सलग दुसऱ्या दिवशी दवर्लीमध्ये संघर्ष

अजय लाड | प्रतिनिधी

दवर्ली : सलग दुसऱ्या दिवशी दवर्लीमध्ये संघर्ष पाहायला मिळाला. रेल्वे दुपदरीकरणाला विरोध होत असतानाही काम सुरु ठेवल्यानं स्थानिकांनी पुन्हा एकदा कडाडून विरोध केला. यावेळी आमदार लुइझीन फालेरो यांनी स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि त्यांना काम बंद करण्याची मागणी केली. मंत्री फिलीप रॉड्रिग्स यांनी रेल्वे दुपदरीकरणाचं काम बंद करण्यासाठी कॅबिनेट बैठकीत ठराव आणणार असल्याचं म्हटलं होतं.

तरीही काम का सुरु ठेवलंय, असा सवाल यावेळी विचारण्यात आला. त्यामुळे आता कॅबिनेट बैठकीपर्यंत हे काम बंद ठेवण्यात येणार असल्याचं कळतंय. डेप्युटू कलेक्टर ज्योती कुमारी आणि मामलेदार प्रसाद गावकर यांना यावेळी घेराव घालण्यात आला. रेल्वे अधिकारीही यावेळी उपस्थित होते. महत्त्वाचं म्हणजे सुरुवातीपासून मोठा पोलिस फौजफाटा पाहायला मिळाला. अखेरही कॅबिनेट बैठकीपर्यंत हे काम बंद ठेवण्याचे निर्देश कामगारांना देण्यात आले. त्यानंतर हा सगळा तणाव निवळला.

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!