Viral Video : स्पोर्ट्स बाईकवर स्टंट करताना तरुणाचा गेला तोल, अन्…

सोशल मीडियावर व्हिडिओ वायरल!

Goan Varta Live | प्रतिनिधी

मुंबई : बऱ्याच तरुणांना बाईक चालवणं खूप आवडतं. त्यातल्या त्यात स्पोर्ट्स बाईकची सर्वात जास्त क्रेझ पाहायला मिळते. लाँग ड्राईव्हवर जाऊन महागड्या स्पोर्टस बाईकवर बसून स्टंट करत तरुण-तरुणी व्हिडिओ शूट करतात. असाच एक बाईक स्टंटचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. बाईक स्टंट करत असताना या तरुणाचा तोल जातो आणि अपघात होतो. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडिआवर चर्चेचा विषय ठरला आहे.

हेही वाचाः ती परत आलीये… ‘सुपर डान्सर चॅप्टर ४’मध्ये जंगी स्वागत पाहून शिल्पा झाली भावूक

अन् तरुण खाली पडतो

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक तरुण हायवेवर सुसाट वेगाने स्पोर्ट्स बाईक चालवताना दिसत आहे. यावेळी तो आपल्या बाईकचे पुढचे चाक हवेत उचलत स्टंट करत असतो. मागच्या एका चाकावर तो वेगाने बाईक चालवत असतो. स्ंटट करण्यात तो सुरुवातीला यशस्वी होतो पण अचानक त्याचा तोल जातो आणि अपघात होतो. हा तरुण बाईकच्या वेगाप्रमाणेच फरफटत रस्त्यावर खाली पडतो. 

थरार कॅमेरामध्ये कैद

या तरुणासोबत आणखी एक जण बाईक चालवत त्याच्या स्टंटचा व्हिडिओ शूट करतो. हा थरार कॅमेरामध्ये कैद झाला. बाईकवरुन तरुण खाली पडल्यानंतरही बाईक तशीच वेगाने पुढे जाताना व्हिडिओमध्ये दिसत आहे. या अपघातामध्ये तरुणाला जास्त चांगलीच दुखापत झाली असावी. हा व्हिडिओ नेमका कुठला आहे ही माहिती समोर आली नाही. पण अशाप्रकारे स्टंट करताना तरुणांनी योग्य काळजी घ्यावी अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

हेही वाचाः भारतात मिळाणार जगातील पहिली DNA आधारित कोरोना लस

बाईक स्टंटचे अनेक व्हिडिओ दररोज सोशल मीडियावर व्हायरल

दरम्यान, बाईक स्टंटमुळे अनेक तरुणांचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. पण असं असताना सुद्धा बाईक स्टंट करण्याचे प्रकार काही कमी झाले नाही. बाईक स्टंटचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल देखील झाले आहेत. हे अपघाताचे व्हिडिओ पाहून अंगावर काटे आल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे बाईक चालवताना थोडं सांभाळून आणि सावकाश चालवणं गरजेचे आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!