राज्यात एकूण ३९ अपघात प्रवण क्षेत्रे…

गुंडेच्या कुटुंबाच्या कारलाही याच क्षेत्रात अपघात

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : राज्यात एकूण ३९ अपघात प्रवण क्षेत्रे आहेत. मंगळवारी पुणे येथील गुंडेच्या कुटुंबाच्या कारचा तोरसेतील ज्या राष्ट्रीय महामार्गावर अपघात झाला, तो महामार्गही अपघात प्रवण क्षेत्रामध्येच येत असल्याचे विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनातील लेखी प्रश्नाच्या उत्तरातून समोर आले आहे.
हेही वाचाःCrime | अधिकाऱ्याच्या डोक्याला बंदूक लावून घेतला रस्ता बांधून…

अपघात रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या

राज्यात एकूण ३९ अपघात प्रवण क्षेत्र असून, त्यात १४ ‘ब्लॅक स्पॉट’चाही समावेश आहे. यातील सर्वाधिक ११ क्षेत्रे फोंडा वाहतूक पोलीस विभागाच्या हद्दीत येत असल्याची माहिती वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी लेखी उत्तरातून दिली होती. राज्यातील वेगवेगळ्या परिसरातील एकाच ठिकाणी होत असलेले अपघात आणि त्यात होणाऱ्या मृत्यूंची दखल घेऊन त्या भागांना अपघात प्रवण क्षेत्र म्हणून जाहीर केले जाते आणि तेथे अपघात रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या जातात. राज्य सरकारने संपूर्ण राज्यभरातील अशी ३९ क्षेत्रे निश्चित केलेली आहेत.
हेही वाचाःAccident | ट्रॅक्टर तलावात उलटून झालेल्या अपघातात आठ महिलांसह दोन मुलांचा मृत्यू …

कंत्राटदार कंपनीचा मनमानी कारभार

त्यात राष्ट्रीय महामार्गावरील तोरसे येथील क्षेत्रही आहे. परंतु, महामार्ग रुंदीकरणाचे काम आणि कंत्राटदार कंपनीचा मनमानी कारभार यामुळे या परिसरातील अपघातांवर नियंत्रण आणण्यात सरकारला अद्याप यश आलेले नाही, अशा प्रतिक्रिया स्थानिकांकडूनच व्यक्त करण्यात येत आहेत.
दरम्यान, मडगाव वाहतूक पोलीस विभागाच्या परिसरात सात, कळंगुट वाहतूक पोलीस विभागाच्या परिसरात सहा, डिचोली आणि कोलवा वाहतूक पोलीस विभागाच्या परिसरात प्रत्येकी तीन, तर पणजी, वास्को, पेडणे आणि म्हापसा वाहतूक पोलीस विभागाच्या परिसरात प्रत्येकी दोन अशी मिळून राज्यात एकूण ३९ अपघात प्रवण क्षेत्र असल्याचे स्पष्ट झाले आहे.
हेही वाचाःIND vs SA : गोलंदाजांमुळे भारताची विजयी सलामी; दक्षिण आफ्रिकेचा आठ गडी राखून पराभव…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!