#Crime | #Murder | वेळसाव किनाऱ्यावर पुन्हा हत्याकांड मजुराच्या हत्येनं खळबळ

श्याम सूर्या नाईक | प्रतिनिधी

वेळसांव किनाऱ्यावर मजुराच्या मृत्यूचा 24 तासांच्या आतच छडा लावण्यात वेर्णा पोलिसांना यश आलं आहे. शुक्रवारी संध्याकाळी वेळसाव किनाऱ्यावर एका मजुराची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. दिनोश कुमार भारतीय आणि शिवनाथ माझी असं अटक करण्यात आलेल्या दोघांचं नाव आहे. त्या दोघांचंही वय अनुक्रमे 46 आणि 48 वर्ष आहे. यातील दिनेश कुमार उत्तर प्रदेशचा तर शिवनाथ हा ओडिशाचा राहणारा असल्याचं समोर आलं आहे. दारु प्यायलानंतर तिन्ही मजुरांमध्ये क्षुल्लक कारणावरुन वाद झाला आणि त्यात एका तरुण मजुराची हत्या करण्यात आल्याचं एकच खळबळ उडाली होती.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!