आमदार सोपटेंनी नव्हे, विजय सरदेसाईंनी गोवा विकायला काढला होता

मांद्रे भाजप मंडळाचा दावा

निवृत्ती शिरोडकर | प्रतिनिधी

पेडणेः गोवा फॉरवर्डचे आमदार मंत्री असताना त्यांनी संपूर्ण गोवा आणि जमिनी विकायला काढल्या होत्या, ज्यावेळी भाजप सरकारात ते मंत्री होते, तेव्हा ते भाजपचं गुणगान गायचे. आता मंत्रिपद गेल्यामुळे ते वैफल्ग्रस्त झाले आहेत. आमदार दयानंद सोपटेंनी नव्हे, तर विजय सरदेसाईंनी गोवा विकायला काढला होता, असा दावा मांद्रे भाजप मंडळ अध्यक्ष मधु परब यांनी केला. मांद्रे येथे भाजप कार्यालयात ४ रोजी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

हेही वाचाः BREAKING | राज्यातील प्रवासी टॅक्सी दरांत वाढ

सरदेसाईंनी मंत्री असताना सरकारचा पुरेपूर फायदा घेतला

यावेळी किसान मोर्चा अध्यक्ष दत्ताराम ठाकूर, सदस्य मच्छिंद्र पेडणेकर, गोविंद आजगावकर, सुनील आसोलकर, महेश मांद्रेकर, रवींद्र गोवेकर आदी उपस्थित केले. भाजप मंडळ अध्यक्ष मधु परब यांनी बोलताना म्हणाले, विजय सरदेसाईंचे अनेक कारनामे विरोधी पक्षाच्या नेत्यांनी वारंवार काढले होते. मंत्री असताना त्यांनी सरकारचा पुरेपूर फायदा घेतला. जमिनीची प्रकरणेही लोकांना माहीत आहेत. आणि आता त्यांच्याकडील सत्ता गेल्यानंतर काही लोकांना घेऊन ते मांद्रे मतदारसंघात येतात आणि आमदार दयानंद सोपटे यांच्यावर टीका करतात. गोंयकारांना विजय सरदेसाईंविषयी सर्व काही माहीत आहे. त्यांनी मांद्रेत येऊन हवेत गोळी बार करू नये, असा सल्ला परबांनी दिला.

हेही वाचाः कणकवलीनजीक 4,57,000 ची गोवा दारू पकडली ; एकास अटक

सरदेसाईंनी मांद्रेत येऊन जनतेची दिशाभूल करू नये

मांद्रेतील जनता सुजाण आहे. आमदार विजय सरदेसाईंनी या भागात येऊन जनतेची दिशाभूल करू नये. मांद्रेत जो मनोरंजन प्रकल्प होत आहे, त्याविषयी आमदार दयानंद सोपटेंनी स्थानिकांना विश्वासात घेऊन प्रकल्पाचा आराखडा मांडलेला आहे. या प्रकल्पातून स्थानिकांना रोजगाराची संधी मिळेल. या प्रकल्पात फिल्म सिटी होणार, तारांकित हॉटेल, सभागृह होणार आहे, असं रवींद्र पेडणेकरांनी बोलताना सांगितलं.

हेही वाचाः केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ‘या’ वाहनांसाठी रजिस्ट्रेशन आणि RC शुल्क माफ

आमदार सोपटेंना जनतेचं हित माहीत आहे

राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि स्थानिक आमदार दयानंद सोपटेंना जनतेची जाण आणि हीत माहीत आहे. जे काही प्रकल्प ते आणतात, ते प्रकल्प जनहितासाठी असणार आहेत. अशा प्रकल्पाचं आम्ही स्वागत करतो. या प्रकल्पात एक कला दालन असणार आणि कलाकारांना त्याचा लाभ मिळणार आहे. शिवाय फिल्म सिटीतून स्थानिक कलाकारांना अभिनयाची संधी मिळेल, असा दावा भाजप किसान मोर्चा अध्यक्ष दत्ताराम ठाकून यांनी बोलताना केला.

हेही वाचाः Tokyo Olympics 2021: भारताच्या खिशात आणखी एक पदक

टाऊन प्लानिंग कमिशन?

विजय सरदेसाई मंत्री असताना टाऊन प्लानिंगचं त्यांनी टाऊन कमिशन केलं, असा दावा मच्छिंद्र पेडणेकरांनी केला. बाहेरून ज्या मासे वाहतूक गाड्या यायच्या, त्या प्रत्येक वाहनाकडून ते पाच हजार रुपये कमिशन म्हणून वसूल करायचे, असा आरोप पेडणेकरांनी केला. या प्रकरणाचे व्हिडिओ वायरल झालेत, बातम्या प्रसिद्ध झाल्यात, असं पेडणेकर म्हणाले.

हेही वाचाः जम्मू काश्मीरच्या विकासाची पहाट

माजी मुख्यमंत्री लक्ष्मिकांत पार्सेकर यांची विजय सरदेसाईंनी भेट घेणं कितपत योग्य? असा प्रश्न उपस्थित केला असता भाजप मंडळ अध्यक्ष मधु परब म्हणाले, ते एकेकाळी राज्याचे मुख्यमंत्री होते. जर विजय सरदेसाईंनी त्यांची भेट का घेतली याचं उत्तर देणं ही माझी पात्रता नाही, असं परब म्हणालेत. पक्षाचा आदेश मान्य करून आम्ही काम करत आहोत.

हा व्हिडिओ पहाः Video | Goa Bhumiputra Adhikarini Bill | भूमिपुत्र अधिकारीणी विधेयक चांगलं की वाईट?

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!