ऑडिओ आणि विडिओ कॉलिंग आता whatsaap web वर

Goan Varta Live | प्रतिनिधी
ब्युरो: दिवसेंदिवस नवनवीन फीचर्स देऊन whatsappकंपनीने चाहत्यांचे मने जिंकली आहे .नवनवीन फीचर्सच्या माद्यमातून लोकांना खेळवून ठेवणाऱ्या whatsaap कंपनीनं आता नवीन फीचर आणला आहे . काही दिवसांपूर्वी या कंपनीनं whatsaap web हा फीचर लोकांमध्ये आणला होता जो अत्यंत गाजला आणि आता whatsaap कंपनीने whatsaap web वर ऑडिओ आणि विडिओ कॉलिंग फीचर आणला आहे .

whatsaap webवर ऑडिओ आणि विडियो कॉलिंग फीचर लौकरच येत असल्याचा दावा WAbetainfo यांनी केलाय. या फीचर्सचे अपडेट लौकरच चाहत्यामध्ये येण्याचेही त्यांनी सांगितले आहे. हा फीचर वेब वर चैट हेडरवर दिसणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. कॉल आल्यावर whatsaap web वर एक विंडो पॉप होणार ज्याच्या माध्यमातून कॉल घेऊ शकतो.कॉल चालू असताना आपल्याला चॅट करण्याची मोभा मिळते.
हा फिचर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे, हा फिचर सगळ्यांना फायदेशिर ठरेल यात शंका नाही