SUPERFAST NEWS | महत्त्वाच्या घडामोडींचा Express आढावा

महत्त्वाच्या घडामोडी झटपट... एका क्लिकवर

धनश्री मणेरीकर | प्रतिनिधी

ढवळीकर पोचले फडणवीसांच्या भेटीला

मगोचे नेते सुदिन ढवळीकर यांनी भाजपचे गोवा निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेऊन गोव्यातील राजकीय स्थितीवर चर्चा केली. पुढील काही दिवसांत भाजप-मगो युतीविषयी चर्चा पुढे जाण्याची शक्यता आहे.

काँग्रेसकडून चाळीसही मतदारसंघांत तयारी सुरू

काँग्रेसकडून चाळीसही मतदारसंघांत तयारी सुरू आहे. भाजपचा पराभव हेच आमचे अंतिम ध्येय : काँग्रेसचे निवडणूक निरीक्षक पी.चिदंबरम यांनी युतीसंदर्भात अजून निर्णय घेतला नसल्याचेही केले स्पष्ट.

साहित्यिक दिलीप बोरकर काँग्रेसमध्ये

साहित्यिक दिलीप बोरकर काँग्रेसमध्ये. निरीक्षक पी.चिदंबरम, प्रभारी दिनेश गुंडू राव, प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केले पक्षात स्वागत.

प्रेमानंद नानोस्कर यांचा ‘आप’ प्रवेश

दाबोळी मतदारसंघातील मगोचे नेते प्रेमानंद नानोस्कर यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला.

पोलीस खात्यात भरतीसाठी जाहिरात

पोलीस खात्याने ७३४ सशस्त्र पोलीस कॉन्स्टेबल्ससह आयआरबी विभागात एकूण ७७३ पदांच्या भरतीसाठी जाहिरात काढली आहे.

मंगळवारची कोविड आकडेवारी

राज्याच्या आरोग्य विभागाने जारी केलेल्या कोविड बुलेटिननुसार राज्यात मंगळवारी कोविडचे आणखी २ बळी गेलेत. मागच्या 24 तासांत राज्यात 80 नव्या रुग्णांची नोंद झालीये. त्यामुळे राज्याची सक्रिय रुग्ण आकडेवारी 644 वर जाऊन पोहोचलीये.

छाप्यात ५५० कोटींची बेहिशेबी मालमत्ता जप्त

कोविड उपचारांसाठी औषधं तयार करणाऱ्या हैद्राबाद येथील कंपनीवर आयकर छाप्यावेळी एका कपाटात रोख १४२ कोटी रुपये सापडले. कोविडच्या दुसऱ्या लाटेवेळी देशात औषधांची कमतरता असताना मोठ्या प्रमाणात औषधांची विदेशात निर्यात केली होती. छाप्यात ५५० कोटींची बेहिशेबी मालमत्ता जप्त केली आहे.

कोळसाटंचाईचे संकट; कोयना प्रकल्पामुळे महाराष्ट्र प्रकाशात

सध्या निर्माण झालेल्या कोळसाटंचाईदरम्यान कोयना प्रकल्पामुळे महाराष्ट्र प्रकाशात असल्याची स्थिती आहे. दमदार पावसामुळे कोयना जलाशयातील वीजनिर्मिती दुप्पट करण्यात आली आहे.

इलेक्टोरल बॉन्ड्सच्या माध्यमातून शिवसेनेला मिळाले 111 कोटी

ADR संस्थेने 2019-20 या काळात इलेक्टोरल बॉन्ड्सच्य माध्यमातून कोणत्या प्रादेशिक पक्षाला किती प्रमाणात निधी मिळाला आहे याची माहिती दिली आहे. प्रादेशिक पक्षांमध्ये सर्वाधिक देणगी मिळालेल्या यादीत शिवसेनेचा दुसरा क्रमांक आहे.

अजूनही मुख्यमंत्री असल्यासारखं वाटतंय: फडणवीस

‘मला आजही मुख्यमंत्री असल्यासारखंच वाटतं’, असं वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलंय..  त्यांच्या या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगली आहे.

