एंटरटेंमेंट वार्ता : ‘जिंदगी तो आगे बढ़ानी पड़ती ही है…’ मित्र सतीश कौशिक यांची आठवण काढत अनुपम खेर झाले भावूक
बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांनी त्यांचे मित्र सतीश कौशिक यांना पत्र लिहिले आहे. अनुपम खेर यांचे पत्र वाचून तुमचेही डोळे ओले होतील

ऋषभ | प्रतिनिधी

हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सतीश कौशिक यांची आठवण करून त्यांचे मित्र अनुपम खेर आज भावूक झाले. अनुपम खेर यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ते आपल्या भावना व्यक्त करताना दिसत आहेत. व्हिडिओ शेअर करताना अनुपम खेर यांनी लिहिले,
‘मेरे दोस्त के नाम पत्र!!
मेरे प्यारे सतीश कौशिक! आप हमेशा मेरे जीवन का हिस्सा रहेंगे… लेकिन मुझे आगे बढ़ने की जरूरत है…। आपकी याद को जिंदा रखने के लिए।’
अनुपम खेर यांचा आपल्या मित्रासाठीचा भावनिक व्हिडिओ
अनुपम खेर हे त्यांचे ४५ वर्षांचे मित्र सतीश कौशिक यांच्या निधनाने पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहेत. व्हिडिओमध्ये अनुपम खेर म्हणतात, ‘मी तुमच्याशी बोलत आहे कारण मला माझ्या मित्राच्या जाण्याने दुःख झाले आहे आणि मी यातून सावरणे अशक्य आहे. सतीश आज आपल्यात नाही खंत खात आहे, कारण ४५ वर्षांची मैत्री खूप खोल आहे. एवढ्या वर्षांची मैत्री एक सवय बनते , अशी सवय, जी तुम्हाला कधीच सोडत नाही, मग भलेली तुम्ही ती सोडून जाण्याचा हरएक प्रयत्न करता. आणि तो गेल्यापासून आज सारखा विचार करत होतो की, काय खायचं, कुठे जायचं . मग अचानक मला आठवलं की सतीशला फोन करूया, मी फोन उचलला आणि फोन लावणारच होतो की … हे माझ्यासाठी खूप अवघड आहे.’
व्हिडिओमध्ये अनुपम खेर म्हणतात. की मला पुढे जायचे आहे आणि जेव्हा मी विचार केला की मी पुढे कसे जाऊ शकतो, तेव्हा मला वाटले की मी तुमच्याशी बोलू. व्हिडिओमध्ये अनुपम खेर म्हणत आहेत की माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतरही मी हललो होतो आणि हेच जीवनाचे सार आहे. आता मला माझ्या मित्राला आनंदी ठेवायचे आहे, कारण तिथून त्यालाही मी आनंदी व्हावे असे वाटेल. व्हिडिओमध्ये त्यांचे जुने दिवस आठवताना अनुपम खेर सांगतात की, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा दरम्यान ते दोघे खूप वेळ एकत्र घालवायचे. मी रोज सकाळी सतीशशी बोलायचो. अनुपम खेर सांगतात की, आम्ही दोघांनी आपल्या करिअरची सुरुवात एकत्र केली. आम्ही एकमेकांना मदत करायचो आणि एकमेकांचा हेवा करायचो, पण आम्ही रोज बोलायचो.
सतीश कौशिक यांची शेवटची होळी
ज्येष्ठ अभिनेते, निर्माता-दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. सतीश कौशिक यांचे वयाच्या ६६ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सतीश कौशिक यांनी मृत्यूच्या एक दिवस आधी मित्र आणि कुटुंबियांसोबत होळी खेळली होती.