काणकोणात अजून एक सोनसोडा होणार का?

रिव्होल्यूशनरी गोवन्सचा सरकारला सवाल

Goan Varta Live | प्रतिनिधी

काणकोणः दुमणे, आगोंद, काणकोण येथील नगरपालिका ‘कचरा संयंत्र’ हा काणकोण येथे आणखी एक सोनसोडा बनवण्याचा विचार वाटत आहे. तिथे असलेल्या कचरा ट्रीटमेंट प्लांटवर कुणीही नजर ठेवलेली दिसत नाही. कारण हा कचरा उघडा पडला असून पावसाळ्यामुळे पाण्याचा हा साठा वाहुन नदीत जात आहे. कचऱ्याचं पाणी नदीत आणि शेतात वाहतंय, ज्यामुळे जल प्रदूषण होतंय. हे साठलेलं पाणी नंतर डासांचं आनंदी घर बनत आहे. डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढ होत आहे. त्यामुळे स्थानिकांना धोका वाढलाय, असं आरजीचे सदस्य प्रशांत पागी म्हणालेत.

हेही वाचाः वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्याबद्दल आमदाराविरुद्ध तक्रार

तर राज्याचं व्यवस्थापन कसं करणार

दुमणे आगोंद हे सुंदर गाव कचऱ्यात रुपांतरीत झालंय. निवडुन आलेल्या प्रतिनिधींच्या गैरव्यवस्थापनामुळे गावकऱ्यांवर प्रदुषणाचं संकट ओढवलंय, असं पागींनी म्हटलंय. या भागातील निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीचं अपयश यावरून सिद्ध होतंय. जर निवडलेले प्रतिनिधी कचऱ्याचं व्यवस्थापन करु शकत नाही, तर ते राज्याचं व्यवस्थापन कसं करणार, असा सवाल आरजीचे सदस्य संजम नाईक यांनी केलाय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!