…म्हणून नवरीनं पीपीई किट घालून केले लग्नविधी!

कोरोना काळातील हा विवाहसोहळा ठरतोय चर्चेचा विषय

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

ब्युरो : कोरोना काळात अनेक लग्न लांबणीवर गेली. पण आता पुन्हा एकदा लग्नाचा सीझन सुरु झाला आहे. अशात अनेक लांबणीवर गेलेली लग्न लागू लागली आहेत. अटी आणि नियमांचं पालन करत लग्न आटोपणं, हे सगळ्यांसाठी आव्हानात्मक आहे. अशातच एका नवरीमुलीनं तर चक्क पीपीई किट घालूनच लग्न केलंय. असं करण्याची तिच्यावर का वेळ आली?

मुलींसाठी लग्न म्हटलं की नटापटा आणि आवडीचे कपडे घालून मिरवणं, हे ओघाओघानं आलंच. पण राजस्थानात एक मुलीला हे काही मिरवणं शक्य झालं नाही. त्याला कारण ठरलंय कोरोना. चक्क नवरीमुलगीच कोरोना पॉझिटिव्ह आल्यानं लग्न होणार की नाही, याबाबत कुटुंबीय साशंक होते. पण लग्न झालं ते ही पीपीई किट घालून.

म्हणून पीपीई किट घालून लग्न?

राजस्थानच्या अलवारमध्ये हा लग्नसोहळा पार पडला. या लग्नसोहळ्यात कोरोना पॉझिटिव्ह नवरी मुलीसोबत तिच्या नातलगांनीही पीपीई किट घातले होते. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मास्कही घातले होतेच. सगळ्यांनी जर अशा पद्धतीनं काळजी घेत लग्न समारंभ केले तर संसर्ग टळेल, असा विश्वास डॉक्टरांनीही व्यक्त केलाय. पण सध्यापुरता तरी पीपीई किट घालू झालेला हा लग्नसोहळा चर्चेचा विषय ठरतोय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!