भंगार अड्ड्याला लागलेल्या आगीची सखोल चौकशी करा, दोषीवर कार्यवाही करा:- विश्वेश नाईक

भंगार अड्ड्याला लागलेल्या आगीमुळे अनेकांचे आरोग्यावर परिणाम, याला जबाबदार ढवळीकर कवळे पंचायत:- आर.जी.

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्यूरो रिपोर्ट, फोंडा:– ढवळी फोंडा इथे भंगार अड्ड्याला लागलेल्या आगीमुळे लोकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. कालपासून ही आग सुरूच असून अग्निशामक दलाचे जवान त्या घटनास्थळी ह्या क्षणापर्यंत ती आग विझविण्याचे काम करत आहे. काल ही घटना रेव्होलुशनरी गोवन्स च्या प्रमुखांनी समाज माध्यमाद्वारे दाखवली होती. आज परत एकदा त्या घटनानास्थळावर निरीक्षण करण्यासाठी गेले होते. यावेळी रेव्होलुशनरी गोवन्स चे सहसंस्थापक विश्वेश नाईक, प्रेमानंद गावडे, शैलेश नाईक, रूपो जलमी, गौरेश गावडे सरगम नाईक, नरेश गावडे व इतर उपस्थित होते.

यावेळी पत्रकारांशी बोलताना विश्वेश नाईक, म्हणाले की, ही जी भंगार ॲड्याला आग लागण्याची घटना घडली आहे, तिच्यामुळे मनुष्याच्या आरोग्यावर भयंकर परिणाम होणार आहे. आम्ही रेव्होलुशनरी गोवन्स वेळोवेळी अशा बेकायदेशीर धंद्याविरुद्ध आवाज उठवत आलो आहेत, पण स्थानिक पंचायत मंडळ त्याच बरोबर स्थानिक आमदार यांच्याच अकार्यक्षमतेमुळे आज अशा घटना घडत आहेत. प्रत्येक वेळी आर.जी. बेकायदेशीर गोष्टीविरुद्ध सरकारच्या निदर्शनात आणून देण्याचे काम करतात परंतु त्यांच्यावर गंभीरतेने लक्ष न दिल्यामुळे अशा घरा घडतात आणि याचे परिणाम जनतेला भोगावे लागतात.

काल सुदिन ढवळीकर यांनी या घटनेवर केलेल्या विधानावर, विश्वेश नाईक म्हणाले की, स्थानिक आमदार फक्त आपल्या वोट बँक साठी अशा प्रकारच्या भंगार अड्ड्याना अभय देतात. त्यांच्यापासून त्यांना भरपूर हफ्ते मिळतात. जर असे नसेल तर त्यांनी यापूर्वी जेव्हा आर.जी. ने दाखवून दिले होते की हे भंगार अड्डे हटवण्यात यावे, तेव्हाच हटवले असते, परंतु तसे केले गेले नाही. आज इथे ह्या भंगार अड्ड्यात दवाखान्यातील कचरा, केमिकल सहित अत्यंत हानिकारक पदार्थ सुद्धा दिसून आले आहेत, आणि ते जळाल्यामुळे जवळच्या लोकांना त्याचबरोबर अग्निशामक जावाणाबरोबर अनेकांना आपल्या आरोग्यावर परिणाम होणार आहे. ह्या अशा घटनांना ढवळीकर त्याच बरोबर पंचायत जबाबदार असल्याचे नाईक म्हणाले.

आगीच्या अशा घटना जेव्हा घडतात, तेव्हा अग्निशामक दलाचे जवान आपला जीव दोख्यात घालून ती आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करतात. पण हे काम करताना त्यांच्याकडे स्वताच्या सुरक्षा करण्यासाठी काहीच नसतात. राज्य सरकार त्यांना ती सुरक्षा किट उपलब्ध करण्यात अपयशी ठरले आहे. यापुढे तरी सरकारने ह्या गोष्टीकडे गंभीरतेने लक्ष देऊन त्यांनाही स्वतः सुरक्षित राहून काम करण्यास द्यावे अशी विनंती विष्वेश नाईक यांनी केली.

वेलिंग प्रियोळ चे रुपो जल्मी यांनी सरकारवर टीका करताना म्हटले की, सरकार आजपर्यंत परप्रांतीय कामगारांचा रेकॉर्ड ठेवण्यात अपयशी ठरले आहे. स्थानिक आमदार ढवळीकर यांनी आज कळाले की हा भंगार अड्डा बेकायदेशीर आहे. याला परवाना आहे. इतकी वर्षे हा आमदार आहे. दहा बारा वर्षांपासून हा भंगार अड्डा इथे आहे. तर हे ढवळीकर करतात तरी काय. पंचायत मंडळाने सुद्धा स्थानिकांनी तक्रार करून सुद्धा हा भंगार अड्डा का हटवला नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

शिरोडा मतदारसंघाचे शैलेश नाईक यांनी या घटनेची सखोल चौकशी व्हावी आणि यापुढे अशा भंगार अड्ड्यावर कार्यवाही करून हटवण्यात यावे अशी विनंती केली

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!