अमित शहांच्या हस्ते लाईफलाईन हॉस्पिटलचं उद्घाटन, राणेंचं जोरदार शक्तिप्रदर्शन

सविस्तर बातमीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

Goan Varta Live | प्रतिनिधी

कोकण आणि गोवा दौऱ्यावर आलेले अमित शहा उत्तराखंडमधील दुर्घटनेमुळे घाईघाईत परतीच्या मार्गावर निघाले. सिंधुदुर्गात खासदार नारायण राणेंनी साकारलेल्या मेडिकल कॉलेजचं अमित शहांच्या हस्ते उद्घाटन झालं. यावेळी त्यांनी विरोधकांना जोरदार शब्दांत सुनावलं. आणि अर्थातच यावेळी नारायण राणेंनीही शिवसेनेवर घणाघाती टीका केली.

भाजप खासदार नारायण राणेंच्या लाईफटाईम या मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचं दणक्यात उद्घाटन झालं. थेट गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते झालेल्या उद्घाटनानं राणेंचं भाजपातलं वजन आणखी वाढवलंय. शहा कोकणात येताएत म्हणजे आता थोड्याच दिवसांत त्यांना मंत्रिपदही देण्यात येईल, अशी कुजबूजही सुरु झाली आहे. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोकणातीलच नव्हे तर कोकणाच्या जवळपास असणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांना आता मेडिकलचं शिक्षण घेणं आता सोपं होणार आहे. कोकणच्या विकासाचा ध्याय घेतलेल्या राणेंनी मात्र विकासकामात अडथळा आणणाऱ्या शिवसेनेला यावेळी तिखट शब्दांत सुनावलंय.

दुसरीकडे अमित शहांच्या करण्यात आलेल्या लाईफटाईम हॉस्पिटलमुळे राणेंची राजकारणातील लाईफलाईन अधिक शक्तिशाली झाली असल्याची चर्चा रंगली आहे. राणेंवर खूश असलेल्या अमित शहांनी कोकण दौऱ्यात शिवसेनेवर हल्लाबोल केला. उद्धव ठाकरेंचे दावे खोडून काढत अमित शहांनी शिवसेनेवर तिखट शब्दांत टीका केली. इतकंच काय तर बंद दाराआड कोणतंही आश्वासन दिलं नसल्याचंही त्यांनी म्हटलंय.

राजकारण सुरु राहिल. दावे-प्रतिदावेही सुरु राहतील. पण राणेंनी साकारलेल्या या हॉस्पिटलमुळे गोव्यासह कोकणातील आरोग्य यंत्रणेला नवसंजीवनी मिळेल हे नक्की. इतकंच नाही, तर डॉक्टर होऊ पाहणाऱ्यांनाही मोलाची मदत मिळेल, यात शंका नाही.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!