जी२०च्या विकासात्मक कार्यगटाच्या तिसऱ्या बैठकीदरम्यान सेरेन्डिपिटी आर्ट्सच्या आर्ट हॉटेल प्रकल्पाचे उद्घाटन

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्यूरो रिपोर्ट, पणजी : जी२०च्या विकासात्मक कार्यगटाच्या तिसऱ्या बैठकीचे आयोजन दोनापावला येथील ताज कन्व्हेन्शन सेंटरमध्ये करण्यात आले आहे. यानिमित्ताने सांस्कृतिक भागीदार असलेल्या सेरेन्डिपिटी आर्ट्सने विकसित केलेला आर्ट हॉटेल या प्रकल्पाचे अनावरण आज करण्यात आले. देशातील तसेच गोव्यातील महत्वाच्या, दुर्मिळ अशा सांस्कृतिक बाबींची ओळख देशविदेशी प्रतिनिधींना करून देण्याच्या आणि त्या माध्यमातून एक अनोखा सांस्कृतिक अनुभव देण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प विकसित करण्यात आला आहे.


आर्ट हॉटेल प्रकल्पाचे औपचारिक उद्घाटन गोवा राज्याचे माननीय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाचे सहसचिव श्री. के. नागराज नायडू, गोवा राज्याचे वाहतूक, उद्योग, पंचायत राज आणि राजशिष्टाचार मंत्री श्री. माविन गुदिन्हो, जी२०साठीचे राज्याचे नोडल अधिकारी श्री. संजित रॉड्रिग्स आणि सेरेंडिपिटी आर्ट्सचे संस्थापक तसेच दि ब्रिजचे संस्थापक श्री. सुनील कांत मुंजाल यांच्या उपस्थितीत करण्यात आले.


भारताची सांस्कृतिक ओळख घडवलेल्या, बनलेल्या अशा समृद्ध आणि वैविध्यपूर्ण हस्तकला परंपरांना एकत्र आणणे आणि त्यांची एक झलक जगाला घडवणे आणि आधुनिक रचनाकृती व नाविन्यपूर्ण प्रयोगांच्या माध्यमातून त्यांचे पुनर्शोधन करावे या उद्देशाने हा प्रकल्प काम करणार आहे. या प्रदर्शनाद्वारे संस्कृती आणि कलाप्रकार यांच्या माध्यमातून भारतीय उपखंडातील इतिहास आणि मार्गदक्रमणाला कशा प्रकारे दिशा मिळत गेली यावर प्रकाशझोत टाकण्याचे उद्दिष्ट सेरेंडिपिटी आर्ट्सचे आहे.


उद्घाटन प्रसंगी गोव्याचे माननीय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की “भारताचा इतिहास समृद्ध आहे.प्रदेशांनुरूप भारतातील कला आण हस्तकलेमध्ये विविधता आढळते. सेरेंडिपिटी आर्ट्ससोबत भागीदारी केलेला हा अनोखा आर्ट हॉटेल प्रकल्पातून जी२० प्रतिनिधींना भारताचा इतिहास, संस्कृती आणि वारसा समजून घेण्याची संधी उपलब्ध करेल.”
गोवा राज्याचे वाहतूक, उद्योग, पंचायत राज आणि राजशिष्टाचार मंत्री श्री. माविन गुदिन्हो म्हणाले, “जी२० बैठकींच्या माध्यमातून जगाला भारतातील श्रीमंत इतिहास, संस्कृती व वारसा यांचा अनोखा अनुभव मिळत आहे ही बाब महत्वाची आहे. प्रत्येक भूमीस स्वतःची अशा संस्कृती आणि वारसा आहे जो इतिहासातून समृद्ध होत आला आहे. या सर्व बाबींना कला आणि हस्तकला एकत्र आणते. त्यामुळे भारतातील श्रीमंत कला व संस्कृतीचे दर्शन घडवण्यासाठी आर्ट हॉटेल प्रकल्प येथे अभ्यासपूर्ण पद्धतीने विकसित करण्यात आला आहे.”


विविध भागांमध्ये विभागलेला हा आर्ट हॉटेल प्रकल्प प्रेक्षकांना भारताच्या इतिहासाची ओळख करून देतो, आपले सामाजिक मूळ शोधण्याची संधी उपलब्ध करतो आणि गोव्यातील विविध सांस्कृतिक परंपरा आणि प्रथांमागील कथेचा सखोल अभ्यास करण्यास साद घालतो. पुढील विभागात प्रेक्षकांना पारंपरक कारागिरांनी विकसित केलेल्या आधुनिक, नावीन्यपूर्ण रचनाकृतींचा अनुभव मिळतो. त्यानंतर वारसा कक्षामध्ये प्रादेशिक हस्तकला कारागिरीचा वैविध्यपूर्ण, विस्तृत नमुन्यांचा खजिना सादर करतो.


