5 मिनिटांत 25 बातम्या

महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी

आमदार पात्र ठरणार की अपात्र?

काँग्रेसच्या दहा अणि मगोपच्या दोन फुटीर आमदारांविरोधात अपात्रता याचिकेवर सुनावणी संपुष्टात, सभापती राजेश पाटणेकर यांच्यासमोर युक्तिवाद, सभापतींच्या निवाड्याकडे राज्याचं लक्ष.

खासगी जमिनी प्रायव्हेट फॉरेस्ट कशा?

मालकी हक्क असलेल्या खासगी जमिनी प्रायव्हेट फॉरेस्ट असल्याचा फतवा, संतप्त सांगेवासीयांचं वन खात्याच्या अधिकार्‍यांना निवेदन, प्रायव्हेट फॉरेस्टमधून जमिनी वगळण्याची मागणी.

मोले चेकपोस्टवर अवैध दारू जप्त

मोले चेकपोस्टवर अबकारी अधिकार्‍यांची धडक कारवाई, 8 लाख 29 हजार 680 रुपयांच्या अवैध दारूसह कंटेनर जप्त.

व्यापारी संघटनांचा बंद गोव्यात फसला

‘भारत बंद’चा गोव्यात फज्जा, जीएसटीत सुसूत्रतेच्या मागणीसाठी 40 हजार व्यापारी संघटनांनी पुकारला होता बंद, मालवाहतूक सुरळीत राहिल्यानं चक्का जामचाही फज्जा.

रापोणकारांचो एकवोट, एनएफएफची सभा

रापोणकारांचो एकवोट, एनएफएफच्या दोन दिवसीय सर्वसाधारण सभेला सुरुवात, माथानी साल्ढाणांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून सभेला सुरुवात.

देऊळवाडा-कोरगावात मगोप कार्यालयाचं उद्घाटन

देऊळवाडा-कोरगावात मगोप कार्यालयाचं उद्घाटन, आमदार सुदिन ढवळीकरांच्या हस्ते कार्यालयाचा शुभारंभ, विविध विषयांवरून ढवळीकरांची सरकारवर टीका.

मडगाव भाजप गटाचे उमेदवार जाहीर

नगरपालिका निवडणुकीसाठी मडगाव भाजप गटाचे उमेदवार जाहीर, ‘व्हायब्रंट गोवा’ बॅनरखाली उमेदवारांची घोषणा, मडगाव भाजपचे निवेदन राजेंद्र तालक यांनी जाहीर केली उमेदवारांची नावं.

नगरपालिका निवडणुकीसाठी बॅलेट पेपरद्वारे मतदान

नगरपालिका निवडणुकीसाठी बॅलेट पेपरद्वारे मतदान, महापालिका मतदानासाठी वापरणार ईव्हीएम, निवडणुकीसाठी खर्च मर्यादा निश्चित, पालिकेसाठी 2 लाख रुपये, तर महापालिकेसाठी 2.50 लाख रुपये खर्च मर्यादा

रिवे-सत्तरीत झाडांची बेकायदा कत्तल

रिवे-सत्तरीत झाडांची बेकायदा कत्तल, संबंधितांवर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी, अन्यथा न्यायालयात दाद मागण्याचा जमीन मालकाचा इशारा.

काणकोणात पुन्हा कोरोनाने काढले डोके वर

काणकोणात पुन्हा कोरोनाने डोकं वर काढल्यानं चिंता, शुक्रवारी आढळले 11 नवे रूग्ण, आगोंद आणि कर्वे गावडोंगरीत सापडले कोरोनाबाधित.

विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर

चार राज्यांसह एका केंद्रशासित प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर, पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यात, तर आसाममध्ये तीन टप्प्यात मतदान, 27 मार्चला मतदान प्रक्रियेला सुरुवात, तामिळनाडू, केरळ आणि पुदुचेरीमध्ये एकाच टप्प्यात मतदान.

ममता बॅनर्जींची निवडणूक आयोगावर टीका

मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांच्यावर बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची टीका, मोदी-शहांच्या सल्ल्यावरून निवडणुकीच्या तारखा ठरवल्याचा गंभीर आरोप.

