धक्कादायक । आळशी लोकांचा कोरोनामुळे जाऊ शकतो जीव?

ब्रिटिश जर्नल ऑफ स्पोटर्स मेडिसीन वैद्यकीय जर्नलमध्ये संशोधन प्रसिद्ध

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्ट: आळस हा माणसाचा सर्वांत मोठा शत्रू आहे, हे आपण लहान असल्यापासून ऐकत आलोय. आळस माणसाच्या प्रगतीतील सर्वात मोठा अडथळा आहे, असंही सांगितलं जातं. पण, आता ही आळशीवृत्तीच कोरोना मृत्यूच कारण ठरू शकणार आहे. या विचाराला दुजोरा देणारं रिसर्चल तज्ज्ञांनी समोर आणलंय. आळशी लोकांना कोरोनामुळे मृत्यू होण्याचा धोका जास्त असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. एका अभ्यासातून हे निष्कर्ष काढण्यात आलेत. आळशी लोकांसाठी ही धोक्याची घंटा आहे.

हेही वाचाः कोरोनाचं थैमान! राज्यात 24 तासांत 5 जणांचा बळी

व्यायाम न केल्यास अद्भवणार आरोग्य समस्या

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात मोठी कठीण परिस्थिती निर्माण झालीये. गेल्या दोन दिवसांपासून देशातील कोरोनाबाधित रुग्णसंख्या दीड लाखांहून अधिक आहे. दररोज कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाणही वाढतंय. या कठीण काळात आरोग्याबद्दल निष्काळजी राहू नये आणि स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी दररोज व्यायाम केला पाहिजे. नियमित व्यायाम केला नाही, चालणं सुरू ठेवलं नाही तर आरोग्याच्या समस्या उद्धभू शकतात असं एका संशोधनात समोर आलंय.

हेही वाचाः ‘कोरोनामुळे होणारे मृत्यू कुणीच रोखू शकत नाही, जो म्हातारा झालाय, तो तर मरणारच आहे’

शारिरीक हालचाली न करणाऱ्यांसाठी धोक्याची घंटा

व्यायाम आणि शारीरिक हालचाली कमी असणाऱ्या व्यक्तींमध्ये कोरोनाची लक्षणं तीव्र असून, अशा लोकांना कोरोनामुळे मृत्यू होण्याचा धोका जास्त आहे. कोरोनाची साथ येण्याच्या दोन वर्ष आधापासून ज्या व्यक्तींनी व्यायाम करणं सोडून दिलं. शारीरिक हालचाली (चालणं/फिरणं) कमी आहेत. त्यांना कोरोनानंतर रुग्णालयात दाखल करावं लागतं असून, त्यांना आयसीयूमध्ये भरती करावं लागतंय, असं नव्या अभ्यासात दिसून आलंय. ब्रिटिश जर्नल ऑफ स्पोटर्स मेडिसीन या वैद्यकीय जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आलंय. धुम्रपान, लठ्ठपणा वा उच्च रक्तदाब यांच्या तुलनेत शारीरिक हालचाल न करणाऱ्यांना संसर्ग होण्याचा आणि मृत्यूचा धोका अधिक असल्याचं या अभ्यासाच्या निष्कर्षात नमूद करण्यात आलंय.

हेही वाचाः FACT CHECK : पाँडिचेरी युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यानं शोधला कोरोनावर जालिम उपाय?

संशोधनात सामील झालेल्या निम्म्या रुग्णांना नव्हते आजार

संशोधनात सामील झालेल्या जवळपास निम्म्या रूग्णांना कोणतेही आजार नव्हते. सुमारे 20 टक्के तरुणांना मधुमेह, फुफ्फुसाचे आजार, हृदय किंवा मूत्रपिंडाचे आजार किंवा कर्करोग सारखा आजार होता. 30 टक्के पेक्षा जास्त लोक एकाचवेळी दोन आजारांनी ग्रस्त होते. यापैकी 15 टक्के लोकांनी स्वत:ला आळशी असल्याचे सांगितले. सुमारे 80 टक्के लोकांनी कबूल केलं की ते काही शारीरिक हालचाली (व्यायाम) करतात. पाच टक्के लोकांनी स्वत:ला तंदुरुस्त असल्याचे सांगितलं. यामध्ये आळशी असणाऱ्या लोकांना रुग्णालयात भरती होण्याची शक्यता जास्त होती.

हेही वाचाः 12च्या विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक निर्णय! कोरोनाबाधित रुग्णही परीक्षा देऊ शकणार, शिवाय…

५० हजार बाधितांचा संशोधनात अभ्यास 

या संशोधनासाठी ५० हजार बाधितांचा अभ्यास करण्यात आला. आतापर्यंत धुम्रपान, लठ्ठपणा वा उच्च रक्तदाब असलेल्यांना संसर्गाचा आणि जीविताचा धोका अधिक असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, आता यापेक्षाही शारीरिक हालचाल (शारीरिक निष्क्रियता) न करणं, यामुळे कोरोना होण्याचा आणि मृत्यू ओढवण्याचा धोका जास्त असल्याचं अभ्यासकांनी म्हटलंय. ज्या व्यक्ती व्यायाम करत नव्हत्या. जे शारीरिक हालचालीही फार करत नव्हते, अशा ४८ हजार ४४० लोकांमध्ये  लक्षणं अधिक दिसून आलीत.  काहींना रुग्णालयात दाखल करावं लागलंय. काहींना आयसीयूची भरती करावं लागलंय, काहींचा मृत्यू झालाय. जानेवारी आणि ऑक्टोबर २०२० मध्ये अमेरिकेत हा अभ्यास करण्यात आला.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!