जम्मूत आणखी तीन अतिरेक्यांचा चकमकीत खात्मा

जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरक्षा दलांबरोबर चकमक

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : जम्मू आणि काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील टिकन भागामध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी मारले गेल्याचे भारतीय लष्कराने म्हटले आहे.

या भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यावरून आज सकाळी या भागात लष्करातर्फे शोधमोहीम सुरु करण्यात आली. त्यावेळी लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरु केला. यावेळी प्रत्युत्तरादाखल जवानांनी केलेल्या गोळीबारात ३ दहशतवादी मारले गेले.

या तिघांची ओळख पटली नसून अद्यापही शोधमोहीम सुरु असल्याचे जम्मू काश्मीर पोलिसांनी म्हटले आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!