हिमा दासची उपअधीक्षकपदी नेमणूक

धावपटू हिमा दासची आसाम सरकारकडून उपअधीक्षकपदी नेमणूक, मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या उपस्थितीत हिमा दासचा सन्मान.

डीजीसीएकडून विमान प्रवाशांना दिलासा

विनासाहित्य विमान प्रवास करणार्‍या प्रवाशांना नागरी उड्डाण महासंचालनालयाकडून दिलासा, तिकिटाच्या किमतीत मिळणार सवलत.

युसूफ पठाणनं जाहीर केली निवृत्ती

धडाकेबाज फलंदाज युसूफ पठाणनं जाहीर केली निवृत्ती, सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून घेतली निवृत्ती.

रिलायन्स जिओकडून धमाकेदार ऑफर

रिलायन्स जिओकडून धमाकेदार ऑफर जाहीर, दोन हजारांत फोनसह दोन वर्षांसाठी मिळणार अनलिमिटेड कॉलिंग, दररोज दोन जीबी हायस्पिड डेटा मोफत.

शिवसेनेची नरेंद्र मोदींवर बोचरी टीका

गरज सरो; पटेल मरो अशा शब्दांत शिवसेनेची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बोचरी टीका, मोटेरा स्टेडियमला मोदींचं नाव दिल्यानं टीकेची झोड.

अंबानींच्या घराजवळील स्फोटकांचं नागपूर कनेक्शन

मुकेश भैय्या-नीता भाभी हा तर एक ट्रेलर, अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या कारमधून मिळालं पत्र, मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकांचं नागपूर कनेक्शन.

हिवाळ्यात इंधनाच्या किमती वाढतात : प्रधान

हिवाळ्यातील इंधनाच्या अतिरिक्त मागणीमुळे वाढतात किमती, पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा अजब दावा, लवकरच किमती नियंत्रणात येणार असल्याचा दावा.

बालाकोट एअर स्ट्राईकला दोन वर्षे पूर्ण

पाकिस्तानमधील बालाकोटमध्ये भारतीय सैन्यानं केलेल्या एअर स्ट्राईकला दोन वर्षे पूर्ण, पठाणकोट दहशतवादी हल्ल्याचा घेतला होता बदला.

महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक थांबेना

महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक थांबेना, प्रशासनाची डोकेदुखी वाढली, एकाच दिवसात आठ हजारांहून अधिक नव्या रूग्णांची नोंद, तर 48 जणांचा कोरोनामुळे मृत्यू.

‘शीख फॉर जस्टिस’चं आक्षेपार्ह पत्र

महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालनं भारतापासून वेगळं होउन स्वतंत्र होत असल्याचं जाहीर करावं, खलिस्तानवादी ‘शीख फॉर जस्टिस’ संघटनेनं लिहिलं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ममता बॅनर्जींना पत्र.

अमेरिकेचा सीरियामध्ये जोरदार हवाई हल्ला

अमेरिकेचा सीरियामध्ये जोरदार हवाई हल्ला, इराणचा पाठिंबा असलेल्या मिलिशियाच्या ठिकाणांवर केला एअर स्ट्राईक, इराकमधील अमेरिकन दूतावासावर रॉकेट हल्ल्याचा घेतला बदला.

‘सोहराई पोटरू’ सिनेमा ऑस्करच्या शर्यतीत

सुप्रसिद्ध साउथ स्टार सूर्या शिवकुमारचा ‘सोहराई पोटरू’ सिनेमा ऑस्करच्या यादीत सामील, सुधा कोंगारा दिग्दर्शित चित्रपटाला सर्वोत्कृष्ट अभिनेता, अभिनेत्रीसह दिग्दर्शनाच्या कॅटेगरीत एन्ट्री.

रितेश देशमुखचा ‘पावरी हो रही है’ व्हिडिओ

सोशल मीडियावरील ‘पावरी हो रही है’ ट्रेन्डमध्ये अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूजाचा सहभाग, रितेशने पावरी स्टाईलमध्ये साजरा केला कुत्र्याचा वाढदिवस, व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!