गोव्याच्या स्नेहलची मोठी कामगिरी, नजर पात्रतेकडे…
गोव्याची आंतराष्ट्रीय आर्चर स्नेहल दिवाकर टोकीयो ऑलंपीकच्या सिलेक्शन ट्रायलसाठी पात्र ठरलीये.

विश्वनाथ नेने | प्रतिनिधी
पणजी : गोव्याची आंतराष्ट्रीय आर्चर स्नेहल दिवाकर टोकीयो ऑलंपीकच्या सिलेक्शन ट्रायलसाठी पात्र ठरलीये. 2021च्या ऑगस्ट महिन्यात टोकीयो ऑलंपीक होणार आहे. या कामगिरीबद्दल एस.ए.जीचे कार्यकारी संचालक व्हि.एम. प्रभुदेसाईंनी स्नेहलचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
स्नेहल दिवाकर ही फोंड्याची राहाणारी आहे. तिचा जन्म गोव्यातच झाला. मागील काही वर्षांपासून ती सातत्याने सराव करते. मला मिळालेल्या या संधीचं सोनं करणार असल्याचं स्नेहलनं सांगितलं.
एसएजीचे कार्यकारी संचालक व्हि.एम प्रभुदेसाईंनी स्नेहलचं कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी स्नेहलचे प्रशिक्षक, गोवा आर्चरी असोसिएशनचे सचीव चेतन कवळेकर आणि स्नेहलचे वडील सुशील दिवाकर उपस्थित होते.
गोव्याची आंतराष्ट्रीय आर्चर स्नेहल दिवाकर
स्नेहल ऑलंपिक सिलेक्शन ट्रायलसाठी ठरली पात्र
2021मध्ये टोकियो ऑलंपिकचं आयोजन
एस.ए.जी कार्यकारी संचालकांच्या स्नेहलला शुभेच्छा
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.