समुद्रात बोट खडकाला आपटून दुर्घटना

देवगड तालुक्यातील गिर्ये समुद्रकिनारी रत्नागिरी येथील अजीम होडेकर मालकीची बोट खडकाला आदळून  दुर्घटना झाली. यात बोटीचे मोठे नुकसान असाल तरी सर्व 24 खलाशांना वाचवण्यात यश आलय.

एटीएमला भरायला आणलेले 23 लाख वाटेतच लुटले

बँक आँफ इंडियाच्या एटीएममध्ये भरण्यासाठी आणलेली २३ लाखाची रक्कम अज्ञातांनी वाटेतच लुटली.तळेरे-वैभववाडी मार्गावर घंगाळे दरम्यान चोरट्यांनी डल्ला मारला.

गणेशोत्सवात कोकण रेल्वेने 2 लाख 40 हजार जणांचा प्रवास

गणेशोत्सवाच्या काळात कोकण रेल्वेने तब्बल २ लाख ४० हजाराहून अधिक जनांनी प्रवास केलाय.  यातून कोकण रेल्वेला ७ कोटी ७२ लाखांचा कमाई झाली.

सिंधुदुर्गात मंगळवारी 52 कोरोना रुग्णांची भर

सिंधुदुर्गात कोरोनाबाधितांचा आकडा सारखा खलि९ वर होताना दिसतोय. मंगळवारी 52 कोरोना रुग्णांची भर  पडलीय.

ऐन कापणीच्यावेळी परतीच्या पावसाचा धुमाकूळ

सिंधुदुर्गात परतीच्या पावसाने ठीकठिकाणी हजेरी लावली.  ऐन कापणीच्यावेळी पाऊस आल्यामुळे शेतकरी मात्र चिंतेत आहे.

सिंधुदुर्गात मंगळवारी कोरोनामुक्तांच प्रमाण कमीच

सिंधुदुर्गात कोरोनाबाधीतांपेक्षा कोरोनामुक्तांच प्रमाण आज कमीच आहे. 43 जणांनी कोरोनावर मात केलीय.

रेडीतील ‘त्या’ मृतदेहाची ओळख पटली

वेंगुर्ला तालुक्यातील रेडी येथील नदीकिनारी १० ऑक्टोंबरला आढळलेल्या मृतदेहाची ओळख पटली आहे. तो मृतदेह रेडी बोंबडोजीचीवाडी येथील शितल शिवाजी नाईक यांचा आहे. अशी माहिती वेंगुर्ले पोलिसांनी दिली.

सिंधुदुर्गात कोरोनामुळे चौघांचा मृत्यू

सिंधुदुर्गात कोरोनामुळे मृतांची संख्या 1 हजार 421 वर पोहचलीय. मागील 24 तासात कोरोनामुळे चौघांचा मृत्यू झालाय

बंदच्या दिवशी शिवसेनेच्या लोकांनी शेतकऱ्याची सफरचंद चोरून खाल्ली

रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नये ही शिवाजी महाराजांची आज्ञा होती, पण बंदच्या दिवशी मालवणात शिवसेनेच्या दळिद्री पदाधिकाऱ्यांनी एका शेतकऱ्याचे सफरचंद चोरून खाल्ले,’ असा आरोपही नीलेश राणे ट्वीटमध्ये केला आहे.

अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी सीबीआयचे छापे

सीबीआय तपासाचा अहवाल लीक झाल्याप्रकरणात सीबीआय पथकाने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सिव्हिल लाइन्समधील निवासस्थानावर सोमवारी पुन्हा छापा टाकला.

परमबीर सिंग यांच्या अडचणी वाढणार?

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर इथं बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन खरेदी केल्याप्रकरणी ठाणे पोलिसांनी परमबीर सिंग  यांचा निकटवर्तीय संजय पुनुमिया याला ताब्यात घेतलं आहे. यात मोठा खुल्सा होणायची शकयता आहे.

मोफत लस देतोय म्हणून पेट्रोल, डिझेल महागलं:  रामेश्वर तेली

मोफत लस देतोय म्हणून पेट्रोल, डिझेल महागलं, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री रामेश्वर तेली यांनी मुक्ताफळ उधळली.  त्यांच्या या वक्तव्यामुळं खळबळ उडाली आहे.

