गांजामुळे अडचणीत! कॉमेडियन भारतीला अटक

एनसीबीच्या रेडमध्ये भारतीच्या घरात सापडला गांजा

Goan Varta Live | प्रतिनिधी

मुंबई : सुशांत सिंह आत्महत्याप्रकरणानंतर सेलिब्रिटींच्या ड्रग्ज कनेक्शनवर पोलिसांचं बारीक लक्ष आहे. एन्टी नारकोटीक्स ब्युरोनंही याबाबत कंबर कसली आहे. याचप्रकरणी एक मोठी अटक करण्यात आली आहे. कॉमेडियन भारतीला याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. शनिवारी सकाळी ही रेड करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी भारतीच्या घरात गांजा सापडल्यानं तिला अटक केली आहे. यावेळी भारतीच्या घरालाही ताब्यात घेण्यात आलं आहे.

भारतीच्या ऑफिस आणि घरावर छापा मारण्यात आला. यात ८६.५ ग्रॅम गांजा सापडल्यानं भारतीच्या अडचणीत वाढ झाली आहे. हा गांजा जप्त करण्यात आलाय. ड्रग पेडलरने दिलेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे.

गांजा मारुन करायची विनोद?

भारती ही एक प्रसिद्ध विनोदी अभिनेत्री आहे. अनेक विनोदी कार्यक्रमांमध्ये तिने आपली छाप पाडली होती. ग्रेट इंडियन कॉमेडी शोमधून तिने आपल्या करियर सुरुवात केली. त्यानंतर कॉमेडी सर्कस, स्टँन्डअप कॉमेडीचे अनेक शो ती करत असे. तिचं ड्रग्ज प्रकरणात नाव पुढं आल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातंय. अनेक चित्रपट आणि मालिकांमध्येही तिनं काम केलं होतं.

गुन्हा मान्य?

भारती आणि तिचा पती या दोघांनीही गांजा बाळगल्याचं मान्य केलं आहे. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी आता पुढे काय कारवाई होते आणि आणखी कुणाची नावं समोर येतात हे पाहणं महत्त्वाचंय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!