फास्ट टॅग लावून घ्या.. कारण फास्ट टँग लेनमध्ये घुसणं आता पडणार महागात

Goan Varta Live | प्रतिनिधी
पुणे : मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील टोल नाक्यावर राखीव असलेल्या प्रत्येकी दोन ‘फास्ट टॅग लेन’मध्ये घुसणे वाहनचालकांना महागात पडतंय. फास्ट टॅग नसल्यास वाहनचालकांकडून दुप्पट टोल वसुली 1 नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आलीये. पहिल्या आठवडाभरात सुमारे ३ हजार वाहनांकडून 7 लाख रुपयांची वसुली करण्यात आलीये. देशात मागील सहा महिन्यांपासून ‘फास्ट टॅग या इलेक्ट्रॉनिक टोल प्रणाली सुरु करण्यात आलीये.
2 कोटी वाहनांना फास्टटॅगच नाही
मागील वर्षी राष्ट्रीय महामार्गावर ‘फास्ट टॅग टोल वसुलीसाठी एक ते दोन लेन वगळता सर्व लेन राखीव ठेवण्यात आल्या होत्या. पण अनेक वाहनांना ‘फास्ट टॅग नसल्याने वाहनांच्या लांबलचक रांगा लागलेल्या, त्यामुळे हे बंधन घालण्यात आलंय. आता नवीन वर्षापासून याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येणारे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माहितीनुसार, देशातील फास्ट टॅग असलेल्या वाहनांचा आकडा 2 कोटींपर्यंत पोहचलाय.
दोन लेन फास्टटॅगसाठी
त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत रोजची एकूण टोलवसुली 52 कोटींवर पोहचलीये. मागील वर्षी हा आकडा सुमारे 70 कोटी एवढा होता. दोन्ही बाजूंनी प्रत्येकी 8 याप्रमाणे 16 लेन आहेत. सर्व लेनमधून “फास्ट टॅगसह अन्य पर्यायांद्वारे टोल वसुली होत होती. पण 1 नोव्हेंबरपासून प्रत्येकी दोन लेन केवळ फास्ट टॅगसाठी राखीव ठेवण्यात आलेत. तर उर्वरीत सहा लेनमधून सर्व वाहनांना जाता येणारे.