कर्नाटकचे सरकार 20 मे रोजी होणार स्थापन, कॅबिनेट मंत्रिमंडळ ठरल्यात जमा

कर्नाटकात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशिवाय आणखी किती आमदारांची कॅबिनेटमध्ये वर्णी लागू शकते जाणून घ्या

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्यूरो रिपोर्ट 19 मे : कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशिवाय 20 मे रोजी होणाऱ्या समारंभात 18 मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे, त्यात पक्षाचे ज्येष्ठ नेते जी. परमेश्वर, एम.बी. पाटील आदींचा समावेश आहे. काँग्रेसने गुरुवारी पक्षाचे दिग्गज नेते सिद्धरामय्या यांना पुढील मुख्यमंत्री म्हणून नियुक्त केले, तर राज्य युनिटचे प्रमुख डी. शिवकुमार यांना एकमेव उपमुख्यमंत्री म्हणून घोषित करण्यात आले. यासोबतच 20 मे रोजी दुपारी बेंगळुरूमध्ये शपथविधी सोहळा आयोजित करण्याची योजना आखण्यात आली होती. पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य मंत्रिमंडळात एकूण 28 मंत्री असतील, ज्यात सिद्धरामय्या आणि शिवकुमार कॅम्पमधील 14 मंत्र्यांचा समावेश आहे.

Commission percentage has increased from 40% to 60%: Siddaramaiah - The  Hindu

पक्षाच्या सूत्रानुसार, संभाव्य मंत्र्यांमध्ये माजी उपमुख्यमंत्री परमेश्वरा, कृष्णा बायरे गौडा, सतीश जारकीहोळी, लक्ष्मण सावदी, लक्ष्मी हेब्बाळकर, सलीम अहमद, यू.टी. खादर, संतोष लाड, दिनेश गुंडू राव, जमीर अहमद, एम.पी. पाटील, एच.के. पाटील, रामलिंगा रेड्डी, के.जे. जॉर्ज, ईश्वर खांद्रे, तन्वीर सेठ, डॉ.एच.सी.महादेवप्पा आणि बी.के. हरिप्रसाद यांचा समावेश आहे.

Karnataka Elections 2023: Congress shares 3rd list of candidates;  Siddaramaiah snubbed - BusinessToday

गेल्या तीन दिवसांत अनेक बैठकांच्या फेऱ्यांनंतर पक्षाने कर्नाटकच्या पुढील मुख्यमंत्र्याबाबतचा सस्पेंस संपवला. याआधी सिद्धरामय्या आणि शिवकुमार हे दोघेही सर्वोच्च पदासाठी ठाम होते. या मुद्द्यावरील गतिरोधामुळे यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांना हा प्रश्न सोडवण्यासाठी हस्तक्षेप करावा लागला. दोन्ही नेते राष्ट्रीय राजधानीत तळ ठोकून होते. दोघांनी पक्षप्रमुख मल्लिकार्जुन खर्गे, सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल आणि कर्नाटकचे प्रभारी रणदीप सिंह सुरजेवाला यांची स्वतंत्रपणे भेट घेतली होती.

Congress wins Karnataka. Who will be the next Chief Minister? | Mint

बुधवारपर्यंत ज्येष्ठ नेत्यांची स्वतंत्रपणे भेट घेतलेल्या दोन्ही नेत्यांनी सोनिया गांधींच्या मध्यस्थीनंतर वेणुगोपाल यांच्या निवासस्थानी न्याहारी केली आणि एकतेचा संदेश देण्यासाठी दोघेही एकाच गाडीतून खरगे यांच्या निवासस्थानी गेले. 10 मे रोजी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने दणदणीत विजय नोंदवला आहे. पक्षाला 224 पैकी 135 जागा मिळाल्या, तर सत्ताधारी भाजप 66 जागांवर घसरला.

Who will be Karnataka CM? Rift between Siddaramaiah & DK Shivakumar over  power-sharing - India Today
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!