VIDEO | अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी सर्व उद्योग व्यवसाय लवकर सुरू करणार

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती; संध्याकाळी होणाऱ्या कृतिदलाच्या बैठकीत होणार निर्णय

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः मागील दीड वर्षं हे संपूर्ण जगासाठी कठीण गेलंय. कोरोना महामारीचा फैलाव झाल्यानंतर जगातील सर्वच व्यवहार ठप्प झाले. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. अर्थव्यवस्थेला कुठेतरी ब्रेक लागला. राज्यातही अनेक छोट्यामोठ्या व्यवसायांना त्यांचं काम थांबवावं लागलं.

आता दीड वर्षानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव हळुहळू कमी होतोय. त्याचबरोबर अर्थव्यवस्थेची विस्कटलेली घडी पुन्हा नव्याने व्यवस्थित घालण्यासाठी सरकार प्रयत्न करतंय. याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाची माहिती दिलीये.

अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी कॅसिनो, हॉटेल्ससह पर्यटनाशी संबंधित सर्वच उद्योग, व्यवसाय लवकरात लवकर सुरू करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. आज संध्याकाळी होणाऱ्या कृतिदलाच्या बैठकीत याविषयावर चर्चा होणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणालेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!