काँग्रेस कर्नाटकात JD(S)सोबत आघाडी सरकार बनवणार नाही-जयराम रमेश
Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्यूरो रिपोर्ट 12 मे: कर्नाटक विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू होण्यास अवघे काही तास शिल्लक असताना, काँग्रेसचे सरचिटणीस संपर्क प्रभारी जयराम रमेश यांनी 11 मे रोजी स्पष्ट केले की, कॉंग्रेस पक्ष जेडी(एस) सोबत युतीचे सरकार स्थापन करणार नाही.
एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना रमेश म्हणाले, “मला पूर्ण खात्री आहे की जेडीएसचे विघटन होईल… यावेळी मला वाटत नाही की जेडीएससोबत युती सरकारला वाव आहे.”

कर्नाटकातील काँग्रेसचा विजय हा पंतप्रधान मोदींचा पराभव असल्याचेही ते म्हणाले, कारण त्यांच्याशिवाय कर्नाटकात भाजपातर्फे कोणीही प्रचार केला नाही. याही पुढचा दावा करताना ते म्हणाले, भाजपच्या कर्नाटकच्या पराभवानंतर 2024 मध्ये काँग्रेससाठी दिल्लीचे दरवाजे खुले होणार आहेत.
“भारत जोडो यात्रेदरम्यान, आम्ही कर्नाटकात 27 दिवस होतो आणि 7 जिल्ह्यांचा दौरा केला. आम्हाला कोणतीही शंका नाही. आम्हाला बहुमत मिळेल. आम्ही आमच्या जाहीरनाम्यात 5 हमींचे आश्वासन दिले आहे आणि या हमीमुळे काँग्रेस जिंकण्याची खात्री आहे,” रमेश म्हणाल .
दुसरीकडे, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई विधानसभा निवडणुकीत विजयी होण्याचा आत्मविश्वास दिसला. त्रिशंकू विधानसभेची कोणतीही शक्यता नाही, आम्ही आरामात सरकार स्थापन करणार आहोत. मुख्यमंत्र्यांचा चेहरा ठरवण्यासाठी आम्ही विधीमंडळ पक्षाची बैठक घेऊ,” असे ते म्हणाले.
काल 11 मे रोजी , कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि इतर भाजप नेत्यांनी माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांच्या बेंगळुरू येथील निवासस्थानी एक महत्त्वाची बैठक घेतली.
संदर्भ : ANI NEWS AGENCY