अनिल इज सुटेबल बॉय फॉर नोबेल इन कमिंग डिकेड्स- जेंम्स ॲड्म्स

आंतरराष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या ' येल ड्रामा सिरीज ' या नाट्य लेखन स्पर्धेत अनिल सरमळकर यांचे गाजलेले The fox हे नाटक स्पर्धेत सहभागी होण्यास पात्र ठरले.

Goan Varta Live | प्रतिनिधी

गोंवन वार्ता लाईव्ह वेबडेस्क, 27 मे : कोकणातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे नाटककार कवी लेखक दिग्दर्शक अनिल सरमळकर यांच्या लेखनाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली जात असुन उत्तरोत्तर त्यांची किर्ती उंचावते आहे.

अनिल सरमळकर हे साहित्य क्षेत्रातील सर्व प्रकारामध्ये दर्जेदार लेखन करीत असुन चित्रपट क्षेत्रातही त्यांनी प्रवेश केला आहे, तथापि ज्येष्ठ भारतीय दिग्दर्शक समीक्षक सौमित्र चॅटर्जी यांनी अनिल यांच्या लेखनाबद्दल, लेखनाच्या दर्जाबद्दल गौरव उद्गार काढताना म्हणाले होते की ‘ अनिलचे लेखन आणि त्याचा व्यापकपणा आणि दर्जा पाहता त्यानी असेच लेखन केले तर ते भारतीय साहित्याला नोबेल प्राईज मिळवुन देतील.

का नाही आवडणार मला नोबेलच्या रांगेत उभे रहायला..?” : डाॅ. अनिल फाॅक्स  सनीबॅन्कर.. ( विशेष मुलाखत) | आपली सिंधुनगरी

तथापि अलिकडेच अमेरिकेतील प्रतिष्ठित जागतिक दर्जाच्या कोलंबिया विद्यापीठातील इंग्रजी साहित्य विभागातील इंग्रजीचे ज्येष्ठ प्रोफेसर व समीक्षक जेम्स ॲडम्स यांनी अनिल यांची इंग्रजी नाटके वाचुन अनिल सरमळकर यांच्या व्यापक क्षमतेच्या लेखनाचे प्रायोगिकतेचे तसेच भाषेच्या नव्या रचनेचे कौतुक केले आहे.


अनिल सरमळकर यांच्या लेखनाबद्दल मोठे विधान करताना ते म्हणाले की ‘ अनिल इज सुटेबल बॉय फॉर नोबेल… इन कमिंग डिकेड्स…. ”
अर्थात अनिल सरमळकर या लेखनात नव्या व्यापक जाणीवा आणि प्रयोगशीलता असणाऱ्या तरूण भारतीय लेखकाच्या लेखनात नोबेल प्राईज च्या स्तरावर झेप घेण्याची क्षमता आहे असे मला आज जाणवते आहे असे महत्वाचे मोठे विधान जेम्स ॲडम्स यांनी केले आहे.

ॲडम्स यांच्या विधानामुळे अनिल सरमळकर यांच्या लेखनची आता अधीक व्यापक पातळीवर साहित्य, रंगभूमी, कला,वैचारीक क्षेत्रातील नामवंत बुद्धीमत वर्तुळात चर्चा होत असुन अनिल यांच्या प्रसिध्दीत जागतिक पातळीवर उत्तरोत्तर वाढ होत आहे.

कोलंबिया विद्यापीठ हे जागतिक साहित्य आणि विचार वर्तुळाच्या केंद्रस्थानी आहे.

