SUPERFAST NEWS | महत्त्वाच्या घडामोडींचा Express आढावा

महत्त्वाच्या घडामोडी झटपट... एका क्लिकवर

धनश्री मणेरीकर | प्रतिनिधी

शुक्रवारची कोविड आकडेवारी

राज्याच्या आरोग्य विभागाने जारी केलेल्या कोविड बुलेटिननुसार गेल्या 24 तासात राज्यात कोविडचा आणखी १ बळी गेला आहे. शुक्रवारी १०८ नवे कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे राज्याची सक्रीय कोविड रुग्ण संख्या ७३१ वर जाऊन पोहोचली आहे.

१८ आणि १९ ऑक्टोबर असे दोन दिवस विधानसभा अधिवेशन‌

18 आणि 19 ऑक्टोबर रोजी गोवा विधानसभेचं दोन दिवसांचं अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनाच महत्त्वपूर्ण राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. आगामी निवडणुकीच्या पूर्वी होणाऱ्या या अधिवेशनाकडे संपूर्ण राज्याची नजर असणार आहे. 18 ऑक्टोबरला या अधिवेशनाची सुरुवात होईल. तर 19 ऑक्टोबरला शेवट होईल. या दोन दिवसांच्या अधिवेशाच्या काळात नेमकं काय काय कामकाज होतं, ते पाहणं महत्त्वाचंय.

१९ सप्टेंबरपासून सरकार तुमच्या दारी

१९ सप्टेंबरपासून सरकार तुमच्या दारी. थिवी-कोलवाळच्या श्रीराम विद्या मंदिरातून मोहीम. निवासी/उत्पन्न दाखला, पाणी/वीज जोडणी, रेशन कार्ड, निवडणूक ओळखपत्र, गृहआधार, किसान कार्ड, डीएसएसवाय, गृह उद्योग स्टार्टअप अशा गोष्टींसाठी एकाच जागी प्रशासन. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची घोषणा

मोबाईल कॅमेऱ्यात बिबट्या कैद

मोपा ‌विमानतळाच्या प्रवेशद्वारावर गुरुवारी रात्री मोबाईल कॅमेऱ्यात कैद झालेला बिबट्या. पाच महिन्यांपूर्वी याच ठिकाणी बिबटा कॅमेऱ्यात कैद झाला होता.

भाजप शिवसेनेचा भविष्यातील सहकारी; उद्धव ठाकरेंच मोठ विधान

औरंगाबादेतील कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे पाहत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठे विधान केले आहे. व्यासपीठावरचे आजी माजी सहकारी आणि भविष्यातील सहकाऱ्यांचं स्वागत असं विधान केले आहे.

मुख्यमंत्र्यांनी मनातली इच्छा बोलून दाखवली असेल : फडणवीस

राज्यात सक्षम विरोधी पक्ष आहे. सत्तेतील सहकाऱ्यांमुळेच मुख्यमंत्र्यांनी मनातली इच्छा बोलून दाखवली असेल अशी पहिली प्रतिक्रीया  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.

चंद्रकांत पाटील तीन पक्षांपैकी एका पक्षात प्रवेश करणार असं कानावर आलंय: उद्धव ठाकरे

मला माजी मंत्री म्हणू नका या चंद्रकांत पाटलांच्या  वक्तव्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोरदार टोला लगावला. मला कळलंय की चंद्रकांत पाटील तिन्ही पक्षापैकी एका पक्षात प्रवेश करतायत, असं ते म्हणाले.

ED च्या आरोपपत्रात अनिल देशमुखांचं नावच नाही

अनिल देशमुखांच्या विरोधात 100 कोटींच्या वसुली प्रकरणी ईडीने कारवाई सुरु केली. पण ईडीच्या आरोपपत्रात खुद्द अनिल देशमुखांचेच नाव नसल्याचं समोर येत आहे.

चंद्रकांत पाटील सक्रिय राजकारणातून बाजूला होणार?

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना सक्रिय राजकारणातून बाजूला केले जाणार असल्याची माहिती माझ्या कानावर आली आहे, असा गौप्यस्फोट शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

संजय राऊतांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून पाठवणार

‘संजय राऊतांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून पाठवणार,’ असं मला कळतंय, असा पलटवार चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. तसंच, ‘संजय राऊतांना कोणी फार गंभीरतेने घेत नाही,’ अशी टीकाही त्यांनी केली आहे.

ईडी, सीबीआयनंतर आता आयकर विभागाचा अनिल देशमुख यांच्या घरी छापा

भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर राजीनामा द्यावा लागलेले माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर येथील घरी आयकर विभागानं छापा टाकला आहे.

सिंधुदुर्गात 27 कोरोनाबाधितांची नोंद

सिंधुदुर्गात कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत आज मोठी घट झालीय. आज कोरोनाचे  27 नवे  रुग्ण मिळाले.

बिबट्याची साडेतीन लाखाची कातडी जप्त ; 5 जणांना रंगेहात पकडले

बिबट्याची कातडी विक्री करण्याच्या उद्देशाने देवगड येथून सावंतवाडी शहरात आलेल्या ५ जणांना सापळा रचून रंगेहाथ पकडण्यात आले आहे. साडेतीन लाखाच्या बिबट्याच्या कातडी सह क्वालिस गाडी असा एकूण साडेचार लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सिंधुदुर्गात 23 जणांची कोरोनावर मात

सिंधुदुर्गात  कोरोनामुक्तचा आकडाही वाढतोय. आज 23 जनांनी कोरोनावर मात केलीय.

सिंधुदुर्गात कोरोनामुळे दोघांचा मृत्यू

सिंधुदुर्गात कोरोनामुळे मृतांची संख्या 1 हजार 385 वर पोहचलीय. मागील 24 तासात कोरोनामुळे दोघांच मृत्यू झालाय.

