गोव्यातून सिंधुदुर्गात प्रवेश करणाऱ्यांची कोरोना टेस्ट बंधनकारक

यापुढे डंपर, मालवाहक गाड्या, दुचाकीस्वार तसंच प्रत्येक गाडीचा अहवाल गरजेचा

Goan Varta Live | प्रतिनिधी

बांदा : कोरोनाची वाढती रुग्ण संख्या पाहता गोव्यातून सिंधुदुर्ग मध्ये प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाची कोरोना चाचणी करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी दिले. शनिवारी सकाळी गोवा राज्य सीमेवरील बांदा तपासणी नाका येथे खुद्द पोलीस अधीक्षक दाभाडे यांनी सूचना दिल्या. 48 तासाच्या आतील आरटीपीसीआर अहवाल असेल त्यालाच प्रवेश देण्यात यावा आणि ज्याच्या कडे अहवाल नसेल त्याची रॅपिड टेस्ट करावी, अशा कडक सूचना येथील अधिकारी यांना देण्यात आल्या. तसेच याबाबत बांदा, वेंगुर्ला, कुडाळ व सावंतवाडीचे प्रभारी अधिकारी यांना बांदा पोलिसांच्या इन्सुली तपासणी नाका येथे बोलावून सूचनाची कडक अमलबजवणी करण्याच्या सूचना दिल्या. गोव्यातून येणाऱ्या प्रत्येकाची टेस्ट आवश्यक असल्याच्या सूचना दिल्या नंतर गोवा राज्यातून येणाऱ्या वाहनाच्या रांगा टोल नाका येथे लागल्या आहेत.तर रॅपिड टेस्ट करण्यासाठी एकच वैद्यकीय अधिकारी असल्याने तेथेही मोठी गर्दी झाली आहे. यापुढे डंपर,मालवाहक गाड्या, दुचाकीस्वार आणि प्रत्येक गाडीचा अहवाल गरजेचा करण्यात आला आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!