ट्विटरची व्हेरिफाईड ‘ब्लु टिक’ काय गेली, सगळे सेलेब्रिटीज आणि राजकारणी पुन्हा जमिनीवर आले …

ट्विटरने लेगसी व्हेरिफाईड अकाऊंटवरुन ब्लू टिक काढून टाकली आहे. यामध्ये अति महनीय अभिनेते, खेळाडू, राजकारणी यांचा समावेश आहे.ट्विटर ब्लु पॉलिसीचा दणका

ऋषभ | प्रतिनिधी

ट्विटर ब्लू पॉलिसी आणल्यानंतर, कंपनीने 1 एप्रिलपासून सर्व व्हेरिफाईड अकाउंट्स बंद करण्याचा आणि त्या युजर्ससाठी चेकमार्क (ब्लू टिक) काढून टाकण्याचा इशारा दिला होता. एलॉन मस्क यांनी स्पष्ट केलं होतं की, ज्यांच्याकडे ट्विटर ब्लू मेंबरशिप नाही, त्यांच्या अकाउंटवरून ब्लू टिक काढून टाकण्यात येईल. त्यानंतर ट्विटरचे मालक इलॉन मस्क (Elon Musk) यांनी 12 एप्रिल रोजी अजून एक घोषणा केली होती की 20 एप्रिलपासून सर्व लेगसी व्हेरिफाईड अकाऊंटचे ब्लू टिक काढून टाकले जातील. आता फक्त अशा लोकांनाच ही सुविधा मिळणार आहे, जे ब्लू टिकसाठी पैसे खर्च करुन मासिक योजना घेतील. यानंतर, 20 एप्रिलच्या रात्री 12 वाजता, अशा सर्व अकाऊंटचे ब्लू टिक काढून टाकण्यात आले.

Twitter Blue Tick: एलॉन मस्क का बड़ा ऐलान, आज से हटा दिए जाएंगे ब्लू टिक -  social media platform twitter blue tick removed today elon musk ntc - AajTak

यापूर्वी, ट्विटर राजकारणी, अभिनेते, पत्रकारांसह सेलिब्रिटींच्या अकाऊंटला ब्लू टिक देत असे. यासाठी कोणतंही शुल्क आकारलं जात नव्हते, मात्र इलॉन मस्क यांनी ट्विटर विकत घेतल्यानंतर कंपनीने अनेक मोठे बदल केले आहेत.

ब्लू टिक पेड सर्विस अर्थात सशुल्क सेवा. ज्यांना ब्लू टिक आहे त्यांना त्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. सुरुवातीला ही सेवा यूएस, यूके, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये करण्यात आली होती. त्यानंतर आता याची भारतातही सुरुवात झाली आहे. या अंतर्गत, या सेवेसाठी पैसे देणाऱ्यांनाच त्यांच्या अकाऊंटवर ब्लू टिक मिळू शकते.

Twitter Removes Blue Checkmark:क्यों हटाए गए विराट कोहली से लेकर शाहरुख खान  तक के ट्विटर ब्लू टिक, जानें कारण - Why Did Twitter Remove Blue Tick From  Virat Kohli To Shah Rukh

युझरला ब्लू टिक हवी असेल किंवा आधीच मिळालेली ब्लू टिक कायम ठेवायची असेल तर त्याला ट्विटर ब्लूचे सदस्यत्व घ्यावे लागेल. भारतात ट्विटर ब्लूचे सबस्क्रिप्शन रु. 650 पासून सुरु होते. मोबाईल युझरसाठी ते दरमहा 900 रुपये आहे.

आतापर्यंत फक्त सेलिब्रिटी, सरकारी संस्था किंवा प्रसिद्धीझोतात असलेल्या व्यक्तींना ट्विटरकडून व्हेरिफाईड टॅग असलेलं ब्लू टिक दिलं जायचं. दरम्यान, आता एलॉन मस्कच्या सबस्क्रिप्शन प्लॅन अंतर्गत, कोणीही दरमहा पैसे देऊन ब्लू टिक विक घेऊ शकणार आहे. यासोबतच ब्लू टिक युजर्सना काही अतिरिक्त सुविधा देखील मिळतील, जसे की ट्वीटची कॅरेक्टर लिमिट अधिक असेल. यासोबतच ट्वीटमध्ये एडिट किंवा अनडू पर्यायही उपलब्ध असतील. 

ट्विटरचे व्हेरिफाईड बॅच गेलेल्यांमद्धे अनेक दिग्गज अभिनेते, खेळाडू, राजकारणी यांचा समावेश आहे. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन , शाहरुख खान , सलमान खान , अक्षय कुमार ते क्रिकेटपटू विराट कोहली, महेंद्रसिंह धोनी आणि भारतीय राजकारणातील मोठी नावे जसं की महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार , काँग्रेस नेते राहुल गांधी, यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, अरविंद केजरीवाल यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन ब्लू टिक हटवण्यात आली आहे.

Who Are Top 10 Most Followed Indian Celebrities On Twitter? Find Out -  odishabytes
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!