चिमुकलीच्या गळ्याभोवती तब्बल २ तास होता कोब्रा

एका मुलीच्या गळ्यात थेट किंग कोब्राने विळखा घातला होता. सगळ्यात गंभीर बाब म्हणजे तब्बल 2 तास या कोब्राने मुलीचा गळा घट्ट गुंडाळला होता. वर्धा इथ हि धक्कादायक घटना घडलीय.

‘यूट्यूब’ व्हिडिओद्वारे महिन्याला लाखोंची कमाई; नितीन गडकरींचा खुलासा

कोविड काळात कमाईचा नवा मार्ग शोधून काढल्याचा खुलासा केंद्रीय परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलाय. आपण यूट्यूबच्या माध्यमातून दर महिन्याला जवळपास चार लाख रुपयांची कमाई करत असल्याचं नितीन गडकरी यांनी म्हटलंय.

पत्नीसमोरच तरुणानं केला प्रेयसीवर गोळीबार

कोल्हापूर शहरातील कळंबा तलाव येथे सकाळी प्रेमप्रकरणातून गोळीबार झाला. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलं आहे. त्यात दोन महिलांचा समावेश आहे.

राज कुंद्राकडून मुंबई सत्र न्यायालयातील जामीनासाठीची याचिका मागे

पॉर्नोग्राफी प्रकरणात अटकेत असलेला व्यावसायिक राज कुंद्रानं मुंबई सत्र न्यायालयात दाखल केलेला जामीन गुरूवारी अर्ज मागे घेतला आहे

दहशतवाद्यांचा प्लान बी उघड

दिल्लीत अटक केलेल्या दहशतवाद्यांचा प्लान बी उघड केला आहे. स्फोट घडवण्यात अपयशी आल्यास देशाचं आर्थिक नुकसान करण्याचे आदेश देण्यात आले होते. मोठे खासगी कारखाने, गोदामे, शोरुम्समध्ये आग लावण्याचा कट आखण्यात आला होता.

पंतप्रधान मोदींचा वाढदिवस: सोशल मीडियावर राष्ट्रीय बेरोजगारदिवस ट्रेन्डिंगवर

पंतप्रधान मोदींचा वाढदिवसा दिवशी सोशल मीडियावर वेगळाच ट्रेड दिसून येतोय. ट्विटरवर #राष्ट्रीय बेरोजगारदिवस हा हॅशटॅग ट्रेन्डिंगवर आहे.

रोहित नव्हे तर केएल राहुलला कर्णधार करा : सुनील गावस्कर

भारताचे माजी कर्णधार सुनिल गावस्कर यांनी टी 20 च्या कर्णधारपद सोपवण्यासावरून एक धक्कादायक वक्तव्य केले आहे. सुनील गावस्कर यांच्या मते केएल राहुलकडे भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे. भारतीय क्रिकेट संघाचा भावी कर्णधार म्हणून त्याला तयार करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

कोरोना लसीच्या बूस्टर डोसबाबत केंद्र सरकारचं मोठं विधान

सरकारच्या वैज्ञानिक आणि सार्वजनिक आरोग्य सेवा चर्चेत यावेळी बूस्टर डोस हा केंद्रीय विषय नाही. सध्याच्या घडीला दोन डोससह पूर्णपणे लसीकरण हे मुख्य प्राधान्य आहे.

देशात एकाच दिवसात दीड कोटी नागरिकांना डोस

भारताने कोरोना लसीकरण मोहीमेत  आज नवा रेकॉर्ड बनवला आहे. देशात 17 सप्टेंबर ला दुपारी तीन वाजेपर्यंत दीड कोटी नागरिकांना कोरोना लस देण्याचा विक्रम झाला आहे.

सेन्सेक्स ६० हजारांच्या दिशेने; गुंतवणूकदारांनी कमावले एक लाख कोटी

सलग चौथ्या सत्रात शेअर निर्देशांकात मोठी वाढ झाली. सेन्सेक्सने ५०० अंकांची झेप घेत ५९६०० अंकापर्यंत मजल मारली. या तेजीने गुंतवणूकदारांच्या मालमत्तेत एक लाख कोटींची भर पडली.

करोनाची तिसरी लाट; पुढील तीन महिने महत्त्वाचे

करोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत केंद्र सरकारने राज्यांना इशारा दिला आहे. सणासुदीत होणारी गर्दी नियंत्रणात आणवी. तसंच सण अतिशय साधेपणाने साजरे केल्यास करोनाविरोधी लढाईत वरचढ ठरू शकू, असं नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल म्हणाले.

करोना संसर्गाचे गर्भवती महिलांवर गंभीर परिणाम : ICMR

करोना संसर्गाचे गर्भवती महिलांवर गंभीर परिणाम दिसून आला. ICMR च्या अहवालामधून हा धक्कादायक खुलासा झालाय.  

महेंद्रसिंह धोनीकडे नवी जबाबदारी, संरक्षण मंत्रालयाच्या समितीवर नियुक्ती

संरक्षण मंत्रालयाने महेंद्र सिंह धोनी आणि महिंद्रा कंपनीचे मालक आनंद महिंद्रा यांची एनसीसीला अधिक प्रभावी पद्धतीने मार्गदर्शन करण्यासाठी उच्चस्तरीय तज्ज्ञ समितीचे सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे.

काबूलमध्ये पुन्हा रॉकेट हल्ले; वीज केंद्राजवळ झाला हल्ला

काबूलमध्ये पुन्हा एकदा रॉकेट हल्ले झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. एका वीज केंद्राला या हल्ल्यात लक्ष्य करण्यात आले होते. मात्र, या हल्ल्यात वीज केंद्राचे नुकसान झाले नाही. या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे म्हटले जात आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!