SUPERFAST NEWS | महत्त्वाच्या घडामोडींचा Express आढावा

महत्त्वाच्या घडामोडी झटपट... एका क्लिकवर

धनश्री मणेरीकर | प्रतिनिधी

कॅसिनो, स्पा, मसाज पार्लर सोमवारपासून ५० टक्के क्षमतेने सुरू

कॅसिनो, स्पा, मसाज पार्लर सोमवारपासून ५० टक्के क्षमतेने सुरू. लवकरच नियमावली जारी होईल. ईडीएम पार्ट्या, नाईट क्लबना तूर्त परवानगी नाही. शाळा सुरू करण्यासंदर्भातील निर्णय कृतिदलाच्या पुढील बैठकीनंतर घेतला जाईल : मुख्यमंत्री

२०२० चा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर

सोनाली नवांगुळ यांना मराठीत ‘मध्यरात्रीनंतरचे तास’ पुस्तकाच्या अनुवादासाठी, तर जयश्री शानभाग यांना कोकणीसाठी ‘स्वप्न सारस्वत’ या पुस्तकाच्या अनुवादासाठी २०२० चा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर.

शनिवारची कोविड आकडेवारी

राज्याच्या आरोग्य विभागाने जारी केलेल्या कोविड बुलेटिननुसार राज्यात शनिवारी २ कोविडबळी गेलेत. शनिवारी १२३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याची सक्रिय रुग्ण संख्या ७७१ वर जाऊन पोहोचलीये.

घरफोडी करणाऱ्या चार जणांच्या टोळीला अटक

पोलीस निरीक्षक कदम यांच्या नेतृत्वाखाली कुंकळ्ळी पोलिसांकडून घरफोडी करणाऱ्या चार जणांच्या टोळीला अटक. टोळीचा आतापर्यंत दोन प्रकरणांत सहभाग असल्याचे स्पष्ट. ५० हजारांहून अधिक किमतीची मालमता जप्त. पुढील तपास सुरू.

उद्या पंतप्रधान मोदींना पत्र पाठवणार

रशियातून गोव्यात येणाऱ्या चार्टर विमानांना परवानगी देण्यासंदर्भात आपण उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र पाठवणार आहे. १९ डिसेंबर रोजी आग्वाद किल्ल्याच्या नूतनीकरणाचे उद्घाटन शक्य आहे. बंदर आणि कप्तान मंत्री मायकल लोबो यांची माहिती.

वार्का येथील हॉटेलमधील बेकायदेशीर कॅसिनोवर छापा

वार्का येथील हॉटेलमधील बेकायदेशीर कॅसिनोवर छापा. १५ जणांना अटक. ६.९ लाखांच्या चिप्स व इतर जुगाराचे साहित्य जप्त. पोलीस अधीक्षक पंकजकुमार सिंग यांच्या नेतृत्वाखाली कोलवा व मडगाव पोलिसांची संयुक्त कारवाई.

मयडे-म्हापसा येथे 1.10 लाखांचा गांजा जप्त

म्हापसा पोलिसांनी विशाल बोर्डेकर (२९, मयडे) या संशयितास अटक करून त्याच्याकडून १.१० लाखांचा १.१०० किलो गांजा जप्त केला. पोलिसांनी ही कारवाई मयडे पंचायतीजवळ केली.

‘टीम गोवा’वर अभिनंदनाचा वर्षाव

कोविड लसीकरणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून ‘टीम गोवा’वर अभिनंदनाचा वर्षाव. चक्रीवादळ, पुरावर मात करीत पात्र १०० टक्के नागरिकांचा पहिला डोस पूर्ण केल्याबद्दल राज्य सरकारचे केले कौतुक.

फोन करून दिली बाँम्ब ठेवल्याची खोटी माहिती

मुंबई पोलिसाच्या नियंत्रण कक्षाला फोन करून बाँम्ब ठेवल्याची खोटी माहिती दिल्याचा प्रकार पुढे आला आहे. आझाद मैदान परिसरातील एका इमारतीत हा बाँम्ब ठेवल्याचे सांगितल्यानंतर पोलिसांनी सर्च ऑपरेशन राबवले मात्र संशयास्पद काही आढळून आले नाही.

दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई लोकलच्या सुरक्षेत वाढ

दहशतवाद्यांनी मुंबई लोकलमध्ये विषारी गॅसच्या सहाय्याने हल्ला करण्याची योजना आखल्याचा इशारा गुप्तचर विभागाने दिला आहे. त्यामुळे मुंबई लोकल स्थानकांवरच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई, जोगेश्वरीतून संशयित दहशतवादी ताब्यात

महाराष्ट्र एटीएसनं मोठी कारवाई करत मुंबईच्या जोगेश्वरी भागातून झाकिर नावाच्या संशयित दहशतवाद्याला अटक केली आहे.

चिपी विमातळ वापरण्यास IRB ला DGCA चा परवाना

सिंधुदुर्ग विमानतळ आयआरबीला ऑपरेट करण्यासाठी डीजीसीएने परवाना जारी केला आहे.

मुख्यमंत्र्यांनंतर संजय राऊतांच खळबळजनक वक्तव्य

मुख्यमंत्र्यांनंतर संजय राऊत यांनी खळबळजनक वक्तव्य केलंय. कुणीतरी आहे तिथे, त्यांना इथे यायचे आहे, असं वक्तव्य संजय राऊत  यांनी केलं आहे. त्यामुळं भाजपमधील कोणते नेते महाविकास आघाडीत प्रवेश करणार, असे तर्क- वितर्क लढवले जात आहेत

फडणवीस-जयंत पाटलांचा एकाच गाडीतून प्रवास; नव्या समीकरणांचे संकेत?

शहादा येथे सहकार महर्षी पी. के. अण्णा पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पणाच्या  कार्यक्रमासाठी फडणवीस आणि जयंत पाटील यांनी एकाच गाडीतून प्रवास केला आहे. बया दोघांनी एकाच गाडीतून प्रवास केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत

देशमुख- परब यांना ४० कोटींची लाच; सचिन वाझेचा जबाबात आरोप

तत्कालीन मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या पोलिस उपायुक्तांच्या बदल्या थांबविण्यासाठी अनिल परब आणि अनिल देशमुख यांनी दहा पोलिस उपायुक्तांकडून ४० कोटी रुपयांची लाच उकळल्याचा आरोप बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे याने केला आहे.

उद्धव ठाकरे अचानक युतीबद्दल कसे बोलले?; नीतेश राणेंना वेगळीच शंका

मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स इथं एमएमआरडीएचा पूल कोसळून काल दुर्घटना घडली होती. त्या घटनेची चर्चा होऊ नये आणि माध्यमांचे लक्ष इतरत्र वळावे म्हणून मुख्यमंत्री युतीबद्दल बोलले नसतील ना? असा प्रश्न नीतेश यांनी उपस्थित केला आहे

प्रवाशांनी भरलेली लक्झरी बस जंगलातच सोडून चालक पळाला

कोकणातील मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण जवळ वालोपे गावाजवळ संतापजनक प्रकार घडला आहे. सिंधुदुर्गातील बांद्याहून मुंबईला जाणाऱ्या काळभैरव ट्रॅव्हल्स या खासगी बसच्या चालकाने चक्क प्रवाशांना आणि बसला जंगलभागात सोडून पलायन केले.

एकाच कुटुंबातल्या ५ जणांची आत्महत्या, चिमुरड्याचा भुकेनं मृत्यू

बंगळुरमध्ये एकाच कुटुंबातल्या पाच जणांनी आत्महत्या केल्याचं उघड झाल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. त्याचवेळी घरातल्या एका ९ महिन्यांच्या चिमुकल्याचा भुकेनं तडफडून मृत्यू झाल्याचा प्रकार पोलिसांना निदर्शनास आला

सोनू सुदवर २० कोटींहून अधिक कर चुकवल्याचा आरोप

अभिनेता सोनू सुदने २० कोटींहून अधिक रक्कमेचा आयकर बुडवल्याचा आरोप आयकर विभागाने ठेवला आहे. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी असा दावा केला आहे की, सोनूच्या चॅरिटी संस्थेला २.१ कोटी रुपयांचे परदेशी धन अवैधरित्या मिळाले आहे.

देशात एकाच दिवसात 2.5 कोटी डोस वितरित

भारताने शुक्रवारी कोरोना लसीकरणाच्या कार्यक्रमात नवीन विश्वविक्रम प्रस्थापित केला असून एकाच दिवसात 2.5 कोटीहून अधिक डोस देण्यात आले. शुक्रवारी भारतात 466 डोस प्रति सेंकद या वेगाने डोस देण्यात आले.