सर्व क्षेत्रातील प्रोफेशनल्स आणि एक्स्पर्ट्स, इंटलेक्चुअल्स येथून तयार होत असतात. साहित्य तत्वज्ञान कला विद्न्यान तत्रंज्ञान मानव्यविद्या शास्त्रे आदी सर्व न्यानाच्या क्षेत्रात कोलंबिया विद्यापीठ सर्वोच्च स्थानी राहिलेले आहे, अशा जगमान्य विद्यापीठातुन अनिल सरमळकर सारख्या अत्यंत सामान्य पार्श्वभूमीतुन खेड्यातून येणाऱ्या संघर्ष करणाऱ्या तरुण लेखकासाठी ही अत्यंत महत्वाची प्रतिक्रिया समजली जात आहे त्यामुळेच अनिल सरमळकर या छोट्या खेड्यातून आलेल्या मराठीतुन शिक्षणाची सुरुवात केलेल्या मात्र दमदार प्रायोगिक इंग्रजीमधे लेखन करणाऱ्या या लेखकाकडे संपूर्ण जागतिक साहित्याचे लक्ष वेधले गेले आहे.

तथापि अमेरिकेतील प्रख्यात येल युनिव्हर्सिटी नेही त्यांच्या लेखनाची प्रथम दखल घेतली असुन आंतरराष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या ‘ येल ड्रामा सिरीज ‘ या नाट्य लेखन स्पर्धेत अनिल सरमळकर यांचे गाजलेले The fox हे नाटक स्पर्धेत सहभागी होण्यास पात्र ठरले होते तसेच २०२४ च्या येल ड्रामा सिरिज ‘ स्पर्धेमध्ये सहभाग घेण्यासाठी खुद्द ” येल विद्यापीठाने अनिल यांना प्रेरीत करणारे पत्र पाठविले आहे.

The fox व Its Already Tomorrow ही नाटके व अनिल यांच्या इंग्रजी कविता लेखनामुळे जागतिक साहित्य वर्तुळाचा लक्ष आज त्यांच्याकडे वेधले गेले आहे.

कोलंबिया विद्यापीठातील इंग्रजीचे ज्येष्ठ प्रोफेसर व समीक्षक जेम्स ॲडम्स यांच्या विधानामुळे पुना एकदा अनिल सरमळकर यांचे नाव जागतिक साहित्याच्या केंद्रस्थानी आले आहे.

तथापि या संदर्भात अनिल सरमळकर यांची प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले
” मी माझ्या महाविद्यालयीन जिवनापासुन भारतीय साहित्य व जागतिक साहित्य व रंगभूमी याचा गांभीर्याने विचार,अभ्यास चिंतन, मनन करत आलोय आणि माझ्या कुवतीनुसार मराठी व इंग्रजीतुन लेखन करत आलो आहे मात्र मी प्रसिद्धी व इतर गोस्टीपासुन दुर राहुन माझे काम करत आलो आहे… आता माझ्या लेखनाची दखल जागतिक पातळीवरील मोठ मोठे लेखक कवी विचारवंत समीक्षक प्रोफेसर रंगकर्मी दिग्दर्शक घेत आहेत तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाची महान विद्यापीठे दखल घेत आहेत.

का नाही आवडणार मला नोबेलच्या रांगेत उभे रहायला..?” : डाॅ. अनिल फाॅक्स  सनीबॅन्कर.. ( विशेष मुलाखत) | आपली सिंधुनगरी


अर्थातच याचा मला खुप आनंद होत आहे की माझे लेखन एवढ्या मोठ्या स्तरावर पोहचले आहे
मात्र आता माझी जबाबदारीही निश्चितच अधिक वाढली आहे याची मला जाणीव आहे आणि जसा मी साहित्य,कला इत्यादी बाबतीत गांभीर्याने काम करत आलो आहे तसेच काम पुढेही करत राहीन.. विशेषता माझ्या लेखनाबद्दल ॲडम्स सर म्हणाले की मी ‘ नोबेल साठी सुटेबल बॉय आहे .. हे ऐकुनच मी स्तंभीत झालो आहे… काय बोलावे हे मला सुचत नाहीये… मात्र मी अजुन इतका मोठा झालो नाहीये हे मात्र खरं आहे

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!