Video | धेंडलो पाव शेणलो…

यंदा कोरोनामुळे धेंडलो मर्यादीत प्रमाणात झाला तरी लोकांनी परंपरेला खंड पडू दिला नाही.

श्याम सूर्या नाईक | प्रतिनिधी

पणजी : दिवाळी पाडव्याला गोव्यात धेंडल्याची प्रथा. गावातल्या प्रत्येक घरात हा धेंडला डोक्यावर घेऊन फिरतात. कोरोनामुळे यंदा धेंडल्यावर मर्यादा आल्या तरी लोकांनी उत्सवाला खंड पडू दिला नाही. पाहुया गोव्यातल्या वेगवेगळ्या भागातला धेंडला.

धेंडला. दिवाळीच्या पाडव्यादिवशी गोव्यात धेंडल्याची प्रथा. हा धेंडला सजवून डोक्यावर घेत नाचवत गावातील प्रत्येक घरात जातात. लोक धेंडल्याची पुजा करतात आणि तांदूळ, गूळ, नारळ असले जिन्नस देतात. नंतर गावातल्या देवळात मिळालेल्या सर्व जिन्नसाचं गोडस करण्याची प्रथा. यंदा कोरोनामुळे धेंडलो मर्यादीत प्रमाणात झाला तरी लोकांनी परंपरेला खंड पडू दिला नाही.

पाहा खास व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!