भाजप जेडीयूचं जागावाटप ठरलं, जागावाटपात भाजपला झुकतं माप

बिहार विधानसभा निवडणूक - जागावाटपात भाजपला झुकतं माप

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि जेडीयूचं अखेर जागावाटप जाहीर झालंय. या जागावाटपामध्ये भाजपला झुकतं मात मिळाल्याचं दिसतंय. भाजपला 121 जागा देण्यात आल्या असून जेडीयू 122 जागा लढवणार आहे. सत्ताधारी जेडीयूने भाजपला जागावाटपात झुकतं माप दिल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातंय.

बिहार विधानसभा निवढणुकांचा कार्य़क्रम याआधीच जाहीर झालाय. दरम्यान, भाजप आणि जेडीयूने केलेल्या युतीचं जागावाटपही पूर्ण झालंय. त्यामुळे आता प्रचाराच्या रणधुमाळीला वेग येणार, यात शंका नाही. जेडीयू 122 जागा जरी लढवणार असली तरी त्यातल्या 7 जागा या हिंदुस्थानी अवाम मोर्चाला दिल्या जाणार आहे.

जागावाटपाची माहिती देण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पत्रकार परिषद घेतली. पाटण्यात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आगामी निवडणुकीत भाजप-जेडीयू युतीचाच विजय होईल, असा विश्वासही व्यक्त केला.

बिहार विधानसभेत एकूण जागा आहेत 243. त्यातील भाजपला देण्यात आलेल्या 9 जागा विकासशील इन्सान पार्टीला देण्यात येणार आहे. महत्त्वाचं म्हणजे काँग्रेस या निवडणुकीमध्ये 70 जागा लढवणार आहे. तर काँग्रेसचे मित्रपक्ष तीस जागा लढवणार आहेत. महागठबंधनमधील जागावाटप याआधीच झालंय. यात आरजेडी 144, काँग्रेस 70 आणि इतर मित्रपक्ष 29 जागी निवडणूक लढवणार आहेत. आरजेडी आपल्या कोट्यातून व्हीआयपी पक्षाला काही देणार असल्याचंही कळतंय.

बिहार निवडणुकीचं बिगुल वाजलं असून निवडणूक 3 टप्प्यात होणार आहे.

कसं आहे बिहार निवडणुकीचं वेळापत्रक?

  • पहिल्या टप्प्यात 16 जिल्ह्यांतील 71 मतदारसंघांत मतदान
  • दुसर्‍या टप्प्यात 17 जिल्ह्यांतील 94 मतदारसंघांत मतदान
  • तिसर्‍या टप्प्यात 15 जिल्ह्यांतील 78 मतदारसंघांत
  • 10 नोव्हेंबरला निवडणुकीचा अंतिम निकाल
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!