EXCLUSIVE | दातांनी नारळ सोलणारी मल्टिटॅलेंटेड शब्दुले

नातं गोव्याचं... देणं मराठीचं!

विश्वनाथ नेने | प्रतिनिधी

ब्युरो : म्हातारं झालं नंतर दात पडतात. शहरात राहणाऱ्या लोकांचे दात किती मजबूत असतात, हा चर्चेचा विषय ठरु शकतो. अशातच आमच्यासमोर आली एक भारी पर्सनॅलिटी. ही पर्सनॅलिटी आहे केपेमधली. केपेमध्ये राहणारी एक महिला मल्टिटॅलेंटेड आहे. ती दातांनी नारळ सोलते. कोणत्याही शाळेत शिकली नाही. पण आता आपल्या आजुबाजूच्या मुलांनी लोककला शिकवते. या मल्टिटॅलेंटेड महिलेला गोवनवार्ता लाईव्हने शोधून काढलंय. तिच्याशी खास बातचीतही केलीये.

गोव्याच्या कणकणात संस्कृती आणि कला भरलेली आहे. त्याचं जित्तजागतं उदाहरण पाहायचं असेल, तर शब्दुलेला पाहावंच लागेल, पात्रांव!

पाहा शब्दुलेचा खास व्हिडीओ –

मजबूत दातांमागचं रहस्य… टुथपेस्ट वापरलीच नाही!

आपल्या मजबूत दातांचं रहस्य सांगताना नीलावती गावकर म्हणतात, मी कधीच टुथपेस्टने दात घासले नाहीत. आदीवासी आणि ग्रामीण भागांतील लोक जी परंपरागत साधनं वापरतात, तीच वापरली. केवळ आंब्याची हिरवी पानं आणि कोळसा वापरूनच दात घासले. विशेष म्हणजे, नीलावती आजही हीच साधनं दात घासण्यासाठी वापरतात.

नावाजलेल्या लोककलाकार, घुमटवादनात हातखंडा

गोव्याची खास ओळख असलेल्या घुमटवादनात नीलावती गावकर यांचा हातखंडा आहे. लोकसंस्कृतीचा त्यांचा अभ्यास दांडगा असून फुगडी, गोफ, समईनृत्य, कळशीनृत्य यात त्या पारंगत आहेत. अनेक विद्यार्थ्यांना, संस्थांना त्यांनी या संबंधी मार्गदर्शनही केलं आहे.

हेही वाचा –

नारायण ! नारायण..! खुद्द पंतप्रधान कार्यालयाची दिशाभूल

स्पीड ब्रेकर्सची गरजच काय! बेवारस जनावरं आहेत की…

धिंगाणा! SUNBURN होणार, तारीखही ठरली! कसं करायचं बुकींग? वाचा डिटेल्स

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!