कोळसा संकटात देशवासियांच्या मदतीला रेल्वे धावली

देशात अनेक वीज प्रकल्पांना कोळशाच्या तुटवड्याचा सामना करावा लागत आहेत. अशावेळी, रेल्वे गाड्यांची लोडिंग क्षमता वाढवून औष्णिक वीज प्रकल्पांपर्यंत कोळसा पोहचवण्याची जबाबदारी भारतीय रेल्वेनं घेतलीय.

दिवाळीत मोठा घातपाताचा कट

दिवाळीत मोठा घातपात करण्याच्या तयारीत असलेल्या एका पाकिस्तानी दहशतवाद्याला अटक करण्यात दिल्ली पोलिसांना यश आले आहे.  त्याने बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतीय ओळखपत्र मिळवले होते.

लखीमपूर हिंसाचार ; शेतकऱ्यांनी प्रियांका गांधींसह त्यांना मंचावर येऊ दिलं नाही

लखीमपूर खेरीच्या टिकुनियात  शोकसभा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रियांका गांधी, दीपेंद्र सिंह हुड्डा, यूपी काँग्रेसचे प्रमुख अजय कुमार लल्लू काँग्रेसकडून दाखल झाले. संयुक्त किसान मोर्चाने नेत्यांचे आभार मानले पण मंचावर येऊ दिले नाही.

मानवी हक्कांच्या नावाखाली देशाची प्रतिमा मलिन करण्याचं काम: पंतप्रधान

मानवी हक्क या गोष्टीकडे केवळ राजकीय फायदा म्हणून पाहिलं जातंय. त्यामुळे मानवी हक्कांचं तसेच देशाच्या लोकशाहीचं मोठं नुकसान होतंय असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

दोन बारावी नापास चोरट्यांकडून एटीमकार्ड क्लोन करून लाखो रुपयांची चोरी

बिहारच्या दोन बारावी 12 वी नापास चोरट्यांनी एटीमकार्ड क्लोन करून लाखो रुपयांची चोरी केली. आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी यवतमाळ पोलीस बिहारमध्ये 8 दिवस मळकट टी शर्ट आणि बरमुडा घालून तपास करत होते.

मुलांच्या लसीकरणाचा मार्ग मोकळा

दोन ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी Covaxin लसीचा वापर करण्यात यावा अशी महत्वपूर्ण शिफारस सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटीने DCGI कडे केली आहे. त्यामुळे  आता लहान मुलांसाठीच्या लसीकरणाचा मार्ग मोकळा होत

खराब जीवनशैलीमुळे संधिवात होण्याचा धोका दुप्पट

खराब जीवनशैलीमुळे संधिवात होण्याचा धोका दुप्पट झाल्याचे समोर आले आहे. सध्या पाचपैकी एक महिला रूमेटाइड अर्थरायटिसनं  पीडित आहे.

अजय देवगणही दिसणार बेअर ग्रील्सच्या शोमध्ये

पंतप्रधान नरेंद्र मोदी, अभिनेता रजनीकांत आणि अक्षय कुमारनंतर आता  ‘इंटू द वाइल्ड विथ बेअर ग्रील्स’ या शोमध्ये बॉलिवूडचा सिंघम म्हणजेच अजय देवगण हजेरी लावणार आहे.

Facebook वर मोठा बदल

फेसबुक पेजने देशातील यूजर्ससाठी लाइक  बटण काढून टाकले आहे आणि एका पृष्ठाच्या फॉलोअर्सवर लक्ष केंद्रित केले आहे.

डिविलियर्स, विराटला अश्रू अनावर

कोलकाताच्या संघानं एलिमिनेटर सामन्यात बंगळुरुचा पराभव करत विराटचा स्वप्नभंग केला.  सामना संपल्यानंतर इतर खेळाडूंशी संवाद साधत असताना विराट, ए बी डिविलियर्सलाही अश्रू रोखता आलं नाही. 

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!