26/11 मुंबई हल्ल्यांच्या स्मरणार्थ इस्रायलमध्ये उभारले जाणार विशेष स्मारक

हल्ल्यात बळी पडलेल्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी उभारणार स्मारक

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो: मुंबईवर 2008 साली 26 नोव्हेंबर रोजी झालेल्याcदहशतवादी हल्ल्याला आज 12 वर्षे पूर्ण होतायेत. इस्रायलमधील ऐलात शहरामध्ये मुंबईवर झालेल्या26/11 च्या दहशतवादी हल्ल्यांच्या स्मरणार्थ विशेष स्मारक उभारले जाणारे. मुंबईवर 2008 साली पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये यहुदीच्या चाबडा हाऊसवरही हल्ला केलेला. यामध्ये सहा यहुदी समाजातील सहा जणांचा मृत्यू झालेला. मुंबईतील ताज हॉटेलसहीत सहा ठिकाणी दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यांमध्ये 160 जणांचा मृत्यू झालेला. याच व्यक्तींच्या स्मरणार्थ ऐलातमध्ये एका चौकामध्ये विशेष स्मारक उभारलं जाणारे.

ऐलात शहरातील सितार ऑर्गनायझेशनच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार यासंदर्भात ऐलातचे महापौर मीर इत्जाक हा लेवी यांच्याशी या स्मारकासंदर्भात चर्चा झालीये. शहरामध्ये स्मारक उभारण्यासंदर्भात परवानगी देणाऱ्या समितीमध्ये मीर यांचा समावेश आहे. या शहरामध्ये भारत इस्रायलमधील मैत्रीपूर्ण संबंधांच्या थीमवर आधारित इंडिया-इस्रायल फ्रेण्डीशीप स्वेअर किंवा महात्मा गांधी स्वेअर उभारण्यासंदर्भातही विचार केला जातोय.2008 च्या मुंबई हल्ल्यांमध्ये यहुंदींचे प्रार्थनास्थळ असणाऱ्या चबाड हाऊसवर हल्ला करण्यात आलाय. लष्कर-ए-तोयबाच्या दहा दहशतवाद्यांनी मुंबईत केलेल्या या हल्ल्यामध्ये जवळजवळ 60 तास चकमक सुरु होती. या हल्ल्यात 300 हून अधिकजण जखमी झालेले.

मुंबईवरील हल्ल्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी बांधण्यात येणाऱ्या या स्मारकावर या हल्ल्यात मरण पावलेल्या सहा यहुदींची नावं असतील. सितार ऑर्गनायझेनशनने नुकताच या ठिकाणी एक कार्यक्रम आयोजित केला होता ज्यामध्ये त्यांनी मुंबई हल्ल्यातील सर्व मृतांना श्रद्धांजली अर्पण केलीये. ऐलातमधील प्रवासी यहुदींसाठी काम करणाऱ्या सितार ऑर्गनायझेनच्या अधिकाऱ्यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, आम्ही मुंबई हल्ल्यात बळी पडलेल्यांच्या स्मरणार्थ स्मारक बांधण्यासंदर्भात ऐलातच्या महापौरांशी चर्चा केली आहे. स्मारकांसंदर्भातील निर्णय घेणाऱ्या समितीमध्ये ते असल्याने त्यांची या कामात मदत होईल.” महापौरांनी भारत आणि इस्रायलमधील मैत्रीपूर्ण संबंधांच्या थीमवर आधारित इंडिया-इस्रायल फ्रेण्डीशीप स्वेअर किंवा महात्मा गांधी स्वेअर उभारण्यासंदर्भात सल्ला दिला. या ठिकाणी मुंबई हल्ल्यात बळी पडलेल्यांच्या नावाने एक ज्योत कायम तेवत ठेवता येईल,” असंही या अधिकाऱ्यांनी म्हटलंय.

26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईतील ताज हॉटेलसहीत सहा ठिकाणी दहशतवाद्यांनी हल्ला केलेला. या हल्ल्यांमध्ये 160 जणांचा मृत्यू झालाय. सर्वाधिक मृत्यू हे छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे झालेल्या हल्ल्यात झाले. तर ताजमध्ये दहशतवाद्यांनी 31जणांचे प्राण घेतले. जवळजवळ 60 तास दहशतवादी आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये चकमक सुरु होती.

हेही वाचा

पाकिस्तानच्या संघातील 6 खेळाडू करोना पॉझिटीव्ह

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!