शेळ मेळावलीवासियांचा आता मुख्यमंत्र्यांना इशारा
शेळ मेळावलीतील आयआयटी विरोध आंदोलन शमण्याची चिन्हं दिसत नाहीत.

विश्वनाथ नेने | प्रतिनिधी
पणजी : जीव गेला तरी बेहत्तर, पण शेळ मेळावलीत आयआयटी करु न देण्याबाबत शेळ मेळावलीवासीय ठाम आहेत. मुख्यमंत्र्यांच्या विधानावर ग्रामस्थ पुन्हा आक्रमक झालेत. गुरुवारी ग्रामस्थांनी उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेला.
मोर्चावेळी ग्रामस्थांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत व आरोग्यमंत्री विश्वजीत राणेंचा निषेध केला. पुढच्यावेळी मुख्यमंत्र्यांच्या घरावर मोर्चा नेणार असल्याचा इशारा यावेळी ग्रामस्थांनी दिलाय.
लोकांच्या मताचा आदर करा- प्रतापसिंह राणे
सरकारने लोकांच्या भावनांचा आदर केला पाहिजे. आयआयटी शेळ मेळावलीतून इतरत्र शिफ्ट करा अशी मागणी काँग्रेसचे जेष्ठ आमदार प्रतापसिंह राणेंनी केलीय. बुधवारी पणजीत पक्षाच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिशेदत राणेंनी ही मागणी केली.