टिजेएसबी सहकारी बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (MD CEO ) सुब्बालक्ष्मी शिराळींची नियुक्ती

Goan Varta Live | प्रतिनिधी
ब्यूरो रिपोर्ट ठाणे, दि. 2जून : सुब्बालक्ष्मी शिराळी यांची टिजेएसबी बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून ( MD & CEO ) सुब्बालक्ष्मी शिराळी यांची नियुक्ती दिनांक एक जून 2023 पासून करण्यात आली आहे. सुब्बालक्ष्मी शिराळी यांनी वाणिज्य शाखेतील पदव्युत्तर शिक्षण घेतलेले आहे. CISA & CISM चे शिक्षण अमेरिकेच्या ISACA संस्थेतून घेतले आहे. सुब्बालक्ष्मी शिराळी यांना चौतीस वर्षाचा बँकिंगचा प्रदीर्घ अनुभव आहे.
बँकिंग मधील रिटेल बिजनेस , क्रेडिट, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, रिस्क ,ऑपरेशन्स, आणि कंप्लायन्स यातील तज्ज्ञ म्हणून सुब्बालक्ष्मी शिराळी ओळखल्या जातात. नोव्हेंबर 2020 पासून सुब्बालक्ष्मी शिराळी मुख्य सरव्यवस्थापक म्हणून टिजेएसबी बँकेत कार्यरत आहेत .

व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सुब्बालक्ष्मी शिराळी टिजेएसबी सहकारी बँकेला वेगाने प्रगतीपथावर पुढे नेतील असा विश्वास बँकेच्या संचालक मंडळाने व्यक्त केला आहे
बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील साठे दिनांक ३१ मे रोजी निवृत्त झाले आहेत. सुनील साठे हे 23 वर्ष टीजेएसबी मध्ये कार्यरत होते. चलन विमुद्रीकरण, जीएसटी कर प्रणाली, जागतिक कोरोना आपत्ती, रशिया युक्रेन युद्धाचा कालावधी अशा जागतिक अर्थकारणाच्या कठीण काळात टीजेएसबी सहकारी बँकेचा नफा सुनील साठे यांनी घसरू दिला नाही. नियोजनपूर्वक बँकेची आर्थिक स्थिती सुस्थिर ठेवून बँकेच्या आगामी काळाची तरतूद केली आहे.

सुनील साठे यांनी नवनियुक्त व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुब्बलक्ष्मी शिराळी यांना शुभेच्छा दिल्या आहेत.