जगभरातल्या महत्वाच्या बातम्या

नक्की वाचा

Goan Varta Live | प्रतिनिधी

आंतरदेशीय विमान प्रवासाच्या तिकिट दरांबाबत सरकारचा निर्णय

देशांतर्गत विमान सेवांच्या तिकिटांचे किमान आणि कमाल दर काही महिन्यांसाठी निश्चित करण्यात आलेयेत. दरम्यान, २४ नोव्हेंबरनंतरही फेब्रुवारी महिन्यापर्यंत हे दर कायम राहणार असल्याची माहिती नागरी उड्डयन मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी दिलीय.

वादग्रस्त वक्तव्यानंतर फ्रान्सचं उत्तर

लाखो फ्रेंच लोकांना ठार करण्याचा मुस्लिमांना अधिकार आहे असं धक्कादायक ट्विट मलेशियाचे माजी पंतप्रधान डॉ. महाथिर मोहम्मद यांनी केलं होतं
मलेशियाचे माजी पंतप्रधान महाथिर मोहम्मद यांचं ट्विटर खातं त्वरित निलंबित केलं जाणं आवश्यक आहे. तसं नसल्यास ट्विटर हा हत्येच्या औपचारिक आवाहनाचा एक साथीदार ठरेल.” असं मत फ्रान्सच्या डिजिटल क्षेत्राचे राज्य सचिव कॅड्रिक ओ यांनी व्यक्त केलंय.

अमेरिकेत टपाली मतपत्रिकांची अद्यापही प्रतीक्षा

अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीला काही दिवस राहिलेले असतानाही टपालाने पाठविण्यात आलेल्या मतपत्रिका अद्याप काही राज्यांमध्ये पोहोचलेल्या नाहीत, मतदानाच्या दिवशी ज्या मतदारांची मतदान केंद्रात जाण्याची इच्छा नाही त्यांच्याकडे फार कमी वेळ असल्याचा इशारा निवडणूक अधिकाऱ्यांनी दिला आहेय.

पुर्ण होणार रशियन लशीच्या चाचण्या

करोनाचा फैलाव रोखण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या दोन स्वदेशी लशींसह भारतात दोन परदेशी लशींच्याही मानवी चाचण्या सुरुये. यात रशियाची ‘स्पुटनिक व्ही’ लसीचा समावेश आहे .ऑक्सफर्ड आणि रशियन लशीच्या चाचण्यांचे निष्कर्ष पुढच्यावर्षी येणे अपेक्षित आहे.

5) सौदीने भारताच्या नकाशातून जम्मू-काश्मीर वगळलं

सौदी अरेबियाने जारी केलेल्या एका नकाशामध्ये भारताचा अविभाज्य भाग असणारा जम्मू-काश्मीर आणि लडाखचा प्रदेश वगळलाय. सौदी अरेबियाने हा चुकीचा नकाशा जी २० देशांच्या परिषदेच्या निमित्ताने २० रियालच्या चलनी नोटेवर छापलाये. मात्र भारताने या चुकीच्या नकाशासंदर्भातील मुद्दा उपस्थित करत नाराजी व्यक्त केलीये.

बायडन यांच्या पावसाळी सभेने चर्चेला उधाण

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या प्रत्यक्ष मतदानाला चार दिवस राहिले आहेत. त्यामुळे आता प्रचार शिगेला पोहचलाय डेमोक्रॅटीक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांनी भर पावसात सभेला संबोधित केले. सध्या अमेरिकेत या सभेची जोरदार चर्चा सुरू आहे.

फ्रान्स पुन्हा हादरले

फ्रान्समधील नीस शहरात चर्चमध्ये चाकूच्या हल्ल्यात तीन जण ठार झाले आहेत. यामध्ये एका महिलेचा गळा चिरून हत्या करण्यात आली. या घटनेमुळे फ्रान्स पुन्हा एकदा हादरले आहे. या घटनेमुळे फ्रान्समध्ये पुन्हा एकदा खळबळ माजली आहे.

करोनाची दुसरी लाट; ‘

करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे फ्रान्समध्ये बाधितांची संख्या वाढत चालली आहे. काही दिवसांपूर्वीच फ्रान्समधील प्रमुख शहरांमध्ये निर्बंध लागू करण्यात आले होते. आता महिनाभराच्या लॉकडाउनची घोषणा करण्यात आली.एक नोव्हेंबरपासून लॉकडाउन सुरू होणार असल्याची घोषणा फ्रान्सचे राष्ट्रपती इम्यॅन्यूअल मॅक्रॉन यांनी केली.

पुलवामा हल्ला हे मोठे यश

मागील वर्षी जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये झालेल्या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानने अप्रत्यक्षपणे स्वीकारली आहे. पाकिस्तानचे मंत्री फवाद चौधरी यांनी हा हल्ला सरकारचे मोठे यश असल्याचे म्हटले.या वतृत्वा नंतर पाकिस्तानचे खरे रूप जगासमोर आलय

करोना मृत्यू घोषित करताना आरोग्य अधिकाऱ्याने घेतला जोकराचा वेश

करोना मृत्यूंची घोषणा करताना आरोग्य अधिकाऱ्याने जोकराचा वेश घेतला होता. याबद्दलचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. अमेरिकेतेल्या ओरेगनमध्ये ही घटना घडली आहे. क्लेअर पोचे असं या महिला आरोग्य अधिकाऱ्याचं नाव आहे. क्लेअर या ओरेगनमध्ये आरोग्य अधिकारी आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!