आकडेवारी सांगते की रुग्णवाढ घटतेय! बरे होण्याचं प्रमाण वाढतंय

रुग्णवाढ कमी होत असली तर मृत्यूदराची चिंता

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

नवी दिल्ली : गेल्या दोन आठवड्यांपासून करोनाची रोजची रुग्णवाढ कमी झाल्याचं आकडेवारीतून स्पष्ट झालंय. मंगळवारी देशात (COVID-19 in India) करोनाचे 61 हजार 267 नवे रुग्ण आढळून आले. विशेष म्हणजे गेल्या 15 दिवसांपासून दररोज देशभरात रुग्णसंख्या 90 हजारांच्या टप्प्यात वाढत होती. काही दिवस तर ही रुग्णवाढ एक लाखाच्या जवळही पोहोचली आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून रुग्णवाढीमध्ये घट झाली असल्याचं दिसून आलं आहे.

देशात एकूण 9 लाख 19 हजार रुग्णांवर उपचार सुरु असून लएकूण रुग्णांच्या तुलनेत हा आकडा 13.75 टक्के इतका आहे. देशातील करोनामुक्ती होण्याचा वेगही वाढला आहेय. देशाचा रिकवरी रेट 84.70 टक्क्यांवर पोहोचलाय. तर एकूण 25 राज्यांमध्ये करोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या लागण होणाऱ्या रुग्णांपेक्षा जास्त असल्याचं समोर आलंय.

राज्यात किती रुग्णवाढ?

पणजी : राज्यामध्ये 519 नव्या रुग्णांची भर मंगळवारी पडली. तर मृतांचा आकडा 468वर पोहोचलाय. राज्याचा रिकवरी रेटही वाढतोय. सोमवारी रिकवरी रेट 85.25 इतका होता, तर मंगळवारी त्यात वाढ झाली आहे. आता राज्याचा रिकवरी रेट 85.56 टक्के इतका झालाय. त्यामुळे आरोग्य प्रशासनालाही दिलासा मिळालाय. महत्त्वाचं म्हणजे मंगळवारी आढळून आलेल्या नव्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. मंगळवारी 594 रुग्ण करोनामुक्त झालेत. सध्या राज्यात 4 हजार 720 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात आतापर्यंत 36 हजार 238 जणांना संसर्ग झाला असून आतापर्यंत 31 हजार 50 जण करोनामुक्त झालेत.

8 महिन्यांच्या मुलीसह 8 जणांचा मृत्यू

मंगळवारी करोनामुळे 8 महिन्यांच्या चिमुकीलाचा करोनामुळे मृत्यू झालाय. तर राज्यात एकूण 8 रुग्ण गेल्या 24 तासात दगावलेत. शिरवई-केपेतील 8 महिन्यांची मुलगी करोनानं दगावल्यानं एकच खळबळ उडालीये. सांतइसेव्ह, मोरजी, कुर्टी-फोंडा, मुरगाव, वास्को, खोर्जुवे आणि नागवामध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झालाय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!