याप्रसंगी सेरेंडिपिटी आर्ट्सचे संस्थापक तसेच दि ब्रिजचे संस्थापक श्री. सुनील कांत मुंजाल म्हणाले, “गोव्यातील जी२० बैठकीच्या आयोजनामध्ये सांस्कृतिक भागीदार म्हणून सहभागी होण्याचा तसेच देशाचा समृद्ध सांस्कृतिक वारसा जागतिक व्यासपीठावर प्रदर्शित करण्याची संधी मिळाल्याबद्दल आम्हाला सार्थ अभिमान आहे. जागतिक व्यासपीठ. कलेच्या माध्यमातून कलाकार, कारागिर लोक, प्रदेश आणि संस्कृतीना एकत्र आणतात आणि आपल्या संस्कृतीची श्रीमंती साजरी करण्याची संधी उपलब्ध करतात या विचाराने आणि विश्वासाने आम्ही गत काही वर्षांत आम्ही दक्षिण आशियातील कला आणि सर्जनशील व्यावसायिकांसाठी अनेक व्यासपीठे विकसित केली आहेत. गोव्याला एक जागतिक सांस्कृतिक केंद्र बनवण्याच्या आमच्या वचनबद्धतेवर आम्ही ठाम आहोत. आमच्या या कार्याला पाठबळ दिल्याबद्दल गोवा राज्य सरकार आणि त्यांच्या विविध विभागांचे आभारी आहोत.”
या हस्तकला प्रकारांसोबतच सेरेंडिपिटी आर्ट्सद्वारे एक ‘टिंटो’ही सादर केला जात आहे. पूर्वी गोव्याच्या प्रत्येक गावात एक छोटी-मोठी बाजारपेठ असे. ही बाजारपेठ गावकऱ्यांच्या दैनंदिन जीवनाचे चित्र घडवणारे चैतन्यमय, रंगीबेरंगी असे केंद्र होते. गावातील बाजाराला लागूनच असलेला टिंटो म्हणजे लोकांना एकत्र आणणारा, संवाद घडवणारा बैठकीचा कट्टा होय.

हा ऐतिहासिक धागा पकडत जी२०च्या निमित्ताने विकसित हा टिंटो जी२०मधील सहभागी प्रतिनिधींना गोव्याची एक संस्मरणीय ओळख घरी नेता येईल अशी संधी उपलब्ध करत उच्च-गुणवत्तेच्या आणि वाजवी किमतीच्या पारंपरिक वस्तू उपलब्ध करतो. गोमंतकीय आदिवासी परंपरेतील कपड्यांपासून सर्व काही; लाफॅब्रिका क्राफ्टचे स्टेशनरी उत्पादनांपासून पारंपरिक सौंदर्यवर्धन उत्पादनांपर्यंत; कुवा बॉटनिकल्स आणि क्विंटा इसेन्शिया ऑर्गेनिकची त्वचारक्षण उत्पादने अशी विविध उत्पादने टिंटोमध्ये उपलब्ध करण्यात आली आहेत. तसेच वन्य या वनोपज उत्पादनांपासून विकसित मसाले उत्पादने पाहिल्यानंतर त्यांच्याशिवाय आपण घरी परतणारच नाही हा आम्हाला विश्वास आहे. त्याचबरोबर गोवा डेकॉर, माराकुजा आर्ट स्टुडिओ, लॉस्ट वेदाज आदींनी विकसित कलारचनांचा आंनदही या आर्ट हॉटेलमध्ये मिळणार आहे.


गेली अनेक वर्षे कार्यरत कलारचनाकार आणि कलारचना संशोधक यांच्यासमवेत सेरेंडिपिटी आर्ट्सने काम केले आहे. भारतातील विविध हस्तकला संस्कृतींचे संवर्धन करणे, त्यांना प्रोत्साहन देणे यासाठी एक सक्षम व्यासपीठ उपलब्ध करण्यासाठी सेरेंडिपिटी आर्ट्सच्या ध्यासमग्न कार्यास अंजना सोमाणी, आयुष कासलीवाल, चंद्रिका ग्रोव्हर, ज्योतिंद्र जैन, जत्ता जैन-नेवबावर, क्रिस्टीन मायकेल, लैला तयबजी, मंजरी नरुला, प्रमोद कुमार केजी आणि रश्मी वर्मा अशा विविध कलारचनाकार आणि कलाकारांनी सातत्याने पाठबळ व सहकार्य दिले आहे.
सेरेंडिपिटी आर्ट्सच्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून भारतातील विविध हस्तकला परंपरा आणि पद्धतींचे संवर्धन करणे, प्रसार करणे, विस्तार करणे, पुनरुज्जीवन करणे यासाठी विविध कला रचनाकार, प्रतिभावान कारागीर आणि कलाकार यांनी अविरतपणे परिश्रम घेतले आहेत. त्यांच्या ध्यासमग्न भक्तीसम कार्यामुळेच आज आपल्याकडे जगासमोर सादर करण्यास एक वारसा, परंपरा उपलब्ध आहे. या कलासंस्कृती कार्यामध्ये अहसान अली, अकबर खान, भुवनेश प्रसाद, दिनेश चंद्र कुम्हार, अनटायटल्ड डिझाईनचे ‘फर्गोनॉमिक्स’, इक्बाल अहमद, जय प्रकाश, मोहम्मद घौश, मोहन कुमार वर्मा, ओम प्रकाश गलव, ऊर्जा डिझाइन्स एलएलपी, प्रियांका नरुला, राम सोनी, राजेश टी. आचार्य, शंकर विश्वकर्मा, सुकुमार गुडिगर आणि सुंदरीबाई आदी अनेक कलाकारांचे योगदान राहिले आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!