दिल्ली-मुंबई एक्सप्रेस हायवे आता नरिमन पॉईंटपर्यंत नेण्याचा विचार

“सरकार जगातील सर्वात लांब महामार्ग म्हणजेच दिल्ली-मुंबई एक्सप्रेस हायवे बांधत आहे”, असं केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री यांनी जाहीर केलं आहे.

1 ऑक्टेबरपासून आठवड्यातील 4 दिवस काम, 3 दिवस सुट्टी?

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकार नवी वेतन संहिता लागू करण्याच्या विचारात असून  3 दिवस सुट्टीच्या पर्याय निवडणाऱ्या कर्मचाऱ्यांना 4 दिवस दररोज 12 तास काम करावं लागणार

लहान मुलांसाठीच्या लसीबाबत अदर पुनावालांची महत्वपूर्ण घोषणा  

“लहान मुलांसाठी सिरमच्या कोवावॅक्स लसीच्या चाचण्या अगदी सुरळीतपणे सुरू आहेत.  तर पुढील वर्षाच्या सुरुवातीला अर्थात जानेवारी-फेब्रुवारी २०२२ मध्ये लहान मुलांसाठी लस येईल”, असं अदर पूनावाला म्हणाले आहेत.

कोव्हॅक्सिन लसीबाबत WHO लवकरच देणार गूडन्यूज

ऑक्टोबर महिन्यात कोव्हॅक्सिनला चांगली बातमी मिळू शकते. भारत बायोटेकच्या कोवासीनला WHO कडून मान्यता मिळणं अपेक्षित आहे.

आता एटीएममधून मिळणार औषधे

दुर्गम भागातील नागरिकांना आता २४ तास औषधे उपलब्ध होणार आहेत. आता एटीएमच्या माध्यमातूनही औषध उपलब्ध होणार आहेत. देशातील प्रत्येक विभागात औषधांचे हे मशीन बसवण्यात येणार आहे.

देशात नव्या बाधितांची संख्या कमी होईना

देशात रुग्णसंख्येत घट होत होत असताना पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली आहे. काल ३४ हजार ४०३ रुग्ण आढळल्यानंतर आज रुग्णसंख्या ३५ हजारांवर गेली आहे.

नवज्योत सिंग सिद्धू पंजाबच्या राजकारणातील राखी सावंत

नवज्योत सिंग सिद्धू हे पंजाबच्या राजकारणातील राखी सावंत आहेत, अशी टीका राघव चड्ढा यांनी ट्वीटमधून केली.

भीतीचा वास घेणं शक्य?

भीतीचा वास घेणं शक्य आहे, परंतु जर एखादी स्त्री असेल तरच हे घडू शकतं मानसशास्त्रज्ञांनी यासंदर्भात केलेल्या संशोधनातून हि बाब उघड झालीय.

रवी शास्त्रीनंतर टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी अनिल कुंबळेचं नाव चर्चेत

भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कार्यकाळ टी-20  वर्ल्ड कपनंतर  समाप्त होणार आहे. सध्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी अनिल कुंबळेच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे.

न्यूझीलंड संघाचा दौरा रद्द करणे हा आंतरराष्ट्रीय कट

न्यूझीलंड पाकिस्तानसोबतचा दौराच रद्द केल्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानची आब्रु केली. पण इस्लामाबादमध्ये गृहमंत्री शेख रशीद अहमद यांनी न्यूझीलंड संघाचा दौरा रद्द करणे हा एक आंतरराष्ट्रीय कट असल्याचे म्हटले.

भारतीयांना दिलासा ;  H-1B व्हिसाचा नियम अमेरिकेतील कोर्टानं केले रद्द

अमेरिकेच्या फेडरल कोर्टाच्या न्यायाधीशांनी बुधवारी माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळात केलेले एच -1 बी व्हिसा नियमांमधील बदल कायमचे रद्द केले आहेत.

काबूल ड्रोन हल्ल्यात १० निष्पापांचा बळी गेल्याची अमेरिकेची कबुली

काबूल विमानतळावर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना ठार मारण्यासाठी अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यात दहा नागरिक मारले गेल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकेनेही ही वस्तुस्थिती स्वीकारली आहे आणि त्यासाठी माफी मागितली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!