LIVE | अर्थसंकल्पीय अधिवेशन – राष्ट्रपतींचं अभिभाषण
Goan Varta Live | प्रतिनिधी
काय म्हणाले राष्ट्रपती?
– कृषी कायदे शेतकऱ्यांच्या फायद्याचे, दिल्लीतील हिंसाचारावर राष्ट्रपतींनी व्यक्त केली नाराजी, केंद्र सरकारनं घेतलेल्या निर्णयाचं राष्ट्रपतींनी केलं कौतुक
अर्थव्यवस्थेत तेजीने सुधारणा केल्या, ज्या अनेक काळांपासून केल्या नव्हत्या
नव्या संसदेमुळे आपलं काम बजावण्यासाठी अधिक सुविधा मिळतील.
डिजिटल इंडियाच्या ताकदीमुळे कोरोना काळातही भारत थांबला नाही, ई-स्टॅप उपलब्ध, जनधन खात्यांमुळे गरिबांना फायदा.
महिलांना विशेष सवलती. महिलांना सर्व क्षेत्रात संधी
राष्ट्रीय शिक्षा निती अंतर्गत आपल्या आवडीनुसार करिअर निवडण्याची संधी
3 कोटी 20 लाख विद्यार्थ्यांना सरकारच्या विविध शिष्यवृत्तींचा लाभ
सरकारने एमएसपीवर कृषी उत्पादन विकत घेत आहे, देशात एनेक एमएसपी केंद्रे निर्माण केले जात आहे
अनेक भागांना मायक्रो इरिगेशन मिळत आहे, शेतकरी याचा फायदा घेण्याची आशा आहे
देशात अन्न-धान्य, फळांचे उत्पादन वाढले आहे. त्यासाठी शेतकऱ्यांचे अभिनंदन
सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयाचा आमच्या सरकारकडून सन्मान
पवित्र प्रजासत्ताक दिनी गोंधळ होणे दुर्भाग्यपूर्ण. शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात आहे
कृषी कायद्यांमुळे कोणत्याही सुविधा काढून घेण्यात आल्या नाहीत. उलट नव्या सुविधा आणि अधिकार देण्यात आले आहेत
कोरोना काळात सरकारने आर्थिक पॅकेजची घोषणा केली, कोणी उपाशी राहणार नाही याची काळजी घेण्यात आली.
एन नेशन एक रेशनकार्ड योजनेमुळे अनेक गरिबांना फायदा
2200 लॅबोरेटरी तयार करण्यापासून पीपीई कीट, मास्कचे मोठ्या प्रमाणात देशात उत्पादन
आयुष्यमान भारत योजनेमुळे देशातील 1.5 कोटी लोकांना 5 लाखांपर्यंत मदत
22 एम्सना नव्याने मंजुरी