घाबरत होतो, अशी प्रतिक्रिया दिलीय. 

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!