BREAKING | IITप्रश्नी मुख्यमंत्र्यांची चर्चेची तयारी

विश्वनाथ नेने | प्रतिनिधी
पणजी : शेळ-मेळावली येथील आयआयटी प्रकल्पाला होणारा विरोध पाहता मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Dr. Pramod Sawant) यांनी आंदोलकांशी चर्चेची तयारी दर्शवली आहे. आयआयटीच्या विषयावर मी कुठेही येऊन चर्चा करण्यासाठी तयार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मात्र पाचशे लोकांसोबत चर्चा होऊ शकत नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. आयआयटी प्रकल्पाविरोधी होणाऱ्या आंदोलकांशी चर्चा करण्याचं मान्य करताना त्यांनी 4 ग्रामस्थांची समिती स्थापन करण्याची भूमिका घेतली आहे. या चार जणांच्या समितीसोबत चर्चा करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला आंदोलक कसा प्रतिसाद देतात, त्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, 28 सप्टेंबर रोजी शेळ-मेळावली येथील आयआयटी प्रकल्पासाठी सीमांकन करण्यासाठी गेलेल्या अधिकार्यांना मंगळवारी आंदोलकांनी विरोध केला होता. सुमारे सहा तास काम थांबवून ठेवण्यात आलं होतं. अखेर अधिकारी माघारी परतल्यावर हे आंदोलन मागे घेण्यात आलं. मागण्या मान्य होईपर्यंत सीमांकनाचं काम करु न देण्याची आक्रमक भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. याच वेळी मुख्यमंत्र्यांनी आंदोलकांशी चर्चाही केली. मात्र ती अयशस्वी ठरली.
अटक सत्रानंतरही आंदोलन सुरुच
खरंतर बुधवारी (30 सप्टेंबर) झालेल्या अटकसत्रानंतर सलग दुसऱ्या दिवशीही आयआयटी प्रकल्पाचा विरोध कायम होता. आयआयटी विरुद्ध आंदोलन सुरुच असून मागण्या मान्य होईपर्यंत हे आंदोलन सुरुच राहिल, असा निर्धार आंदोलकांनी गोवनवार्ता लाईवशी बोलताना व्यक्त केला. दरम्यान, आता मुख्यमंत्र्यांनी दाखवलेल्या चर्चेच्या तयारीला आंदोलक कसा प्रतिसाद देतात, हे पाहणं महत्त्वाचं आहे.
खाणींच्या प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांनी दिल्लीत पंतप्रधानांची भेट घेतली. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली? पाहा व्हिडीओ
Taking cue of our Hon’ble Prime Minister’s mission of “Atmanirbhar Bharat”, launched the #AatmanibharBharatSwayampurnaGoa programme – A Village Level Action Plan to make Goa self-sufficient. @narendramodi @PMOIndia https://t.co/AsoQaQ9L1S
— Dr. Pramod Sawant (@DrPramodPSawant) October 1, 2020