“…म्हणून आत्महत्या करतोय,” पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपती गौतम पाषाणकर

Goan Varta Live | प्रतिनिधी
पुणे: पुण्यातील प्रसिद्ध पाषाणकर उद्योग समूहाचे प्रमुख गौतम पाषाणकर बुधवारी बेपत्ता झाल्याची घटना समोर आल्यानंतर शहरातील उद्योजक क्षेत्रात एकच खळबळ उडालिये. कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी शोध सुरु केलाय. तपास सुरू असताना गौतम पाषाणकर यांची सुसाईड नोट समोर आलीये. सुसाईड नोटमध्ये व्यवसायातील आर्थिक नुकसानामुळे आत्महत्या करत असल्याचं त्यांनी लीहिलंय.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “गौतम पाषाणकर हे बुधवारी नेहमीप्रमाणे ऑफिसच्या कामानिमित्त बाहेर पडलेले.तेथून ते शिवाजीनगर येथील ऑफिसमध्ये आल्यावर त्यांनी एक बंद लिफाफा चालकाकडे दिला आणि हा घरी दे असं सांगितल. चालक लिफाफा देण्यासाठी घरी गेला. त्यानंतर पाषाणकर ऑफिस मधून बाहेर पडले आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या दिशेने चालत निघून गेले. गौतम पाषाणकर घरी न आल्याने कुटुंबीयांनी अखेर पोलीस स्थानकात धाव घेतली”.
तपास सुरू असताना चालकाकडे दिलेल्या लिफाफ्यात सुसाईट नोट असल्याचं आढळून आलंय. मागील काही दिवसापासुन व्यवसायात झालेल्या नुकसानामुळे आत्महत्येचं पाऊल उचलत असल्याचं त्यांनी त्यात लिहिलंय. यानंतर तपासाचा वेग वाढवला असून विद्यापीठ परिसरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातुन शोध सुरु असल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांनी दिलीये
– हेही वाचा
स्वप्नील वाळके खूनप्रकरणी बिहारमधून तिघांना अटक
अबब! केरया-खांडेपार इथं पकडली 9 फूट लांबीची मगर