चंद्रकांत शेटकर असे का वागले?

मोपा लिंक रोड भूसंपादन प्रकरणी तुळस्करवाडी महिलांची मुख्य सचिवांकडे तक्रार

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या लिंक रोडसाठीचे भूसंपादन अधिकारी चंद्रकांत शेटकर यांनी आपला पदाचा गैरवापर केलाय. वारखंड-नागझर ग्रामपंचायतीतील तुळस्करवाडी गावात जबरदस्तीने जमिनी हडप करण्याचं सत्र त्यांनी चालवलंय. पोलिसांना आणून गावातील लोकांना तसंच मुलांना मारझोड करून ते लोकांच्या जमिनी हडप करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप तुळस्करवाडीतील महिला ग्रामस्थांनी केलाय. या महिलांनी सरकारदरबारी शेटकरांच्याविरोधात लेखी तक्रार नोंदवली आहे. याविषयी माहिती देण्यासाठी त्यांनी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिलीए.

हेही वाचाः डिसेंबरपर्यंत १० हजार नोकऱ्यांपैकी १ हजार नोकर्‍या देऊन दाखवा

19 जुलै रोजी केली तक्रार

पेडणे तालुक्यात वारखंड येथे धारगळ ते मोपा विमानतळ (नवीन एनएच 1665) जवळील राष्ट्रीय महामार्ग-66 (जुने एनएच 17) सह त्याच्या जंक्शनपासून लिंक रोडच्या नावाखाली लोकांच्या जमिनी हडपण्याचं सत्र भूसंपादन अधिकारी चंद्रकांत शेटकर यांच्याद्वारे सुरू असल्याचा गंभीर आरोप तुळस्करवाडीतील महिलांनी केलाय. यासंबंधी 19 जुलै रोजी महिलांनी सरकार दरबारी लेखी तक्रार नोंदवलीये. शेटकरांनी चालवलेल्या या अत्याचाराविरुद्ध सरकारने त्वरित पावलं उचलून आम्हाला न्याय द्यावा. तसंच शेटकरांना त्यांच्या पदावरून काढून टाकत योग्य ती शिक्षा करावी अशी मागणी या भागात जोर धरतेय.

हेही वाचाः TATAची NEXON EV एकदा चार्ज केल्यावर खरंच 312 Km चालते?

जोर जबरदस्तीने हडपल्या जमिनी

सदर भूसंपादन प्रक्रिया ही ‘पुनर्वसन व पुनर्वसाहत यामध्ये पारदर्शकता राखण्याचा हक्क अधिनियम, 2013’ (तसंच भूसंपादन कायदा, 2013) अंतर्गत होत नसून ती ‘राष्ट्रीय महामार्ग कायदा 1956’ अंतर्गत होत असल्याचं तक्रारीत म्हटलंय. जमिनी बळकावण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस फौज फाटा आणून लाठी चार्ज करण्यात आला तसंच महिला आणि मुलांना मारहाण करण्यात आली. चंद्रकांत शेटकर यांनी लोकसेवक म्हणून आपल्या पदाचा गैरवापर केला आहे आणि भूसंपादन प्रक्रियेसाठी कायद्याचा गैरवापर करत लोकांच्या जमिनी बळकावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आलाय.

हेही वाचाः झोमॅटोच्या शेअरचं अलॉटमेन्ट झालं! उद्या भांडवली बाजारात होणार एन्ट्री?

प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत शेटकरांना निलंबित करा

भारतीय दंड संहितेच्या कलम 1208 आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 च्या कलम 8 अंतर्गत चंद्रकांत शेटकर यांची चौकशी करून त्यांच्यावर न्यायालयीन कारवाई करावी. तसंच या प्रकरणाची न्याय्य चौकशी पूर्ण होईपर्यंत चंद्रकांत शेटकर यांना त्यांच्या पदावरून त्वरित निलंबित करावं, अशी मागणी तुळसकरवाडीतील महिला ग्रामस्थांनी लेखी तक्रारीत केलीए.

हेही वाचाः ART AND ARTIST | नावीन्यपूर्ण कलेला प्राधान्य

शेटकर अमानवी का वागतात?

चंद्रकांत शेटकर हे सरकारी अधिकारी आहेत. ते गोंयकार आहेत. लिंक रोडसाठी भूसंपादन अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झालीए आणि त्यामुळे त्यांना आपली सेवा बजावावी लागते हे खरं आहे, परंतु सरकारने जबरदस्तीने जमिन तात्काळ ताब्यात घेण्याचे आदेश दिले म्हणून इथल्या ग्रामस्थांना अमानवी पद्धतीने वागवून ते हे काम उरकुन टाकण्याची घाई करताहेत. शेटकर हे सरकारी अधिकारी या नात्याने जनतेचे सेवक आहेत. पण त्यांची एकूणच वागणूक ही राजकीय नेत्यांचे सेवक असल्याचंच दाखवून देते. बेकायदा आणि अमानवी कृत्य आपल्याकडून होणार नाही, असं त्यांनी निक्षून सांगायला हवं होतं, अशीही येथील ग्रामस्थांची भावना बनलीए. लोकांना त्यांच्या जमिनींपासून आणि उत्पन्नाच्या स्त्रोतांपासून वंचित ठेवण्याचं तसंच त्यांच्याकडून ही जमिनी हिरावून घेण्याचे जे प्रयत्न सुरू आहेत त्याचे गंभीर परिणाम भावी आयुष्यात याला जबाबदार सगळ्यांना भोगावे लागतील, असा श्राप या लोकांनी सोडलाय.

हा व्हिडिओ पहाः Video | WOMENS ANGRY | तुळस्करवाडीतील महिलांचा घणाघाती आरोप

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!