रुग्णाचं फुफ्फुस झालं ‘लेदर बॉल’सारखं

फुफ्फुसातील हवा भरण्याचा भाग पूर्णपणे झाला खराब

Goan Varta Live | प्रतिनिधी

कर्नाटक: करोनाचे दररोज हजारो नवीन रुग्ण आढळून येतायेत.आणि दुसरीकडे करोनामुळे शरीरावर होणारे दुष्परिणामही समोर येतायेत. असाच एक प्रकार कर्नाटकात रुग्णाच्या शरीरात आढळून आलाय. करोनामुळे मरण पावलेल्या या रुग्णाचं फुफ्फुस लेदर बॉलसारखं झाल्याचं शवविच्छेदन (postmortem) करताना आढळून आलंय. करोना विषाणू माणसाच्या शरीरात जाऊन त्याच्या फुफ्फुसावर हल्ला करतात ,यात अनेक रुग्ण मृत्यूला सामोरे जातात . करोना विषाणुमुळे रुग्णाच्या फुफ्फुसाची किती भयंकर अवस्था होते, हे कर्नाटकातील रुग्णाच्या शवविच्छेदनानंतर(postmortem) दिसून आलंय.

62 वर्षांच्या एका रुग्णाचा करोनामुळे मृत्यू झालाय . या रुग्णाचा मृत्यू फुफ्फुसाची विचित्र अवस्था झाल्यानं रुग्णाचा बळी गेल्याचं आढळून आलंय. धक्कादायक बाब म्हणजे रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर 18 तासांनंतरही त्याच्या नाक व घशात करोनाचे जिवंत विषाणू आढळून आलेत.
रुग्णाच्या मृत्यूनंतरही मृतदेहाच्या संपर्कात आल्यास करोना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ऑक्सफर्ड वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर दिनेश राव यांनी सांगितलं की, “या रुग्णांचं फुफ्फुस करोनाच्या संक्रमणामुळे एखाद्या लेदर बॉलसारखे झालेलं. फुफ्फुसात हवा भरणारा भाग पूर्णपणे खराब झालेला. वाहिन्यांमध्ये रक्ताच्या गाठी बनल्या होत्या. मृतदेहाच्या तपासणीमुळे करोनाची नवी अवस्था समजून घेण्यास मदत मिळालीये,” असंही ते म्हणाले.

राव यांनी मृतदेहाच्या नाक, घसा, तोंड, फुफ्फुसाचा पृष्ठभाग, चेहरा व गळ्याच्या त्वचा अशा पाच ठिकाणचे नमुने घेतलेले. RTPCR चाचणीनंतर कळालं की घशात आणि नाकात करोना विषाणू जीवंत होतेे. त्यातूनच ही माहिती समोर आली की, करोना रुग्णाच्या मृतदेहापासूनही दुसरे लोक संक्रमित होण्याची दाट शक्यताये.

हेही वाचा

कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका https://www.goanvartalive.com/national/kapil-dev-has-undergone-a-successful-angioplasty/

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!