स्नॅपड्रॅगन 8 Gen 2 चिपसेट आणि 120W चार्जिंग स्पीडसह Redmi ने लाँच केली K60 सिरिज : जाणून घ्या किंमत व इतर तपशील

ऋषभ | प्रतिनिधी
Redmi ने या आठवड्यात बाजारात आपले नवीन K-Series फ्लॅगशिप फोन जाहीर केले आहेत जे पुढील वर्षी 2023 च्या सुरवाती पासून भारत आणि इतर देशांमध्ये लॉंच होणार आहेत. Redmi K60 मालिकेत तीन मॉडेल्स आहेत, Redmi K60, Redmi K60 Pro आणि Redmi K60E. या मॉडेल्सना बूस्ट करण्याकरिता Redmi नवीनतम MediaTek Dimensity आणि Snapdragon चिपसेट वापरत आहे, जी Android 13-आधारित MIUI आवृत्तीवर चालते आणि त्यास जलद चार्जिंग सपोर्ट आहे.
REDMI K60 सिरिजची किंमत
Redmi K60 Pro ची किंमत RMB 3,299 (अंदाजे रु 40,000) पासून सुरू होते हा मोबाईल 8GB + 128GB व्हेरिएंट आहे, पुढे यात 8GB + 256GB, 12GB + 256GB, 12GB + 512GB आणि अगदी 16GB + 512GB मॉडेल देखील आहेत.

Redmi K60 8GB + 128GB मॉडेलसाठी तुम्हाला तब्बल RMB 2,499 (अंदाजे रु 30,000) मोजावे लागतील आणि व्हॅनिला मॉडेलमध्ये 16GB रॅम आणि 512GB स्टोरेज पर्याय देखील आहेत. Redmi K60E साठी, तुम्हाला RMB 2,199 (अंदाजे रु 27,000) मोजावे लागतील आणि तुम्ही 12GB + 512GB पर्यंत डिव्हाइस निवडू शकता.

REDMI K60 सिरिज तपशील
Redmi K60 आणि K60 Pro फ्लॅगशिप मॉडेल्स मध्ये नवीन स्पेक्सचा भडिमार आहे . यात 120Hz रिफ्रेश रेट आणि 480Hz टच सॅम्पलिंग रेटसह QHD+ स्क्रीन रिझोल्यूशनसह 6.67-इंच AMOLED पॅनेल मिळते. प्रो एडिशन नवीन Snapdragon 8 Gen 2 चिपसेटवर कार्य करते , तर vanilla Redmi K60 Snapdragon 8+ Gen 1 SoC वापरते, जे 16GB पर्यंत रॅम आणि 512GB स्टोरेजसह येते . तर Redmi K60E हे MediaTek Dimensity 8200 SoC आणि 12GB RAM सह येत आहे.

इमेज कॅप्चर करण्याकरिता , Redmi K60 Pro मध्ये मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे, OIS सह 50-मेगापिक्सेलचा प्राथमिक सेन्सर आणि 6P लेन्स आहे. यात 2MP मॅक्रो सेन्सरसह 8-मेगापिक्सेलचा अल्ट्रावाइड शूटर देखील आहे. Redmi K60 मध्ये 64-मेगापिक्सेलचा प्राथमिक कॅमेरा आहे, तर इतर लेन्स समान आहेत.

Redmi K60E मध्ये OIS सह 48-मेगापिक्सेलचा प्राथमिक सेन्सर आणि त्याच दुय्यम सेन्सर आहेत. चार्जिंगच्या बाबतीत, तुमच्याकडे Redmi K60 Pro वर 120W स्पीड आहे ज्याला 5,000mAh बॅटरी मिळते, Redmi K60 मध्ये 67W वायर्ड चार्जिंग स्पीडसह 5,500mAh बॅटरी आणि दोन्ही फोनसाठी 30W वायरलेस चार्जिंग स्पीड आहे. Redmi K60E मध्ये 5,000mAh बॅटरी देखील आहे जी 67W चार्जिंग गतीने समर्थित आहे.
हेही वाचाः ४२३ कोटींच्या वसुलीसाठी वीज खात्याची पुन्हा ‘ओटीएस’!