पूंछमध्ये दहशतवाद्यांच्या ग्रेनेडमुळे लष्कराच्या वाहनाला आग, अपघातात ५ जवान शहीद

या दुर्घटनेत पाच जवान शहीद झाले असून गंभीर जखमी झालेल्या आणखी एका जवानाला तात्काळ राजौरी येथील लष्कराच्या रुग्णालयात नेण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याचे लष्कराने सांगितले.

ऋषभ | प्रतिनिधी

पुंछ : जम्मू-काश्मीरमधील पुंछमध्ये लष्कराच्या वाहनाला आग लागल्याचा मोठा खुलासा झाला आहे. राजौरी सेक्टरमधील भिंबर गली आणि पूंछ दरम्यान धावणाऱ्या लष्कराच्या वाहनावर दहशतवाद्यांनी आज गोळीबार केला, असे लष्कराच्या अधिकाऱ्याने सांगितले. या गोळीबारादरम्यान त्यांनी वाहनावर ग्रेनेडने हल्ला केला, ज्यामुळे गाडीने पेट घेतला आणि या अपघातात 5 जवान शहीद झाले. 

आतंकियों ने घात लगातार सैन्य वाहन को विस्फोट कर उड़ाया,  पुंछ में गई पांच जवानों की जान - Jammu Kashmir: Terrorists Ambushed And  Blew Up A Military Vehicle, Five ...

शहीद झालेले जवान हे राष्ट्रीय रायफल्स युनिटचे होते. 

या दुर्घटनेत पाच जवान शहीद झाले असून गंभीर जखमी झालेल्या आणखी एका जवानाला तात्काळ राजौरी येथील लष्कराच्या रुग्णालयात नेण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याचे लष्कराने सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, हे जवान दहशतवादविरोधी कारवाईसाठी तैनात असलेल्या राष्ट्रीय रायफल्स युनिटचे होते. हल्लेखोरांचा शोध सुरू असून पुढील तपास सुरू असल्याचे लष्कराने सांगितले. त्याचवेळी लष्करप्रमुखांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना याबाबत माहिती दिली आहे. 

हल्ल्याच्या वेळी मुसळधार पाऊस.

ही घटना आज दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. लष्कराचे हे वाहन राजौरी सेक्टरमधील भिंबर गली आणि पूंछ दरम्यान होते तेव्हा दहशतवाद्यांनी हल्ला केला. हल्ला झाला त्यावेळी मुसळधार पाऊस पडत होता आणि त्याचा फायदा घेत हल्लेखोर पळून जाण्यात यशस्वी झाले.मुख्य म्हणजे हल्ला झाला त्या रस्त्यावर कोणताही दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता नसल्याचा अंदाज आधी वर्तवण्यात आला होता. 

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!